The Most Important Changes made by MPSC Regarding Examinations

The Most Important Changes made by MPSC Regarding Examinations

Limitations for MPSC Exam Takers: The Maharashtra Public Service Commission has fixed maximum opportunities for candidates according to their categories. In this open (non-open) candidates will be able to appear for the examination a maximum of 6 times. Candidates from other backward classes will be allowed to appear for the examination a maximum of 9 times. There is no limit to the maximum number of opportunities for candidates belonging to the Scheduled Castes and Scheduled Tribes.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध शासकीय पदांसाठीच्या परीक्षांबाबत सर्वात महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. स्पर्धा परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांना देता येणारे प्रयत्न (अटेम्प), संधींची संख्या आता मर्यादित करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव यांनी दिली आहे.

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांसाठी प्रवर्गांनुसार संधींची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. यामध्ये खुला (अराखीव) उमेदवारांना जास्तीत जास्त ६ वेळा परीक्षा देता येणार आहे. तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त ९ वेळा परीक्षा देता येणार आहे. अनुसुचित जाती आणि जमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधींची कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही.

 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतला असेल, तर त्याचा एक अटेम्प नोंदवला जाणार आहे. तसेच पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरला सदर उमेदवाराने हजेरी लावली, तर त्याची ही संधी यापुढे ग्राह्य धरली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे उमेदवार कोणत्याही कारणात्सव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परीक्षेस उपस्थितीची संधी यापुढे गणली जाणार आहे.

 सदर बदल हे पुढील वर्षी म्हणजे २०२१ मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी लागू असणार आहेत. २०२१ मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींना अनुसरून परीक्षांपासून लागू करण्यात येणार आहे, असं आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे.

 MPSC च्या परीक्षांसाठी लाखो तरुण-तरुणी प्रयत्न करत असतात. वयाच्या पस्तीशी, चाळीशी उलटली तरी अनेक विद्यार्थी आपले प्रयत्न करणं थांबवत नाहीत. त्यामुळे त्यांची ऐन उमेदीची वर्षे वाया जातात. त्यामुळे परीक्षा देण्याच्या संख्येवर मर्यादा असायला हवी, अशी मागणी केली जात होती. याची दखल घेत आता राज्य लोकसेवा आयोगाने मोठे पाऊल उचलले आहे. याबाबतचा आदेश बुधवारी (ता.३०) प्रसिद्ध करण्यात आला आहे.

MPSC Changes Technical Services Exam

MPSC Changes Technical Services Exam

The Maharashtra Public Service Commission (MPSC) has made major changes in the examination system of technical services, and now students can be eligible for posts in three categories through a single application. MPSC will not conduct separate examinations for Maharashtra Forest Service, Maharashtra Agriculture Service and Maharashtra Engineering Services but will now conduct a single joint pre-examination under the name ‘Maharashtra Gazetted Technical Services Joint Pre-Examination’.December and January

MPSC: वन, कृषी आणि अभियांत्रिकी पदभरतीसाठी आता एकच संयुक्त पूर्वपरीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) तांत्रिक सेवांच्या परीक्षा पद्धतीमध्ये मोठा बदल केला असून, आता एका अर्जाद्वारे विद्यार्थ्यांना तीन संवर्गातील पदांसाठी पात्र होता येणार आहे. एमपीएससीने महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या संवर्गांसाठी स्वतंत्र परीक्षा न घेता आता ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा’ या नावाने एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार असून हा बदल २०२१ मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीपासून केला जाणार आहे.

