MahaJobs Portal Online Registration

MahaJobs Portal Online Registration

Mahajobs Portal Online Registration:  The state government has launched the Mahajobs portal to link the job demand of the unemployed youth in the state and the employment supply of the companies …

The Mahajobs Portal of the Government of Maharashtra has been created with the objective of enabling the unemployed youth in the state to find employment with the help of various skills and to overcome the problem of shortage of workers so that the industries can carry out their work smoothly. We are constantly striving to provide the best service to job seekers and entrepreneurs.

राज्यातील बेरोजगार तरुणांची नोकरीची मागणी आणि कंपन्यांचा रोजगाराचा पुरवठा यांची सांगड घालण्यासाठी राज्य सरकारने महाजॉब्स पोर्टल लाँच केले आहे…

महाराष्ट्र शासनाच्या ‘महाजॉब्स’ पोर्टलचे राज्यातील बेरोजगार तरुणांना विविध कौशल्यांच्या सहाय्याने रोजगार शोधता यावा आणि आणि कामगारांची कमतरता या समस्येवर मात करुन उद्योगांना आपले कार्य सुरळितपणे पार पाडता यावे या उद्देशाने महाजॉब्स पोर्टल तयार केले गेले आहे. नोकरी शोधणा-या कामगारांना आणि उद्योजकांना सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे.

या पोर्टलची उद्दिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेतः

– नोकरी शोधणारे कामगार आणि उद्योजक यांच्यामधील दुवा.

– निरनिराळ्या प्रकारच्या कौशल्यसंचात मनुष्यबळाची मागणी व पुरवठा यांच्यातील दरी कमी करणे.

– उद्योगांना अखंडपणे कार्य करण्यास सक्षम करणे.

– महाराष्ट्रातील उद्योगांना योग्य स्थानिक कामगार मिळण्यासाठी कुशल मनुष्यबळासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करणे.

महाजॉब्स काय आहे?

‘महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि खेड्यापाड्यातील ग्रामीण आणि शहरी युवकांना त्यांच्या कौशल्याला साजेसा सर्वोत्तम जॉब मिळवण्याची व यशस्वी करिअर घडवण्याची संधी महाराष्ट्र सरकार उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे या युवकांना प्रगतीपासून आणि औद्योगिक क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग घेण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही. जर त्यांनी त्यांच्या कौशल्याला मेहनतीची जोड दिली तर त्यांच्या प्रगती पुढे आकाश ठेंगणे होणार आहे. महाराष्ट्राला प्रगतीच्या पुढच्या पातळीवर घेऊन जाणे हेच आमचे स्वप्न आहे औद्योगिक विकासासाठी घेत असलेल्या मेहनतीशिवाय पुढील सर्व आव्हानांना तोंड देत पुढे जाण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे,’ अशा शब्दात राज्य सरकारने या पोर्टलचे उद्दिष्ट स्पष्ट केले आहे.

महाजॉब्ज कसे वापरावे?

– जॉब शोधण्यासाठी उद्योगासाठी लॉगिनचे नोकरी शोधक नोंदणी आणि उद्योजक नोंदणी असे दोन पर्याय इथे देण्यात आलेले आहेत.
– उद्योजक नोंदणी: लॉगिन केल्यानंतर कंपन्यांनी आपली नोंदणी करून कंपनीच्या सध्याच्या मनुष्यबळाविषयी आवश्यकता येथे नोंदवावी.
– नोकरी शोधक नोंदणी: कुशल-अकुशल अर्धकुशल अशा जॉबच्या शोधात असलेल्या व्यक्तीने नाव नोंदणीसाठी आपली तपशीलवार वैयक्तिक माहिती भरावी.
महाजॉब्स पोर्टलवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

या संकेतस्थळावर अशी करा नोंदणी…

१.‘महाजॉब्स’ या http://mahajobs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावा.
२. प्रथम तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी ही माहिती भरा. त्यानंतर मोबाईल किंवा ईमेल आयडीवर ओटीपी क्रमांक येईल. तो ओटीपी क्रमांक मॅच झाल्यास तुमच्या नावाने नोंदणी होईल.
३. त्यानंतर तुमची शैक्षणिक संबंधित सर्व माहिती भरावयाची आहे.
४ .याबरोबरच तुम्ही एखाद्या कामामध्ये पारंगत, कुशल असल्यास तुमच्या कौशल्याविषयी माहितही देवू शकता.
५. त्यानंतर दिसत असलेला कॅपच्या (captcha) व्यवस्थित टाईप करा.
६. यानंतर सबमिट करा.
७ .तुम्ही नोंदणी करुन सबमिट केल्यानंतर ‘Registration done successfully’ असा मेसेज येईल.

ही कागदपत्रे अपलोड करावीत…

– महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) अपलोड करणे अनिवार्य आहे.
– शैक्षणिक प्रमाणपत्र
– कौशल्य प्रमाणपत्र
– फोटो

Leave a Comment