Govt Exam now through MPSC

Govt Exam now through MPSC

परीक्षा ‘एमपीएससी’तर्फेच घ्याव्यात

MPSC EXAM 2020 DETAILS : All Government recruitment now through the MPSC Portal. If the state government does not make a decision on the appointment of MPSC by the administration soon, the next two marches will be organized by the MPSC Coordination Committee and MPSC Student Rights. Earlier, the hashtag #onlyMPSC will be launched on Twitter and social media from February 7. Read the complete details carefully and keep visit us.

MPSC EXAM 2020 DETAILS

राज्या सरकारने ‘क’ आणि ‘ड’ प्रवर्गातील पदभरतीच्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घ्याव्यात,’ अशी मागणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमदेवारांसोबतच लोकप्रतिनिधींधी केली आहे. राज्य सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार रोहित पवार यांच्यासोबत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सरकारचे अभिनंदन केले. तसेच आता पदभरतीच्या परीक्षा ‘एमपीएससी’ प्रशासनाकडून घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सरकार यावर काय निर्णय घेणार, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महापरीक्षा पोर्टल बंद केल्याबद्दल महाविकास आघाडीचे अभिनंदन करून सरकारचे धन्यवाद मानले आहे. त्याचवेळी, ‘सर्व नोकरभरती ‘एमपीएससी’मार्फत व्हावी, ही विनंती,’ असे ट्विट केले आहे. आमदार रोहित पवार यांनी महापरीक्षा पोर्टल बंद केल्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. ‘आता दुसरे कोणतेही पोर्टल न आणता यापुढील नोकरभरती ‘एमपीएससी’मार्फतच व्हावी आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ‘एमपीएससी’ला ताकद द्यावी, ही विनंती,’ असे ट्विट केले आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ‘महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याचा आणि त्याजागी एक पर्यायी व्यवस्था विभागीय स्तरावर आणण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. पण, या भरती प्रक्रियेत ‘एमपीएससी’ला सामावून घेण्याची; तसेच महापरीक्षा पोर्टलच्या वतीने झालेल्या भरती प्रक्रियेतील गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी करतो,’ असे ट्विट केले आहे. महापरीक्षा पोर्टल बंद होण्यासाठी या लोकप्रतिनिधींसोबत खासदार सुप्रिया सुळे यांनीही पाठपुरावा केला होता.

‘राज्य सरकारने पदभरतीची परीक्षा ‘एमपीएससी’ प्रशासनाद्वारे घेण्याबाबतचा निर्णय लवकर न घेतल्यास येत्या दोन मार्चला ‘एमपीएससी’ समन्वय समिती आणि ‘एमपीएससी स्टुडन्ट राइट्स’द्वारे आंदोलन करण्यात येईल. त्यापूर्वी २४ फेब्रुवारीपासून ट्विटर आणि सोशल मीडियावर #onlyMPSC अशी हॅशटॅग मोहीम चालविण्यात येणार आहे,’ अशी माहिती किरण निंभोरे, राहुल कवठेकर, महेश बडे, पद्माकर होळंबे यांच्यासह उमेदवारांनी केली आहे. सरकारने ‘एमपीएससी’द्वारे परीक्षा घ्यायचा निर्णय त्वरित करून न्याय द्यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली आहे.

Leave a Comment