MPSC Exam Postponed

Again MPSC Exam Postponded

Maharashtra Public Service Commission (MPSC) has given notification for conducting Engineering Service Prelims Exam 2020 for the recruitment of Assistant Executive Engineer, Assistant Engineer vacancies. Those Candidates who have applied for these recruitment drive, read this information carefully, as previously MPSC Engineering Service Prelims Exam 2020 is going to conduct on 17th May 2020 but due to rapid increase in cases of CORONA Virus in our Country, Commission has released a notification of Postponing this exam. New dates will be updated soon by commission till then Study hard…..

एमपीएससीनं अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलली

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन लागू आहे. त्यामुळे करोनाचा फैलाव रोखण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १७ मे २०२० रोजी होणारी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलली आहे. याबाबत एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे एमपीएससीनं माहिती दिली आहे.

प्रसिद्धीसाठी दिलेल्या परिपत्रकात आयोगानं म्हटलं की, नोवेल करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सुरु असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दि. १७ मे २०२० रोजी होणारी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० सार्वजनिक हितासाठी पुढे ढकलण्यात येत आहे.

लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतर आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या दिनांकांबाबत घोषणा करण्यात येतील.

 

 


MPSC Exam Postponed-Latest Update

MPSC Exam 2020: We are giving you  latest Update Regarding MPSC Exams, as earlier we have published an advertisement regarding MPSC Exam dates, which was conducting as per planned scheduled on 5th April 2020 instructed by the state government but according to latest Notification Released By Commission, Pre examination Of-State Services Exam And Combined Examination is postponed  in a view of the increasing prevalence of the Novel corona virus. Go through the complete details From given link For  more detail..

एमपीएससी परीक्षेसंदर्भात नवीन माहिती

प्राप्त झालेल्या अपडेट नुसार राज्यातील करोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा संयुक्त परीक्षा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अधिकृत परिपत्रका द्वारे जाहीर केला आहे.

या संदर्भात MPSC आयोगाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नोवेल करोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने दिनांक 22 मार्च 2020 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिनांक 26 एप्रिल 2020 व 10 मे 2020 रोजी नियोजित अनुक्रमे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट – ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या दोन्ही सार्वजनिक हितास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत.

सध्या कोरोना परिस्थिती मुळे आपण घरी असाल तर एक महत्वाची बातमी, सध्या आम्ही मोफत MPSC सराव परीक्षा (टेस्ट सिरीज) सुरु केल्या आहे. यात रोज दोन नवीन पेपर प्रकाशीत होत असतात. या पेपर्स मध्ये MPSC परीक्षेस उपयुक्त प्रश्न समाविष्ट आहेत. तेव्हा या लिंक वरून रोज या पेपर्सचा सराव करावा. 


MPSC Pre exam will be done on as per schedule

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० नियोजित वेळेनुसारच होणार

MPSC Pre Exam 2020 : AS per the latest news MPSC has announced that the pre- exams 2020 will be conducted according to the planned schedule. The state government has advised against taking any test from March 16 to 31, in view of the increasing prevalence of the corona virus. However, as there is no examination of the MPSC during this period, the pre-examination on April 5 will be conducted according to the scheduled schedule. The Commission has informed the Commission through a letter. Read the details carefully…

MPSC Engineering Services Bharti 2020

मुंबई : राज्यसरकारने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षा ३१ मार्च २०२० पर्यंत पुढे ढकलण्याची सूचना दि. १५ मार्च २०२० च्या शासन पत्राद्वारे केली होती. मात्र, आयोगाच्या पूर्व नियोजित वेळापत्रकात १६ मार्च ते ३१ मार्च २०२० या कालावधीत आयोगामार्फत कोणतीही परीक्षा घेण्याचे प्रस्तावित नाही.’

त्यावर राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० नियोजित वेळेनुसारच होणार असल्याचे लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे. राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ५ एप्रिल २०२० रोजी आयोजित करण्यात आली आहे.

याबाबत राज्यसेवा आयोगाने १७ मार्च रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. आयोगाने असे म्हटले आहे की, ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार रविवार दि. ५ एप्रिल २०२० रोजी घेण्याचे नियोजित आहे. या परीक्षेच्या आयोजनासंदर्भातली पूर्वतयारी झाली असल्याने योग्य ती दक्षता घेऊन पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० घेण्यात येईल.’

दरम्यान, ३१ मार्चपर्यंत करोनाच्या प्रादुर्भावाविषयी राज्यातील परिस्थितीचा आणि त्यावेळी राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येईल, असेही आयोगाने कळवले आहे. त्यानुसार ५ एप्रिलच्या पूर्व परीक्षेबाबत फेरआढावा घेण्यात येणार आहे. मात्र तूर्त तरी ५ एप्रिलला परीक्षा होईल असे मानून उमेदवारांनी अभ्यासाची तयारी सुरू ठेवावी.

सौर्स : डेलीहंट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *