Mahavitaran Bharti 2022

Mahavitaran Vacancy 2022

Mahavitaran Bharti 2022: MSEDCL has started the recruitment process for the posts of Apprentice (Electrician, Wireman, Computer Operator). Candidates can submission of application form through given link before 18th July 2022. More details about Mahavitaran Bharti 2022 like application and application address are given below. 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MahaDiscom) नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शिखाऊ उमेदवार (विजतंत्री,तारतंत्री, संगणक ऑपरेटर) पदाच्या विविध रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 18 जुलै 2022 पर्यंत अर्ज करणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महावितरण भरती 2022

विभागाचे नाव  Maharashtra State Electricity Distribution Company Limited
 Name of Posts (पदांचे नाव)  Apprentice (Electrician, Wireman, Computer Operator)
 Total Vacancies (एकूण पदसंख्या)  – Posts
 Application Mode  Online Application Forms
Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.mahadiscom.in

पदांची तपशीलवार माहिती

1 Apprentice (Electrician, Wireman, Computer Operator)

  Educational Qualification Eligibility For Mahavitaran Recruitment
शैक्षणिक पात्रता 

  • For Apprentice (Electrician, Wireman, Computer Operator)
10th Pass and ITI

⏰ All Important Dates 

⏰ Last Date (शेवटची तारीख) – 28/07/2022
[quads id=1]

How To Apply For Mahavitaran  Vacancy 2022:

  • To apply to the posts eligible applicants need to apply online by using following online applications link
  • Applicants have to get register online by using the following link
  • Fill the online applications form by mentioning all require details
  • Complete the online applications form before the closing date.
  • Closing date of online Application is 18th July 2022

Important Link of  Mahavitaran Mumbai Bharti 2022

? वेबसाईट लिंक
📝 ऑनलाईन अर्ज
? जाहिरात-1


Mahavitaran Bharti 2021

महावितरणमध्ये 25 हजार 800 पदे रिक्त

MSEDCL, the largest power distribution company in the country, has 25,800 vacancies. With the number of retiring employees increasing day by day, on the other hand, the number of power consumers is increasing rapidly. This is increasing the stress on the existing employees. Read Below details

देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी अशी ओळख असलेल्या महावितरणमध्ये तब्बल 25 हजार 800 अधिकारी-कर्मचाऱयांची पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. निवृत्त होणाऱया कर्मचाऱयांमुळे त्यामध्ये दिवसागणिक भर पडत आहे, तर दुसरीकडे वीज ग्राहकांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेले कर्मचाऱयांवर ताण वाढतो आहे.

महावितरणचे राज्यभरात अडीच कोटी वीज ग्राहक असून त्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी 87 हजार 627 अधिकारी-कर्मचाऱयांची मंजूर पदे आहेत. या मंजूर पदांपैकी आज 68 टक्के कर्मचारी-अधिकारी कार्यरत असून जवळपास 32 टक्के पदे रिक्त आहेत. वर्ग-1 मध्ये 1676 पदे मंजूर असली तरी 230 पदे रिक्त आहेत. वर्ग-2 मध्ये 6433 मंजूर पदे असून त्यापैकी 708 पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱयांवर कामाचा ताण येत असल्याने कंत्राटी वीज कामगारांची मदत घ्यावी लागत असल्याचे महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.

रिक्त पदांमध्ये फिल्डवर काम करणाऱयांची मोठी संख्या 

महावितरणमध्ये एकूण पदांच्या जवळपास 32 टक्के पदे रिक्त असली तरी त्यामध्ये प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱया कर्मचाऱयांची मोठी संख्या आहे. वर्ग एकमधील 17 टक्के, वर्ग दोनमधील 12 टक्के पदे रिक्त आहेत, तर वर्ग तीनमधील 34 टक्के तर वर्ग चारमधील रिक्त पदांचे प्रमाण 35 टक्के एवढे मोठे आहे. वर्ग तीन आणि चारमधील कर्मचारी प्रत्यक्ष फिल्डवर काम करत असून त्यांच्याच रिक्त पदांची संख्या मोठी आहे.


महावितरणच्या भरतीचा मार्ग मोकळा

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे ऊर्जा विभागाच्या महावितरणमधील भरतीत अडचणीत आलेल्या एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना राज्य सरकारने मोठा दिलासा देत त्यांची भरती ऐच्छिक स्वरूपात आर्थिक दुर्बल घटकांच्या (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे महावितरणमधील ७५०० पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

महावितरणने विद्युत साहाय्यक व उपकेंद्र सहायक यांच्या ७५०० पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केलेली प्रक्रिया करोनामुळे रखडली होती. करोनानंतर ही भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतल्यानंतर त्यात मराठा आरक्षणाला मिळालेल्या अंतरिम स्थगितीचाही अडसर निर्माण झाला. त्यामुळे डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्यानंतर अखेर मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे अडचण झालेल्या उमेदवारांना दिलासा देण्यासाठी त्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून भरती प्रक्रियेत सामावून घेण्याचा तोडगा काढण्यात आला.

त्यानुसार याबाबतचा निर्णय होऊन आदेश काढल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले. तर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भात २३ डिसेंबर २०२० रोजी शासन निर्णय जारी केला होता. त्या शासन निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे अंतिम टप्प्यात येऊन थांबलेल्या भरती प्रक्रियांमधील एसईबीसी उमेदवारांना ऐच्छिक स्वरूपात ईडब्ल्यूएसचा लाभ देण्यात आला होता. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने ऊर्जा विभागाप्रमाणेच इतर विभागांनीही आदेश जारी करावेत, अशी सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. त्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.


महावितरणमध्ये सात हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

Mahavitaran Bharti 2020 For 7000 Posts – नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महावितरण कंपनीत उप-केंद्र सहायक (२०००) व विद्युत सहायक (५०००) अशा तब्बल ७ हजार पदांची भरती करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत ही पदे तातडीने भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स.

महावितरणमध्ये अनेक पदे रिक्त असून, ही पदे भरण्याबाबत रेटा वाढला होता. याची दखल घेत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी २३ जून रोजी उपकेंद्र सहायक व विद्युत सहायकांची पदे भरण्याचे आदेश २३ जून रोजी दिले होते; परंतु कोरोना संकटाच्या पृष्ठभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती.

मंगळवार, ४ जून रोजी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी ही पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले.

भरती दोन टप्प्यात

महावितरणकडून ही भरती दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात उप-केंद्र सहायकांचे दस्तावेज तपासणी करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर विद्युत सहायक पदासाठीच्या परीक्षांचा निकाल जाहीर करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ७००० जागांची भरती असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग आणि कोविड प्रतिबंधात्मक नियमांच्या अधीन राहून ही पदभरती करण्यात यावी, असे निर्देश ऊजामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.

Leave a Comment