Mega Bharti 2022 मेगा भरती जाहिरात २०२२

Mega Bharti 2022 Latest Updates

As per the latest updates regarding the Mega Bharti 2022 is that Chief Minister Eknath Shinde has given an order today to submit the mega recruitment proposal in the next cabinet meeting. Shinde is also believed to have given an order that the recruitment papers should be prepared quickly, stating that it is impossible to start the development work when the number of vacancies is large. Total 2 lakh 75 thousand posts are vacant in Maharashtra in various department (Details are given below). A plan will be prepared as to how these posts will be recruited on the basis of reservation. During the tenure of Devendra Fadnavis as Chief Minister, 36 thousand posts were recruited. Then this process stopped due to change of government and Corona. Thousands of unemployed youth of Maharashtra will get relief due to this decision.

The administration of Home Department, Public Health Department, Water Resources Department, Revenue etc. departments has been affected due to insufficient number of employees. In Maharashtra, there are 50 thousand vacancies in A category, 75 thousand in B category, 1 lakh in C category and 50 thousand in D category. This recruitment will be done on the basis of reservation and point list after reviewing the vacancies and sanctioned seats. The proposal will be presented in the cabinet meeting.

Department wise Vacant Seats Details :

  1. 14,000 to 15,000 in the Home Department,
  2. 24,000 in the Public Health Department (out of which the process for 8,000 posts has started),
  3. 14,000 each in the Water Resources and Revenue Departments,
  4. 12,000 in Medical Education,
  5. 8,000 in Public Works
  6. 12 thousand 500 for other departments will be filled in the first phase.
  7. Employees will also be appointed for the vacancies in Zilla Parishad.

सरळ सेवा भरती २०२२ – राज्यात लवकरच मेगा भरतीला सुरुवात

  1. पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोकरभरतीचा प्रस्ताव सादर करा, असे आदेश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. रिक्तपदांची संख्या मोठी असताना विकासकामे मार्गी लागणे अशक्य आहे, असे सांगत भरतीबद्दलचे कागद त्वरेने तयार करावेत, असे आदेशही शिंदे यांनी दिल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.
  2. महाराष्ट्रात एकूण दोन लाख ७५ हजार पदे रिक्त आहेत. या पदांची आरक्षणनिहाय भरती कशी होईल, याचा आराखडा तयार केला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ३६ हजार पदांची भरती झाली होती. त्यानंतर सरकारबदल आणि कोरोनामुळे ही प्रक्रिया थांबली. महाराष्ट्रातील हजारो बेरोजगार तरुणांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. गृह विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, महसूल आदी विभागांचा कारभार अपुऱ्या कर्मचारीसंख्येमुळे प्रभावित झाला आहे. महाराष्ट्रात अ वर्गात ५० हजार, ब वर्गात ७५ हजार, क वर्गात १ लाख आणि ड वर्गात ५० हजार पदे रिक्त आहेत. रिक्त जागा आणि मंजूर जागांचा आढावा घेऊन आरक्षण आणि बिंदूनामावलीनुसार ही भरती करण्यात येणार आहे.
    शिंदे-फडणवीस सरकारला यासंबंधीचा जो आराखडा दिला जाणार आहे, त्यानुसार गृह विभागात १४ ते १५ हजार, सार्वजनिक आरोग्य विभागात २४ हजार (यातील ८ हजार पदांसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे), जलसंपदा आणि महसूल विभाग प्रत्येकी १४ हजार, वैद्यकीय शिक्षण १२ हजार, सार्वजनिक बांधकाम ८ हजार आणि अन्य विभागांसाठी १२ हजार ५०० या संख्येत कर्मचारी पहिल्या टप्प्यात भरले जातील. जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसाठीही कर्मचारी नेमले जाणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर केला जाईल.

Mega bharti 2022 updates for 10 lacs jobs : Today’s PM Modi Tweet that PM Announces To Create 10 Lakh Jobs in Next 1.5 Years. Prime Minister Narendra Modi tweeted and said that the, “Reviewed the status of Human Resources in all departments and ministries and instructed that recruitment of 10 lakh people be done by the Government in mission mode in next 1.5 years.” The move to provide the 10 Lakh Jobs in Next 1.5 Years will certainly will be a huge opportunity and certainly the mission initiated by the union government will provide major jobs to the youth.

