CRPF Police Recruitment 2020

CRPF Recruitment 2020

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात १ लाख पदे रिक्त

सेवा भरती नियमाला अनुसरूनच या जागा भरण्यात येतील.

CRPF Police Bharti 2020 : सीमा सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलासारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) एक लाखापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. या जागा रिक्त राहण्याचे मुख्य कारण म्हणजे सेवानिवृत्ती, राजीनामे आणि मृत्यू. ही माहिती सोमवारी राज्यसभेत देण्यात आली.

सीमा सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलासारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) एक लाखापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. या जागा रिक्त राहण्याचे मुख्य कारण म्हणजे सेवानिवृत्ती, राजीनामे आणि मृत्यू. ही माहिती सोमवारी राज्यसभेत देण्यात आली.

पोलीस भरती अपेक्षित प्रश्नसंच (मोफत टेस्ट सिरीज)

पोलीस भरती २०२० लेखी परीक्षा महत्वाच्या ट्रिक्स 

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, बीएसएफमध्ये सर्वात जास्त २८,९२६, सीआरपीएफमध्ये २६,५०६, सीआयएसएफमध्ये २३,९०६, सशस्त्र सीमा बलात १८,६४३, आयटीबीपीमध्ये ५,७८४ आणि आसाम रायफल्समध्ये ७,३२८ जागा रिक्त आहेत. सीएपीएफ आणि आसाम रायफल्समधील रिक्त जागा या सेवानिवृत्ती, राजीनामे, मृत्यू, नव्या जागांची निर्मिती, केडर रिव्ह्यूज आदी कारणांमुळे आहेत. यातील बहुतांश जागा या कॉन्स्टेबल ग्रेडच्या आहेत, असे त्यांनी उत्तरात म्हटले.

तरुणांनो, लागा तयारीला! पोलीस खात्यातील साडे बारा हजार पदं भरणार

राय म्हणाले, सीएपीएफमधील रिक्त जागा भरण्याची एक प्रक्रिया थेट भरती, बढती आणि प्रतिनियुक्ती अशी आहे. रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने वेगाने पावले उचलली आहेत व ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. सध्या कॉन्स्टेबल्सच्या ६०,२१०, उपनिरीक्षकांच्या २,५३४ जागा भरण्याचे काम कर्मचारी निवड आयोगामार्फत आणि ३३० सहायक कमांडंटस्च्या जागा भरण्याचे काम केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सुरू आहे.

SSC CHSL 2019 Exam Candidate Can Change Their Exam Centre

SSC CHSL 2019 Exam Candidate Can Change Their Exam Centre

कम्बाइंड हायर सेकंडरी लेव्हल परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षा केंद्रात बदल करता येणार आहे.

SSC मार्फत घेण्यात येणाऱ्या कम्बाइंड हायर सेकंडरी लेव्हल परीक्षेसाठी उमेदवारांना आता परीक्षा केंद्रात बदल करता येणार आहे. १८ सप्टेंबरपासून हा बदल करण्यासाठी संकेतस्थळावरील पर्याय खुला होणार आहे. उमेदवार स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर ssc.nic.in वर जाऊन हा बदल करू शकणार आहेत.

परीक्षा केंद्रात बदल करण्याची अंतिम मुदत २० सप्टेंबर २०२० पर्यंत आहे. उमेदवार आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड देऊन लॉगइन करू शकतील आणि त्यानंतर परीक्षा केंद्र बदलता येईल.

यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात असे म्हटले आहे की, ‘कम्बाइंड हायर सेकंडरी (१०+२) लेव्हल परीक्षा २०१९ साठी उमेदवार त्यांनी आधी निवडलेल्या परीक्षा केंद्रात बदल करू शकतील. यासाठी १८ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२० या कालावधीत आपल्या रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डसह आयोगाच्या संकेतस्थळावर (http://ssc.nic.in) लॉगइन करावयाचे आहे. परीक्षा केंद्र बदलण्याचा पर्याय उमेदवारांच्या डॅशबोर्डवर ‘लेटेस्ट नोटिफकेशन्स’ या पर्यायावर उपलब्ध असेल. परीक्षा केंद्र बदलण्याची प्रक्रिया करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.’

