College & University Exam Reschedule

College & University Exam Reschedule

महाविद्यालये, विद्यापीठांच्या नियोजित परीक्षा ३१ मार्चनंतर

As per the latest news the college and university examine 2020 are now reschedule due to the Corona Virus. Till the 31st March 2020 all colleges and universities postponed their examination. After the Mumbai High Court, the government finally announced this decision. Meanwhile, a hearing in the High Court will be held on Tuesday. The state government is likely to present this decision to the court at that time. However, the Class X exams are on schedule. Candidates read the complete details carefully given below and keep visit us for further updates.

राज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड- १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून सर्व महाविद्यालय, विद्यापीठे ३१ मार्च,२०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तसेच ३१ मार्चच्या अगोदर नियोजित असलेल्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी १७ मार्च रोजी पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाच्या दट्ट्यानंतर सरकारने अखेर हा निर्णय जाहीर केला. दरम्यान, आज मंगळवारी यासंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावेळी राज्य सरकार आपला हा निर्णय न्यायालयासमोर मांडण्याची शक्यता आहे. दहावीच्या परीक्षा मात्र नियोजित वेळापत्रकानुसार सुरू आहेत.

सामंत पत्रकार परिषदेत म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेली ग्रामीण व शहरी भागातील सर्व महाविद्यालये, विद्यापीठे तसेच परवानगी असलेले खाजगी क्लासेस बंद असणार आहेत. दिनांक २६, २७ दरम्यान राज्यातील कोरोनाबद्दलची परिस्थिती पाहण्यासाठी आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. या नियमांचे सर्व महाविद्यालयांनी आणि विद्यापीठांनी तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे.

वसतिगृहात राहणाऱ्या मुलांची काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना घरी जाण्याची सुद्धा परवानगी देण्यात येत आहे. राज्यात शिक्षण घेणारे जे विद्यार्थी परदेशात गेले आहेत, त्यांना देशात परत येण्यास निर्बंध घालण्यात आलेले आहेत. असे सांगून सामंत म्हणाले, विभागामार्फत पुढील अधिकृत सूचना येईपर्यंत कोणत्याही अफवांवर आणि माहितीवर विश्वास ठेऊ नये.

सामंत म्हणाले, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासकीय कारणास्तव संबंधित विद्यापीठाचे कुलगुरू/ उपकुलगुरू/ कुलसचिव/ उपकुलसचिव तसेच महाविद्यालयाचे/ तंत्रनिकेतनांचे प्राचार्य/ संचालक/ अधिष्ठाता यांनी निर्देश दिल्यास त्यानुसार अध्यापकांना संस्थेमध्ये तातडीने हजार राहणे बंधनकारक राहील. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू/ उपकुलगुरू/ कुलसचिव/ उपकुलसचिव तसेच महाविद्यालयाचे/ तंत्रनिकेतनांचे प्राचार्य/ संचालक/ अधिष्ठाता व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नियमितरित्या कार्यालयामध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे.

सर्व सरकारी/ अनुदानित/ खाजगी शैक्षणिक संस्था/ महाविद्यालये/ अकृषि विद्यापीठे/ तंत्रशास्त्र विद्यापीठे/ तंत्र निकेतने/ अभियांत्रिकी/ औषधनिर्माणशास्त्र/ कला महाविद्यालये या मधील सर्व अध्यापक हे दि. २५ मार्च, २०२० पर्यंत घरी राहून कामकाज (Work from Home) करू शकतील, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

सौर्स : मटा

Leave a Comment