एमपीएससीने वेबसाइटवर प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. महसूल आणि वन, कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि विकास, मत्स्य व्यवसाय विभाग, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, जलसंपदा आणि जलसंधारण विभागातील राजपत्रित गट अ आणि गट ब संवर्गातील भरतीसाठी एमपीएससीकडू महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा यासाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध केली जात होती. या संवर्गांच्या परीक्षेसाठी उमेदवारांकडून स्वतंत्र अर्ज मागवून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जात होत्या. मात्र, तीनही परीक्षांच्या आयोजनाबाबत विविध पैलूंचा विचार करून तीनही संवर्गातील भरतीसाठी आता ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा’ ही एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्याची पद्धत, पात्रता, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षायोजना, अभ्यासक्रम आदी तपशील स्वतंत्रपणे प्रसिद्ध केला जाणार असल्याची माहिती एमपीएससीने दिली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल की मनस्ताप सहन करावा लागेल, हे येत्या काही दिवसांत कळेल.

अशी होणार नवी परीक्षा

संयुक्त पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीला अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ते एक, दोन किंवा तीनही परीक्षांना बसू इच्छितात का, या बाबतचा विकल्प घेतला जाईल. संबंधित परीक्षेसाठी उमेदवाराने दिलेले विकल्प हे संबंधित संवर्गातील परीक्षेसाठी अर्ज समजण्यात येतील. त्या आधारे, भरल्या जाणाऱ्या पदसंख्येच्या आधारे, संबंधित परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करायच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गासाठी पूर्व परीक्षेचे स्वतंत्र निकाल जाहीर केले जातील. पूर्वपरीक्षेच्या निकालाआधारे पात्र उमेदवारांसाठी प्रत्येक संवर्गासाठी संबंधित संवर्गासाठी एमपीएससीकडून प्रसिद्ध केलेल्या परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमाच्या आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतल्या जाईल.

Maha DBT Scholarship Application 2020-21

Maha DBT Scholarship Application 2020-21

MahaDBT or Aaple Sarkar DBT (Direct Benefit Transfer) is an online scholarship portal of the Government of Maharashtra. The MahaDBT portal is inviting online applications for 14 scholarship schemes implemented by the Directorate of Higher Education. This scholarship is being organized for the reserved category students residing in Maharashtra. This scholarship is given on the basis of merit and category through Mahadibt Portal. The process of applying for the Maha DBT Scholarship for the year 2020-21 is starting from 3rd December 2020. Carefully read all the information about Mahabibt Scholarship Application 2020-21

महाडीबीटी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया 2020-21   

महाडीबीटी किंवा आपले सरकार डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) महाराष्ट्र सरकारचे एक ऑनलाइन शिष्यवृत्ती पोर्टल आहे. उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या १४ शिष्यवृत्ती योजनांसाठी  महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी या शिष्यवृत्तीचे आयोजन करण्यात येत आहे. हि शिष्यवृत्ती गुणवत्ता व प्रवर्गाच्या आधारे महाडीबीटी पोर्टलमार्फत दिली जाते. सन २०२०-२१ या वर्षासाठी महाडीबीटी शिष्यवृत्ती अर्जाची प्रक्रिया ३ डिसेंबर २०२० पासून सुरू होत आहे. महाबीबीटी शिष्यवृत्ती अर्ज २०२०-२१ बद्दल सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अधिक माहितीसाठी GovNokri.in ला भेट देत रहा…

राबविण्यात येणाऱ्या १४ शिष्यवृत्ती योजना

Maha DBT Scholarship Application 2020-21

महाडीबीटी लॉगिन – महत्वाची ठळक वैशिष्ट्ये( Maha DBT Aaple Sarkar Portal Scholarship Schemes Details)

Particulars Details
Name of the Portal MahaDBT (Maharashtra Direct Benefit Transfer)
Other Name of Scholarship Direct Benefit Transfer
Session 2020-2021
Registration Process Online
Beneficiaries include Students belonging from reserved category in Maharashtra
Official MahaDBT Login Web Portal https://mahadbtmahait.gov.in/login/login
Scholarship Granted by Government of Maharashtra

आपल सरकार डीबीटी नोंदणी २०२०-२१ साठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

पहिल्या पद्धतीनुसार विद्यार्थी खाली नमूद केलेल्या कोणत्याही दोन पद्धतींचा अवलंब करुन महाडीबीटी वर नोंदणी करू शकतातः

