LIC Bharti 2020 – 8000 Vacancy

LIC Bharti 2020 – 8000 Vacancy

‘एलआयसी’मध्ये आठ हजार जागांची भरती

LIC Recruitment 2020 : As per the latest news source LIC – Life Insurance Corporation of India will be recruiting the 8000 various posts in upcoming months. LIC has recruited around 8,000 posts of various positions, and currently 450 officers are undergoing training at Infosys. Candidates Read the below given details carefully and keep visit us.

LIC Recruitment 2020

‘एलआयसी’मध्ये विविध पदाच्या आठ हजार जागांची भरती होत असून, सध्या ४५० अधिकाऱ्यांचे इन्फोसेमध्ये प्रशिक्षण सुरू आहे.

वाढती स्पर्धा असतानाही ग्राहकांचा भारतीय आयुर्विमा महामंडळावर असलेल्या विश्वासाच्या बळावर विकास करणे शक्य झाले आहे. ‘एलआयसी’ची मार्केटमधील हिस्सेदारी वाढली आहे. यात यंदा पॉलिसीमध्ये ७६ टक्के तर प्रीमियम व्यवसायामध्ये ७१ टक्क्यावंर बाजार हिस्सेदारी नोंदवत नवा उच्चांक स्थापिक केला आहे, अशी माहिती ‘एलआयसी’चे पश्चिम विभागाचे क्षेत्रीय प्रबंधक सी विकास राव यांनी शनिवारी दिली.

‘एलआयसी’च्या औरंगाबाद झोन विभागातील विविध उपक्रमांचे लोकार्पण क्षेत्रीय प्रबंधक सी. विकास राव यांच्याहस्ते शनिवारी झाले. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी औरंगाबाद विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक कुलभूषण शर्मा उपस्थित होते. सी. विकास राव म्हणाले की, एलआयसीची स्थिती एकदम मजबूत असून ग्राहकांनी दाखिलेल्या विश्वासामुळेच वाढ होत असल्याचे नमूद केले. पश्चिम झोनने यंदाच्या वर्षी २४ टक्के वाढ केली. पश्चिम झोनमध्ये २४ लाख ७६ जार पॉलिसीधारक असून औरंगाबाद विभागातील चार जिल्ह्यात एकूण १७ लाखाच्यावर पॉलिसीधारक आहेत. ‘एलआयसी’ने भविष्यात आपल्या सुविधा ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी डिजिटल प्लॅट फार्म उपलब्ध करून देण्यात येईल. जेणेकरून ग्राहकांना घर बसल्या सर्व सुविधा उपलब्ध होतील. ‘एलआयसी’त विविध पदांच्या आठ हजार जागांची भरती होत असून सध्या ४५० अधिकाऱ्यांचे इन्फोसेमध्ये ट्रेनिंग सुरू आहे, असे राव यांनी सांगितले.

या कामांचे लोकार्पण

‘एलआयसी’च्या येथील कार्यालयासमोर स्मार्ट ‘एलआयसी’ बस थांबा उभारण्यात आला आहे. या बस थांब्यासह कार्यालयीन इमारतीवर बसविण्यात आलेले सोलार पॅलन व जल फेरभरणाचे लोकार्पण क्षेत्रीय व्यवस्थापक सी. विकास राव यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ‘एलआयसी’तील निवृत्त कर्मचारी आणि चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राव त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आले.

सौर्स : म. टा.

Leave a Comment