As per the Prime Minister has reviewed the he status of Human Resources in all departments and ministries so it is expected that in all the leading government departments including ministries will provide the job opportunities for the candidates who awaited for Mega Bharti 2022.

As we know, Railway which plays crucial role in providing job opportunities on mass level in various grades and certainly it will be major job provider once again in this regards.  Apart from Railway, Postal department, PSU and various ministries have also chance to provide jobs as per expectation.

पुढच्या 1.5 वर्षात 10 लाख नोकऱ्या निर्माण करण्याची घोषणा PM मोदींनी केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून सांगितले की, “सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधनांच्या स्थितीचा आढावा घेतला आणि पुढील 1.5 वर्षांत मिशन मोडमध्ये 10 लाख लोकांची भरती सरकारकडून करण्यात यावी, असे निर्देश दिले.” पुढील 1.5 वर्षात 10 लाख नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे पाऊल निश्चितच मोठी संधी असेल आणि केंद्र सरकारने सुरू केलेले मिशन तरुणांना मोठ्या नोकऱ्या उपलब्ध करून देईल. पंतप्रधानांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधनाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानुसार, अशी अपेक्षा आहे की मंत्रालयांसह सर्व आघाडीच्या सरकारी विभागांमध्ये मेगा भारती 2022 ची वाट पाहत असलेल्या उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. आपल्याला माहिती आहे की, विविध श्रेणींमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी रेल्वे आणि निश्चितपणे या संदर्भात पुन्हा एकदा मुख्य रोजगार प्रदाता ठरेल. रेल्वे व्यतिरिक्त, पोस्टल विभाग, PSU आणि विविध मंत्रालयांना देखील अपेक्षेनुसार नोकऱ्या देण्याची संधी आहे.


Mega Bharti 2022 for 275000 posts in Maharashtra: Now the biggest news in regard of Maha Mega Bharti is that Mahavikas Aghadi has taken a big decision on mega recruitment in few days. Accordingly, mega recruitment for 2,75,000 posts will be held in the state soon. As many as 53 lakh vacancies have been reported in 42 divisions in the state.

Mega Bharti 2022 for 2.44 lac vacant posts in various department of government of Maharashtra. Three per cent of state government employees retire every year. Compared to that, recruitment is not done, so the backlog increases. According to RTI activist Anil Galgali, out of 2.44 lakh vacancies, 1 lakh 92 thousand 425 are for government employees and 51 thousand 980 are for Zilla Parishad employees. Although an average of 23 per cent posts are vacant, in some departments the proportion is 30 to 50 per cent. Read the more details given below on this page and keep visit on our www.govexam.in for the further & Latest updates.

