KDMC Hospital Doctors Recruitment 2020

KDMC Hospital Doctors Recruitment 2020

कल्याण-डोंबिवलीमधील पालिका रुग्णालयात डॉक्टरांची भरती

Kalyan Dombivli Municipal Corporation published the news regarding the Medical Staff Required. There will be 72 Medical Officer and 30 Staff nurse urgent recruitment. Day to day due to the Corona Virus Patient has been increasing so Municipality facing the shortage of Medical Services. Hence KDMC decided to recruiting the Medical Staff through the Direct interview, Read the complete details carefully and keep visit us for the further update.

KDMC Bharti 2020New Update

७२ वैद्यकीय अधिकारी, ३० स्टाफ नर्सची गरज – कल्याण-डोंबिवलीमधील करोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असून कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाकडून वैद्यकीय सेवा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. पालिकेच्या रुग्णालयात वाढीव मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी तात्पुरत्या अस्थायी स्वरूपात कंत्राटी पद्धतीने ७२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. गुरुवारपासून थेट मुलाखतीद्वारे ही भरती केली जाणार असून डॉक्टरेतर कर्मचाऱ्यांची संख्यादेखील अपुरी असल्यामुळे ३० स्टाफ नर्सदेखील अस्थायी स्वरूपात सेवेत घेतल्या जाणार आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिकेची डोंबिवलीतील शास्त्रीनगर आणि कल्याणमधील रुक्मिणीबाई ही दोन रुग्णालये असून या रुग्णालयांत तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना उपचाराविनाच परतावे लागते. पालिका प्रशासनाकडून रुग्णालयात काम करण्यासाठी डॉक्टर भरती करण्यासाठी वारंवार जाहिराती देण्यात आल्या असल्या तरी या डॉक्टरांना दिले जाणारे मानधन अत्यल्प असल्यामुळे या जाहिरातीला डॉक्टरांकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळेच या डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. मागील महासभेने या मानधनवाढीला मंजुरी दिल्यानंतर पालिका प्रशासनाकडून डॉक्टर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र २४ मार्च रोजी बोलावण्यात आलेल्या मुलाखती त्याच दिवशीपासून केंद्र सरकारकडून संचारबंदी घोषित करण्यात आल्यामुळे रद्द कराव्या लागल्या होत्या. आता शहरातील करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून या रुग्णांना सेवा देण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर आणि अन्य कर्मचारी भरती तातडीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यानंतर पालिका प्रशासनाकडून करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोख्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर भरती करण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. पालिका रुग्णालयातील जनरल वॉर्डसाठी २० तर निवासी वैद्यकीय अधिकारी २० अशा ४० एमबीबीएस डॉक्टरांची भरती केली जाणार असून १० एमडी फिजिशियन, पाच चेस्ट फिजिशियन, १० भूलतज्ज्ञ, पाच बालरोगतज्ज्ञ, दोन कान नाक घसा तज्ज्ञ अशा ७२ डॉक्टरांची भरती केली जाणार असून याखेरीज ३० स्टाफ नर्सचीदेखील भरती केली जाणार आहे. तत्काळ गरज असल्यामुळे गुरुवारपासून ६ एप्रिलपर्यंत या उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या जाणार असून निवड झालेल्या उमेदवारांना २४ तासांच्या आत सेवेत हजर राहावे लागणार आहे. मात्र या डॉक्टर आणि नर्सची भरती केवळ करोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंतच राहणार असून त्यानंतर त्यांची सेवा संपुष्टात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉक्टरांचे मानधन वाढविल्यानंतर तरी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होतील, अशी आशा गरीब जनतेकडून केली जात आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर खासगी डॉक्टरांनी सामाजिक भान जपत पालिकेच्या रुग्णालयात सेवा देण्यास सुरुवात केली असून अनेक खासगी डॉक्टरांनी रुग्णालयात सेवा देण्याची तयारी दाखविली आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे शक्य होणार आहे. मात्र सद्यस्थितीत करोनाची तीव्र लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात धाडले जात असून रुग्णांचा वाढता आकडा पाहता कल्याण-डोंबिवलीतदेखील करोना स्वॅब तपासणी केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.

सौर्स : म.टा.

1 thought on “KDMC Hospital Doctors Recruitment 2020”

Leave a Comment