आधार आधारित नोंदणी
आधार नसलेली नोंदणी

  • आपल सरकार डीबीटी किंवा महाडीबीटी लॉगिन पोर्टलवर अधिकृत भेट द्या
  • ‘नवीन अर्जदार नोंदणी’ शीर्षक असलेल्या टॅबवर क्लिक करा.
  • अर्जदाराचे नाव, वापरकर्तानाव, संकेतशब्द, पुष्टीकरण संकेतशब्द, ईमेल आयडीसाठी ओटीपी आणि मोबाइल नंबरसाठी ओटीपी यासारख्या आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
  • ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरच्या बाबतीत, ईमेल पत्त्यावर आणि मोबाइल क्रमांकावर एक सत्यापन ओटीपी पाठविला जाईल
  • ओटीपी क्रमांक प्रविष्ट करा
  • ‘नोंदणी’ वर क्लिक करा
  • आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा
  • पुढील चरणात प्रमाणीकरण समाविष्ट आहे. आपण बायोमेट्रिक प्रमाणीकरण किंवा ओटीपी (वन टाइम संकेतशब्द) प्रमाणीकरण दरम्यान निवडू शकता
  • ओटीपी पर्याय निवडल्यास, आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी नंबर पाठविला जाईल. सत्यापनानंतर, आपली सर्व नोंदणीकृत माहिती प्रदर्शित केली जाईल.
  • लॉगिन हेतूसाठी आता एक वापरकर्तानाव आणि संकेतशब्द तयार करा

अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन बघा-येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसंदर्भात माहितीसाठी- येथे क्लिक करा 

Jobs In IT Company

खूशखबर! आयटी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी; 70 लाखांपर्यंत मिळणार पॅकेज

Job opportunities : आयटी क्षेत्राशी निगडीत असलेल्या सुमारे 1 लाख लोकांना ऑक्टोबरमध्ये रोजगार मिळाला,  अशी माहिती हॉट टेक जॉब्स आणि हॉट स्किल्स Indian Unicorns ; Soonicorns च्या रिपोर्टमधून समोर आली आहे.

नवी दिल्ली : कोरोनाव्हायरसमुळे देशातील प्रत्येक वर्किंग सेक्टरमध्ये मंदीचे वातावरण निर्माण झाले. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात सुरू केली होती. त्यामुळे कोट्यवधी लोक बेरोजगार झाले. मात्र, आता आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती सुरू झाली आहे. कोरोनाच्या संकटातून सावरलेल्या टेक कंपन्यांनी भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

 स्टाफिंग फर्म एक्सफेनो (Xpheno) च्या रिपोर्टनुसार, आयटी कंपन्या आणि स्टार्टअप कंपन्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यात सर्वात जास्त लोकांची भरती झाली होती. आयटी क्षेत्राशी निगडीत असलेल्या सुमारे 1 लाख लोकांना ऑक्टोबरमध्ये रोजगार मिळाला,;अशी माहिती हॉट टेक जॉब्स आणि हॉट स्किल्स Indian Unicorns  Soonicorns च्या रिपोर्टमधून समोर आली आहे.

 मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये होत आहे भरती

आयटी क्षेत्रातील मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उदाहरणार्थ, गेल्या ऑक्टोबरमध्ये एक्सेंचर कंपनीत 3000 जागा होत्या. आता त्यामध्ये वाढ होऊन 7000 एवढी संख्या झाली आहे. IBM मध्ये ज्युनिअर लेव्हलच्या पोस्टसाठी 1725 जागा उपलब्ध आहेत. विप्रो कंपन्यांमध्ये 800 जागा उपलब्ध आहेत. एक्सफेनोच्या रिपोर्टनुसार कोणत्या पदांसाठी भरती सुरू आहेत ते जाणून घेऊया..

