Maha Bharti in Private Bank

Maha Bharti in Private Bank

खासगी बँकांत मेगाभरती

Bank MahaBharti 2020 : As per the latest news Mega Recruitment in Private Bank will be held soon. There is good news for those who want a job in the banks. Half a dozen private banks, including Kotak Mahindra Bank, HDFC Bank, RBL Bank and Axis Bank, are preparing to recruit around a million employees in the next financial year. According to the placement company ‘Teamleys’, private banks are preparing to increase their market share after the release of non-financial companies (NBFCs) from retail loans.

Bank MahaBharti 2020

बँकांमध्ये नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. कोटक महिंद्र बँक, एचडीएफसी बँक, आरबीएल बँक आणि अॅक्सिस बँकेसह अर्धा डझन खासगी बँका पुढील आर्थिक वर्षात जवळपास लाखभर कर्मचाऱ्यांची भरती करण्याची तयारी करत आहेत. प्लेसमेंट कंपनी ‘टीमलीज’च्या मते रिटेल कर्जांमधून बिगर वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) बाहेर आल्यानंतर खासगी बँका आपला बाजारहिस्सा वाढवण्याची तयारी करत आहेत.

‘टीमलीज’च्या अंदाजानुसार देशभरात खासगी बँकांद्वारे शाखा बँकिंग प्रकारच्या व्यवसायासाठी कर्मचाऱ्यांची भरती होण्याची शक्यता आहे. या माध्यमातून बँका आपले रिटेल कर्जांच्या वितरणात वाढ करण्याचे संकेत आहेत. ‘टीमलीज’चे उपाध्यक्ष आणि नोकरभरती प्रमुख अजय शहा यांच्या मते खासगी बँका रिटेल व्यवसायावर अधिक भर देत आहेत. त्यामुळे त्यांनी शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती करण्यासाठी कंबर कसली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत आगामी आर्थिक वर्षात ३० टक्के अधिक नोकरभरती बँकांमध्ये होण्याची शक्यता आहे. नव्या आणि अनुभवी चेहऱ्यांनाही यातून संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वेतन किती मिळणार?

‘टीमलीज’च्या मते अनुभव आणि सोपवण्यात येणाऱ्या विविध जबाबदाऱ्यांनुसार नव्याने भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना १८ हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत दरमहा वेतन मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित बँकांनी प्लेसमेंट कंपन्यांना आपल्या गरजेनुसार सूचना करण्यासाठी सुरुवातही केली आहे. पदवी प्राप्त केलेले तरुण या पदांसाठी अर्ज करू शकतात. एमबीए आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. शाखा प्रमुख, ऑपरेशन आणि सेल्स मॅनेजर आदी पदांसाठी कर्मचारी भरती होणार आहे.

कोटक महिंद्र बँक

खासगी क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या कोटक महिंद्र बँक आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये १२ हजार ते १५ हजार नव्या नोकऱ्यांची निर्मिती करणार आहे. बँकेच्या मनुष्यबळ विभागाचे प्रमुख सुखजित पसरिचा यांनी दिलेल्या माहितीनुसार रिटेल बँकिंगमध्ये केवळ वरिष्ठ पदांचीच भरती करण्यात येणार आहे. त्यामध्ये रिलेशनशिप मॅनेजर आणि अन्य सेवा आदी जबाबदाऱ्यांचा समावेश आहे. या शिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित विशेष आणि सर्वसामान्य पदांचीही निर्मिती करून जागाभरती करण्याचा विचार चालू आहे.

एचडीएफसी बँक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँक पुढील आर्थिक वर्षात जवळपास ३० हजार नव्या नोकरदारांची भरती करणार आहे. एकूण नोकरभरतीपैकी बहुतांश नोकऱ्या रिटेलमध्ये असणार आहेत. पुढील आर्थिक वर्षात आरबीएल बँकही दोन हजार जणांची भरती करणार असल्याचे वृत्त आहे. चालू आर्थिक वर्षापर्यंत बँकेच्या शाखांची संख्या ४०० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आरबीएल बँकेचे कार्यकारी संचालक राजीव आहुजा यांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेची रिटेल, ब्रँच ब्रँकिंग आणि कार्ड बिझनेसमध्ये वाढ होत असून, त्यामु‌ळे नोकऱ्यांच्या संधी वाढण्याची शक्यता आहे.

अॅक्सिस बँक

खासगी क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या अॅक्सिस बँकेमध्ये आगामी आर्थिक वर्षात ३० हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. बँकेच्या मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख राजकमल वेंपती यांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेत कॅम्पस, एम्प्लॉयी रेफरल आदी माध्यमांतूनही नोकरभरती होते. बँकेमध्ये परंपरागत पदांव्यतिरिक्त डिजिटल बँकिंग आणि तंत्रज्ञानावर आधारित नोकरभरतीही करण्यात येणार आहे.

सौर्स : मटा

Leave a Comment