दरम्यान, कम्बाइंड हायर सेकंडरी (१०+२) लेव्हल परीक्षा २०१९ कधी आयोजित करण्यात येणार याबाबत स्टाफ सिलेक्शन कमिशन येत्या मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी नोटिफिकेशन जारी करणार आहे. तशी माहिती आयोगाने संकेतस्थळावर दिली आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

परीक्षा केंद्रातील बदलासंदर्भातील नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

SBI Vacancy 2020

SBI Bharti 2020: State Bank of India (SBI) on Monday said it has plans of recruiting more than 14,000 people this year. They need a few more people to further expand their business as stated by SBI. Read Further details about it below:

SBI हजारो पदांवर भरती !!

भारतीय स्टेट बँकेने सांगितलं आहे की, यावर्षी १४ हजार नियुक्तीची मोठी योजना आखणार आहे. SBI ने सांगितल्याप्रमाणे आपला व्यवहार अधिक विस्तारीत करण्यासाठी त्यांना आणखी काही लोकांची आवश्यकता आहे. तसेच बँकेने असे देखील स्पष्टीकरण दिलं आहे की, वीआरएस स्कीम कॉस्ट कटिंगकरता नाही आहे. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध नाही.

देशातील सर्वात मोठी बँक म्हणून एसबीआयकडे पाहिलं जातं. स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना म्हणजे VRS बँकेतील उपस्थिती कमी करण्यासाठी नाही आहे. आधीच्या माहितीनुसार, बँकेने कर्मचाऱ्यांकरता VRS ची योजना आणली आहे. यामध्ये जवळपास ३०,१९० कर्मचारी येऊ शकतात. या दरम्यान पीटीआयला बँकेच्या प्रवक्तांनी सांगितल्यानुसार, बँकेचा विस्तार वाढवण्यासाठी ही VRS योजना नाही.

काय आहे बँकेचं म्हणणं? 

बँकेद्वारे जाहिर करण्यात आलं की, ‘बँक कायम कर्मचाऱ्यांशी मैत्रीपूर्वक वागते. बँक आपला व्यवहार वाढवत आहे. ज्याकरता आणखी काही लोकांची आवश्यकता आहे. यावरून हे स्पष्ट होतं की, बँकेला १४,००० पदांकरता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची आहे.’त्यांनी म्हटल्यानुसार, स्टेट बँकेत सध्या जवळपास अडीच लाख कर्मचारी आहे. बँक आपल्या कर्मचाऱ्यांच्या गरजा जाणून त्या पूर्ण करू इच्छिते.

काय आहे VRS 2020?

भारतीय स्टेट बँक आपल्या कर्मचाऱ्यांकरता नवीन VRS2020 अशी योजना आणली होती. यामध्ये जवळपास ३०१९० कर्मचाऱ्यांचा समावेश होता. ही योजना त्या कर्मचाऱ्यांसाठी होती. ज्यांनी बँकेला आतापर्यंत आपल्या कामाची २५ वर्षे दिली आहेत आणि ज्यांच वय ५५ वर्षे असेल. ही योजना १ डिसेंबर ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत असणार आहे.

कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार? 

जे कर्मचारी ही वीआरएस स्विकारणार आहेत. त्यांना वास्तविक रिटायरमेंट तारखेपर्यंतच्या कालावधीकरता वेतनाच्या ५० टक्के एक्स ग्रेशियाच्या रुपात दिले जाणार आहे. याचप्रमाणे ग्रॅज्युटी, पेंशन, भविष्य निधी आणि मेडिकल बेनिफिट्सचा देखील फायदा होणार आहे.

MSRTC Bharti 2020

MSRTC Bharti 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने २०१९ मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत सेवेत दाखल झालेल्या एसटी चालक आणि वाहकांनाची सेवा तात्पूरत्या स्वरुपात खंडीत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एसटी कामगार संघटनेत तिव्र नाराजी होती. मात्र आता एसटी महामंडळाने सरळसेवा भरती अंतर्गत सेवेत दाखल झालेल्या ४ हजार ५०० कर्मचार्‍यांना दिलासा दिला आहे. या कर्मचार्‍यांच्या सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठविण्यात आली आहे.