महाराष्ट्रात राज्यात तब्बल २.४४ लाख पदे रिक्त, गृह विभागात सर्वात अधिक रिक्त पदे

  1. महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दोन लाख ४४ हजार पदे रिक्त असल्याची आकडेवारी माहिती अधिकारात उघड झाली असून, गृह विभागात सर्वात अधिक रिक्त पदे असल्याचे दिसते. विशेष म्हणजे, ही आकडेवारी डिसेंबर २०२० पर्यंतची असून त्यानंतर रिक्त पदांचा अनुशेष वाढला आहे. राज्य सरकारचे तीन टक्के कर्मचारी दरवर्षी निवृत्त होतात. त्या तुलनेत भरती केली जात नाही, त्यामुळे अनुशेष वाढत जातो. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची एकूण संख्या १७ लाख इतकी आहे. त्यातील शासकीय विभाग आणि जिल्हा परिषदांच्या कर्मचाऱ्यांची संख्या १० लाख ७० हजार ८४० आहे. त्यापैकी ८ लाख २६ हजार ४३५ पदे ही भरलेली होती. म्हणजे २ लाख ४४ हजार ४०५ पदे ही रिक्त होती. या कर्मचाऱ्यांमध्ये अनुदानित शाळा, संस्थांमधील कर्मचारी, महामंडळांचे कर्मचारी, आदींचा समावेश नाही.
  2. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही आकडेवारी मिळविली असून, त्यानुसार २.४४ लाख रिक्त पदांपैकी शासकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदे १ लाख ९२ हजार ४२५, तर जिल्हा परिषदांच्या कर्मचाऱ्यांची रिक्त पदे ५१ हजार ९८० आहेत. सरासरी २३ टक्के पदे रिक्त असली तरी काही विभागात हे प्रमाण ३० ते ५० टक्के इतके आहे.
  3. राज्य सरकारच्या प्रशासनातील एकूण २९ शासकीय विभाग, जिल्हा परिषद आस्थापनात मंजूर पदांची संख्या १० लाख ७० हजार ८४० इतकी आहे. यापैकी आठ लाख २६ हजार ४३५ पदे भरलेली आहेत. तर दोन लाख ४४ हजार ४०५ पदे रिक्त आहेत, अशी आकडेवारी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना सरकारने उपलब्ध करुन दिली आहे. एकूण मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांची माहिती गलगली यांनी ११ मे २०२२ रोजी माहिती अधिकारात मागितली होती. त्यास सामान्य प्रशासन विभागाने वरीलप्रमाणे उत्तर दिल्याचे गलगली यांचे म्हणणे आहे.
  4. शासकीय कर्मचाऱ्यांची एक लाख ९२ हजार ४२५ रिक्त पदे आहेत, तर जिल्हा परिषदेच्या संवर्गातील ५१ हजार ९८० पदे रिक्त आहेत. गृह विभागाची एकूण मंजूर पदे दोन लाख ९२ हजार ८२० असून त्यापैकी ४६ हजार ८५१ पदे रिक्त आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाची एकूण मंजूर पदे ६२ हजार ३५८ असून त्यापैकी २३ हजार ११२ पदे रिक्त आहेत.
  5. जलसंपदा विभागाची एकूण मंजूर पदे ४५ हजार २१७ असून त्यापैकी २१ हजार ४८९ पदे रिक्त आहेत. महसूल व वन विभागाची एकूण मंजूर पदे ६९ हजार ५८४ असून त्यापैकी १२ हजार ५५७ पदे रिक्त आहेत. उच्च व तंत्र विभागाची एकूण मंजूर पदे १२ हजार ४०७ असून त्यापैकी तीन हजार ९९५ पदे रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची एकूण मंजूर पदे ३६ हजार ९५६ असून त्यापैकी १२ हजार ४२३ पदे रिक्त आहेत.
  6. आदिवासी विकास विभागाची एकूण मंजूर पदे २१ हजार १५४ असून त्यापैकी सहा हजार २१३ पदे रिक्त आहेत. शालेय शिक्षण व क्रिडा विभागाची एकूण मंजूर पदे सात हजार ५० असून त्यापैकी तीन हजार ८२८ पदे रिक्त आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाची एकूण मंजूर पदे २१ हजार ६४९ असून त्यापैकी सात हजार ७५१ पदे रिक्त आहेत. सहकार पणन विभागाची एकूण मंजूर पदे आठ हजार ८६७ मंजूर पदे असून त्यापैकी दोन हजार ९३३ पदे रिक्त आहेत. सामाजिक न्याय विभागाची एकूण मंजूर पदे सहा हजार ५७३ असून, त्यापैकी तीन हजार २२१ पदे रिक्त आहेत.
  7. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाची एकूण मंजूर पदे आठ हजार १९७ असून त्यापैकी तीन हजार ६८६ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे शासकीय सेवेच्या कामकाजात दिरंगाई होते. त्याचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो असे गलगली यांचे म्हणणे आहे.

Mega Bharti 2022 मेगा भरती जाहिरात २०२२: Today’s Latest updates regarding the Mega Bharti 2022 is that the government has decided to recruit on a contract basis to reduce the burden of expenditure on the state coffers. The Maharashtra State cabinet had decided to fill 100% posts for Group C & Group D in the Medical Education, Arogya Vibhag and Home Departments (Police Bharti 2022) through direct service recruitment सरळ सेवा भरती २०२२ process. This will save you about 20 to 30 % of the cost. Read the more details given below and keep visit on our website www.Govexam.in for the latest updates of Mega Bharti 2022 मेगा भरती जाहिरात २०२२.

