Maharashtra Gram Vikas Vibhag Bharti 2021

Gram Vikas Vibhag Bharti 2021

Gramvikas Vibhag Bharti 2021 . RRD Maharashtra has been resumed as per the advertisement issued in March 2019 to fill the Group ‘C’ category posts in the Zilla Parishad Health Department under the Rural Development Department. These include health workers, health workers, laboratory technicians, drug manufacturers and health supervisors. Candidates who have applied for the respective posts as per the advertisement in March 2019 are required to visit www.maharddzp.com and create their login ID and password.

Gram Vikas Vibhag Recruitment 2021

ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागातील गट ‘क’ संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च 2019 मध्ये काढण्यात आलेल्या जाहिरातीनुसार सदरची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या पदांचा समावेश आहे.

Gram Vikas Vibhag Bharti 2021: मार्च 2019 मधील जाहिरातीनुसार संबंधित पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी www.maharddzp.com या संकेतस्थळावर जाऊन आपला लॉगीन आयडी व पासवर्ड क्रिएट करणे आवश्यक आहे. यापूर्वी आवेदनपत्रे सादर केलेल्या उमेदवारांपैकी समाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातील उमेदवारांव्यतिरिक्त इतर प्रवर्गातून अर्ज सादर केलेले उमेदवार संबंधित प्रवर्गातून परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षण रद्द ठरविले आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात अथवा आर्थिकदृष्टय़ा दुर्बल प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेणे ऐच्छिक असेल.

ZP Bharti 2021 District wise details are provided in below Table, Check the link below of respective district for detail information

Name of District Click on District For Information Maha ZP Recruitment
Nagpur Nagpur ZP Bharti
Nashik Nashik ZP Bharti
Aurangabad Aurangabad ZP Bharti
Pune Pune ZP Bharti
Akola Akola ZP Bharti
Amravati Amravati ZP Bharti
Buldhana Buldhana ZP Bharti
Yavatmal Yavatmal ZP Bharti
Washim Washim ZP Bharti
Gadchiroli Gadchiroli ZP Bharti
Beed Beed ZP Bharti
Jalna Jalna ZP Bharti
Osmanabad Osmanabad ZP Bharti
Latur Latur ZP Bharti
Nanded Nanded ZP Bharti
Hingoli Hingoli ZP Bharti
Parbhani Parbhani ZP Bharti
Thane ZP Thane Bharti
Palghar Palghar ZP Bharti
Raigad ZP Raigad Bharti
Ratnagiri Ratnagiri ZP Bharti
Sindhudurg ZP Sindhudurg Bharti
Bhandara Bhandara ZP Bharti
Chandrapur ZP Chandrapur  Bharti
Gondia Gondia ZP Bharti
Wardha Wardha ZP Bharti
Ahmednagar Ahmednagar ZP Bharti
Dhule Dhule Gram Vikas Vibhag Bharti
Jalgaon Jalgaon ZP Bharti
Nandurbar Nandurbar ZP Bharti
Kolhapur Kolhapur ZP Bharti
Sangli Sangali ZP Bharti
Satara ZP Satara Bharti
Solapur Solapur ZP Bharti

Maharashtra Gram Vikas Vibhag Recruitment 2021

याअनुषंगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवाराने संकेतस्थळावर 1 ते 14 सप्टेंबर या कालावधीत विकल्प द्यावयाचे आहेत. उमेदवाराने आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गाचा विकल्प निवडला असेल तर परिक्षेपूर्वी त्याबाबतचे प्रमाणपत्र निवड समितीकडे सादर करणे बंधनकारक आहे. जे एसईबीसी प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गासाठीचा विकल्प देतील किंवा आर्थिकदृष्टय़ा मागासप्रवर्गाचा विकल्प सादर करणार नाहीत. पण, खुल्या प्रवर्गातील वयोमर्यादेसाठी पात्र आहेत, त्यांना खुल्या प्रवर्गातील उमेदवार म्हणून गणण्यात येणार आहे. त्यांनी 1 ते 14 सप्टेंबर या कालावधीत परीक्षा शुल्क अदा केल्याबाबतची माहिती संकेतस्थळावर देण्sा बंधनकारक आहे.

Gram Vikas Vibhag Bharti Registration: सदर परीक्षा राज्यातील सर्व जिल्हा परिषदमध्ये एकाचवेळी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना एकाच जिल्हा परिषदेमध्ये रिक्तपदासाठी अर्ज करता येईल. त्यामुळे उमेदवारांनी एकाच जि. प. चा विकल्पही संकेतस्थळावर 1 ते 14 सप्टेंबर 2021 या कालावधीत नोंदविणे आवश्यक आहे.

दरम्यान, यात दिव्यागांच्या नव्याने समाविष्ट प्रवर्गाकरिता तसेच एसईबीसी मागास प्रवर्ग रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गात नव्याने वाढलेल्या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त इतर प्रवर्गासाठी जाहिरात देता येणार नाही. नव्याने समाविष्ठ झालेल्या दिव्यांगांच्या प्रवर्गातील उमेदवाराने जर यापूर्वीच्या मार्च 2019 मध्ये प्रसिद्ध जाहिरातीनुसार खुल्या अथवा इतर प्रवर्गातून अर्ज केला असल्यास त्यांना दिव्यांग आरक्षणाचा विकल्प देणे आवश्यक असेल. तसेच यापूर्वी अर्ज सादर केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी पदनिहाय आरक्षणात बदल होत असल्याने दिव्यांगासाठी नव्याने प्रसिद्ध होणाऱया जाहिरातीनुसार विकल्प देणे आवश्यक आहे.

याबाबतचे जाहीर प्रकटन 25 व 26 ऑगस्ट रोजी होणार आहे. विकल्पासाठीची मुदत 1 ते 14 सप्टेंबर आहे. नव्याने समाविष्ट दिव्यांग तसेच नव्याने वाढलेल्या खुल्या प्रवर्गातील रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज 1 ते 21 सप्टेंबर या कालावधीत मागविण्यात येणार आहेत. जिल्हा निवड समितीने आयोजनाबाबतची कार्यवाही करावयाची आहे. यात परीक्षा केंद्र निश्चिती 22 ते 29 सप्टेंबर, पर्यवेक्षक, अधिकारी, कर्मचारी नियुक्त्या 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत करावयाच्या आहेत.

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी 6 ते 15 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी असणार आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषध निर्मातासाठी 16 ऑक्टोबर रोजी तर आरोग्य सेवक, सेविका व आरोग्य पर्यवेक्षकसाठी परीक्षा 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे. लेखी परीक्षेनंतर आन्सर की प्रसिद्ध करणे, उमेदवारांना ऑब्जेक्शन फायलिंग, अंतिम निकाल, अंतिम यादी, पात्र उमेदरवारांची यादी प्रसिद्ध करण्यासाठी 18 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर हा कालावधी देण्यात आला आहे.

Leave a Comment