पूर्ण MSRTC Bharti GR बघण्यासाठी येथे क्लिक करा 

२०१९ मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत सुमारे ४५०० पात्र उमेदवारांपैकी १३०० उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण करून चालक तथा वाहक पदावर रोजंदार गट क्र. १ मध्ये एसटी महामंडळात नियुक्त्या दिलेल्या आहेत तसेच सुमारे ३२०० चालक तथा वाहक पदाकरीता प्रशिक्षण सुरू आहे. मात्र कोरोनामुळे एसटी बसची सेवा गेल्या पाच महिन्यापासून पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे एसटी प्रवासी सेवा हा उत्पन्नाचा प्रमुख मार्ग बंद झाला होता. तसेच लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून मुंबई अत्यावश्यक कर्मचार्‍यांसाठी विशेष सेवा चालविण्यात येत आहे. राज्यात अडकलेल्या मजुरांच्या घरवापसीसाठी देखील वाहतुक केली. त्याशिवाय जून महिन्यात एसटीची तालुका ते गाव सेवाही सुरु झाली.

परंतु कोरोनाच्या भितीमुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरविली असल्याने महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. महामंडळाकडे कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठी देखील निधी नाही. त्यामुळेच उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशाने महामंडळ अनेक उपाययोजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणन एसटीतील रोजंदारीवरील कर्मचार्‍यांची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय जुलै महिन्यात घेतला होता.

मात्र आता राज्यात एसटीची वाहतुक २० ऑगस्टपासुन सुरु झाली आहे. त्यानुसार महामंडळाने सरळसेवा भरती सन २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक आणि अनुकंपा तत्वावरील प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणास देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आली असल्याचे परिपत्रक गुरुवारी ३ सप्टेंबर रोजी काढले आहे. यामुळे रोजंदारीवरील कर्मचार्‍यांच्या हाताला आता काम मिळणार आहे.

SSC Exam Results Dates Declared

SSC Exam Results Dates Declared

स्टाफ सिलेक्शन कमिशन: अनेक परीक्षांच्या निकालांच्या तारखा जाहीर

SSC CGL, MTS, JE Result Dates 2020

स्टाफ सिलेक्शन कमिशन: अनेक परीक्षांच्या निकालांच्या तारखा जाहीर

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अनेक भरती परीक्षांच्या निकालांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

SSC CGL, MTS, JE result dates 2020: स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) ने अनेक भरती परीक्षांच्या निकालांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यात कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल टीअर ३ (CGL tire 3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), ज्युनिअर इंजिनीअर (JE) यासारख्या अनेक परीक्षांचा समावेश आहे

स्टाफ सिलेक्शन कमिशनने मंगळवारी १ सप्टेंबर २०२० रोजी ही माहिती दिली. त्यानुसार २०१८ ते २०२० पर्यंत झालेल्या कमिशनच्या विविध भरती परीक्षांच्या निकालांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.

SSC Recruitment Exam Results: कधी, कोणता निकाल?

  • एसएससी ज्युनियर इंजिनीअर (सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, क्वांटिटी सर्वेईंग अँड कॉन्ट्रॅक्ट्स) एक्झाम २०१८ (पेपर २) चा निकाल – २१ सप्टेंबर २०२०
  • एसएससी मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) एक्झाम २०१९ (पेपर २) चा निकाल – ३१ ऑक्टोबर २०२०
  • एसएससी सीजीएल (टियर -३) २०१८ चा निकाल – ०४ ऑक्टोबर २०२०.
स्टाफ सिलेक्शन कमिशनने हेही सांगितले आहे की या तारखा संभाव्य आहेत. प्रशासकीय किंवा अन्य कारणांमुळे निकालाच्या तारखांमध्ये बदल संभवतो. जे उमेदवार या परीक्षांमध्ये समाविष्ट झाले होते त्यांनी निकालाची प्रतीक्षा करावा. वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर ssc.nic.in वर जाऊन अद्ययावत माहिती घ्यावी.