Mahapariksha Portal Closed Now

Mahapariksha Portal Closed Now

अखेर महापोर्टल बंद होणार; महाभरतीचे काम नव्या संस्थेला देण्यासाठी कार्यवाही सुरू

Government issued direction to shut mahapariksha portal recruitment will be done by new organisation. The government has issued a government order to appoint a new institute instead of a corporation for the recruitment of groups ‘C’ and ‘D’ in the state government. The government has announced the selection of a new organization through Maha IT for the Mahabharati of the Alliance for Development. Read the complete details carefully.

Mahapariksha Portal Issues

मुंबई : तत्कालिन फडणवीस सरकारने नोकरभरती साठी निवडलेल्या महापोर्टल मधे सावळागोधळ असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हे महापोर्टल रद्द करून नव्याने सुधारणा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज याबाबतची कार्यवाही सुरू करण्याचा आदेश सरकारने जाहिर केला.

राज्य शासनातील गट ‘क’ व ‘ड’ च्या पदभरतीसाठी महापोर्टल ऐवजी  नव्या संस्थेची निवड करण्याचा शासन आदेश सरकारने झाहिर केला. महाविकास आघाडी सरकारच्या महाभरतीसाठी  महाआयटी मार्फत  नव्या संस्थेची निवड करण्याचे आदेश सरकारने जाहिर केले.

महापोर्टलबाबत आलेल्या तक्रारीनंतर महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय तत्कालिन फडणविस सरकारच्या निर्णयाला धक्का मानला जात आहे. महापोर्टलच्या माध्यमातून फडणविस सरकारने नोकर भरतीचा मेगा कार्यक्रम सुरू केला होता. पण तलाठी भरतीसह इतर नोकरभरतीत महापोर्टलच्या कार्यपध्तीवर शाकडो तक्रारी दाखल झाल्या होत्या. महापोर्टल ची भरती प्रक्रिया सदोष असल्याचे अनेक उमेदवारांचे मत होते. त्यामुळे हे महापोर्टल रद्द करण्याची मागणी घेवून राज्यभरात आंदोलन सुरू होते.

खासदार सुप्रिया सुळे यांनीही महापोर्टल रद्द करून नव्याने सुधारणा करण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार सुरूवातीला महापोर्टल च्या माध्यमातून होणार्या नोकरभरतीला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली होती. आज सरकारने काढलेल्या आदेशात महापोर्टलला सकम व पारदर्शक पध्दतीने नोकरभरती करणारा नविन पर्याय शोधण्याचे आदेश महाआयटी विभागाला दिले आहेत.

सौर्स: सकाळ

Leave a Comment