11th Admission 2020 Important update

11th Admission New Information

11th Admission 2020 Updates : As CORONA Virus is affecting our lives in all way here is a new update regarding 11th admission. All educational institute and examine board cancelled their examination or postponed. 10th Exam 2020 is yet to completed. Parents worry about whether their child will get admission to a college after 10th class. This year, a tenth paper is still on hold due to Corona. The state board has yet to announce a decision on whether to take the exam. Read the more details below:

शिक्षण विभाग– महाराष्ट्र बोर्ड अपडेट

अकरावी प्रवेशा साठी महत्वाची बातमी

दहावी निकालानंतर मनासारख्या महाविद्यालयात आपल्या पाल्याला प्रवेश मिळेल का, याची चिंता पालकांना असते. यंदा कोरोनामुळे दहावीचा एक पेपर अद्याप शिल्लक आहे. परीक्षा होणार की नाही यासंदर्भात राज्य मंडळाने अजून निर्णय जाहीर केलेला नाही. दरवर्षी एप्रिल महिन्यात अकरावीच्या प्रवेशाच्या प्रक्रियेला सुरुवात होते. नवीन महाविद्यालय, त्यांची जागा, नोंदणी अशी कामे या काळात केली जातात. यंदा मात्र ही कामे सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. दरवर्षी सप्टेंबरपर्यंत अकरावीचे प्रवेश पूर्ण करावे लागतात. साधारणत: एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष अर्जाचा पहिला टप्पा भरण्यास सुरुवात होते. यंदा ही प्रक्रिया पुढे ढकलली जाईल आणि त्याचा थेट परिणाम प्रवेशावर होण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी नोयडाच्या “नायसा’या कंपनीकडे गेल्या तीन वर्षांपासून आहे. मागील वर्ष या कंपनीचे शेवटचे वर्ष होते. यंदा नव्याने निविदा काढून नवी कंपनी सरकारकडून नेमण्यात येणार होती. गेल्या तीन वर्षांत नायसाबाबत अनेक तांत्रिक तक्रारी होत्या, त्यामुळे प्रवेशात अनेकदा गोंधळही उडाला होता. अशात नवीन कंपनी निवडण्यासाठी आणखी विलंब झाल्यास त्याचा फटका प्रवेश प्रक्रियेला बसणार आहे

कोरोनाचा फटका यंदा बहुतांश परीक्षांना बसला आहे. आगामी सर्व शैक्षणिक सत्रांवर याचा परिणाम होणार आहे. दरवर्षी उन्हाळ्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेची तयारी सुरू होते. यंदा दहावीचीच परीक्षा अर्धवट, शाळा बंद, यामुळे अकरावी प्रवेशाचे नियोजन कोलमडण्याची शक्‍यता आहे.

1 thought on “11th Admission 2020 Important update”

Leave a Comment