 फुल स्टॅक डेव्हलपर

फुल स्टॅक डेव्हलपर पदासाठी प्रोग्रामिंगच्या भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच React.JS [Redux]आणि Angular.JS फ्रंट एंड आणि बॅक एंड सारख्या Node.JS ची माहिती असणे आवश्यक आहे.  या पदांवर काम करणाऱ्या फ्रेशर्सना वर्षाला 4-6 लाखांपर्यंत पॅकेज मिळू शकतं तर 12 वर्षांच्या अनुभवी व्यक्तींना 40-80 लाख रुपयांपर्यंत कमवण्याची संधी आहे.

 डेटा इंजिनिअर्स

Hadoop सारख्या डेटा फ्रेमवर्कवर काम करण्यासाठी इंजिनिअर्सना पायथॉन आणि आरसारख्या प्रोग्रामिंग भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यामध्ये काम करणाऱ्या फ्रेशरला वर्षभरात 4 -6 लाख कमवण्याची संधी आहे. तर 3 वर्षांपर्यंत अनुभव असणारी व्यक्ती वर्षाला 14 ते 15 लाखांच्या घरात पैसे कमवू शकते. तर 12 वर्षांचा अनुभव असणाऱ्या डेटा इंजिनिअर्सना 70 लाखांपर्यंत कमवण्याची संधी आहे

 क्लाऊड कॉम्प्युटरिंग

कोरोना संकट काळात क्लाऊड कॉम्प्युरिंग मार्केटमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. क्लाउड आणि नवीन एज टेक्नॉलॉजीमुळे येणाऱ्या काळात फर्मच्या विकासात वाढ होईल, असे विप्रोचे सीईओ डेलपॉर्टे यांनी म्हटले आहे. अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस, अझर आणि गुगल क्लाऊड सारखे प्लॅटफॉर्म सध्या बंपर भरती सुरु आहे. क्लाउड प्रोफेसर दर वर्षी 4 लाख ते 35 लाख रुपयांपर्यंत कमावू शकतात.

 सायबर सिक्युरिटी प्रोफेसनल

कोरोना संकट काळात वर्क फ्रॉम होम करताना सायबर सुरक्षेची आवश्यकताही वाढली असून यासह या क्षेत्रातील प्रोफेसनल्स गरज वाढली आहे. या क्षेत्रात ट्विटर आणि पे यू सारख्या कंपन्यांमध्येही भरती झाली आहे. सायबर सिक्युरिटी प्रोफेसनल हे अनुभवाच्या जोरावर 4 लाख ते 4 कोटी रुपये मिळवू शकतात.

सोर्स:लोकमत

Malegaon Mahanagarpalika Recruitment 2020

Malegaon Mahanagarpalika Recruitment 2020

मालेगाव मनपात जम्बो भरती! निर्देशांचे पालन करीत राबवणार भरतीप्रक्रिया

MMC Vacancies 2020

 मालेगाव (नाशिक) महापालिकेत अस्थापनेवर मंजूर पदांपेक्षा शेकडो पदे रिक्त आहेत. ६० टक्के कर्मचाऱ्यांवर कामकाजाचा गाडा आहे. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता तातडीने कामे मार्गी लागण्यासाठी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी विविध ४४ संवर्गातील एक हजार सहा पदांची जम्बो भरती होणार आहे. ठोक मानधन पद्धतीने थेट मुलाखतीद्वारे नियुक्ती केली जाणार आहे. महापालिकेच्या मुख्य कार्यालयात कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक निर्देशांचे पालन करीत भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे .

Malegaon Mahanagarpalika Recruitment 2020

 मालेगाव मनपात मानधन तत्त्वावर भरती 
मनपातील जागा मानधन स्वरूपाच्या आहेत. ही भरतीप्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी कुठल्याही गैरप्रकाराला बळी पडू नये. विविध पदनिहाय मुलाखतींची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे. भरतीप्रक्रियेचे सर्व अधिकार आयुक्तांना आहेत. सहा महिन्यांचा कार्यकाळ संपताच नियुक्ती संपुष्टात येईल. अनुभवी व स्थानिक उमेदवारांना भरतीप्रक्रियेत प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांच्या प्रमाणपत्राच्या छाननीनंतर पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. अपात्र उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.

सौर्स : सकाळ