सरळ सेवा भरती २०२२ – राज्यात विविध पदांसाठी कर्मचाऱ्यांची कंत्राटी मेगाभरती

  1. राज्य सरकारच्या तिजोरीवरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नोकरभरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे वीस ते तीस टक्के खर्चात बचत होणार आहे. या भरतीला कर्मचारी संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
  2. शासकीय खर्च आटोक्यात येऊन विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा म्हणून कर्मचाऱ्यांच्या नवीन पदनिर्मिती न करता कर्मचारी सेवेचे आऊटसोर्सिंग (बाह्ययंत्रणेद्वारे) करण्याचा निर्णय राज्याच्या वित्त विभागाने घेतला आहे. सरकारी सेवेतील काही कामे बाह्ययंत्रणेकरून केली जातील. त्यामुळे सरकारी खर्चात वीस ते तीस टक्के बचत होईल. मंत्रालयीन विभागातील लिपिक, टंकलेखक, स्वीय सहायक, लघुटंकलेखक, सर्व कार्यालयांमधील कनिष्ठ लेखापाल ही पद नियमितपणे भरणे आवश्यक असल्याने बाह्ययंत्रणेतून वगळण्याचा निर्णयही वित्त विभागाने घेतला आहे.
  3. वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि गृह विभागातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील १०० टक्के पदे ही सरळसेवा पद्धतीने भरण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. मात्र, शासकीय रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ही पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरण्याची भूमिका वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख घेत असल्याची टीका कर्मचारी संघटनांनी केली आहे.

Name of posts will be filled कोणत्या पदांची होणार कंत्राटी भरती

  1. संगणक अभियंता,
  2. डेटा एंट्री ऑपरेटर,
  3. वाहनचालक,
  4. माळी व इतर अर्धकुशल कामगार
  5. टेलिफोन ऑपरेटर,
  6. लिफ्ट ऑपरेटर,
  7. केअरटेकर,
  8. शिपाई,
  9. चपराशी,
  10. चौकीदार,
  11. सफाई कर्मचारी,
  12. मदतनीस,
  13. हमाल व इतर पदे.

Mega recruitment of 50,000 posts is expected in the state after April

Mega Bharti 2022: After April, the recruitment process for about 50,000 posts will be carried out in the state in three phases. This includes 14,000 posts in the Water Resources Department and 12,000 in the Home Department. Read the more details given below:

एप्रिलनंतर राज्यात 50 हजार पदांची मेगाभरती अपेक्षित

राज्याच्या महत्वपूर्ण विभागांमधील रिक्‍तपदांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याने एप्रिलनंतर राज्यात तीन टप्प्यात जवळपास 50 हजार पदांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यात जलसंपदा विभागातील 14 हजार, गृह विभागातील साडेबारा हजार पदांचा समावेश आहे.

  • जलसंपदा, ग्रामविकास, गृह, आरोग्य, कृषी व पशुसंवर्धन, अन्नधान्य वितरण, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, मराठी भाषा विभाग यासह अन्य 42 विभागांमध्ये तब्बल तीन लाखांपर्यंत पदे रिक्‍त झाली आहेत.
  • तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात 70 हजार पदांची मेगाभरती होईल, अशी घोषणा झाली. परंतु, रिक्‍तपदांची भरती होऊ शकली नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर काही महिन्यांतच कोरोनाचे संकट आले आणि मेगाभरतीचा विषय मागे पडला.
  • आता कोरोनाची स्थिती सावरली असून राज्याची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागली आहे. दुसरीकडे राज्यातील शासकीय विभागांमधील रिक्‍त पदांची वाढलेली संख्या आणि शासकीय योजनांपासून दूर राहिलेले लाभार्थी, या पार्श्‍वभूमीवर आता टप्प्याटप्याने रिक्‍तपदे भरण्याचे नियोजन शासकीय पातळीवर सुरु झाले आहे. आरक्षण पडताळणीनंतर वित्त विभागाच्या मान्यतेने ही पदे भरली जाणार आहेत.
  • राज्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली असून त्यांना या भरतीच्या निमित्ताने शासकीय सेवेत संधी देण्याचे सरकारचे नियोजन असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. तीन टप्प्यात होणाऱ्या या भरती प्रक्रियेत पहिल्यांदा गृह व आरोग्य व सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्‍त पदे भरण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर शालेय शिक्षण, ग्रामविकास, जलसंपदा व कृषी विभागातील पदांची भरती होईल. शेवटच्या टप्प्यात गरजेनुसार अन्य विभागांमधील पदांची भरती प्रक्रिया राबविली जाईल, असेही सांगण्यात आले.

2 thoughts on “Mega Bharti 2022 मेगा भरती जाहिरात २०२२”

Leave a Comment