MSRTC Bharti 2020

MSRTC Bharti 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने २०१९ मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत सेवेत दाखल झालेल्या एसटी चालक आणि वाहकांनाची सेवा तात्पूरत्या स्वरुपात खंडीत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एसटी कामगार संघटनेत तिव्र नाराजी होती. मात्र आता एसटी महामंडळाने सरळसेवा भरती अंतर्गत सेवेत दाखल झालेल्या ४ हजार ५०० कर्मचार्‍यांना दिलासा दिला आहे. या कर्मचार्‍यांच्या सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठविण्यात आली आहे.

पूर्ण MSRTC Bharti GR बघण्यासाठी येथे क्लिक करा 

२०१९ मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत सुमारे ४५०० पात्र उमेदवारांपैकी १३०० उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण करून चालक तथा वाहक पदावर रोजंदार गट क्र. १ मध्ये एसटी महामंडळात नियुक्त्या दिलेल्या आहेत तसेच सुमारे ३२०० चालक तथा वाहक पदाकरीता प्रशिक्षण सुरू आहे. मात्र कोरोनामुळे एसटी बसची सेवा गेल्या पाच महिन्यापासून पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे एसटी प्रवासी सेवा हा उत्पन्नाचा प्रमुख मार्ग बंद झाला होता. तसेच लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून मुंबई अत्यावश्यक कर्मचार्‍यांसाठी विशेष सेवा चालविण्यात येत आहे. राज्यात अडकलेल्या मजुरांच्या घरवापसीसाठी देखील वाहतुक केली. त्याशिवाय जून महिन्यात एसटीची तालुका ते गाव सेवाही सुरु झाली.

परंतु कोरोनाच्या भितीमुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरविली असल्याने महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. महामंडळाकडे कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठी देखील निधी नाही. त्यामुळेच उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशाने महामंडळ अनेक उपाययोजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणन एसटीतील रोजंदारीवरील कर्मचार्‍यांची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय जुलै महिन्यात घेतला होता.

मात्र आता राज्यात एसटीची वाहतुक २० ऑगस्टपासुन सुरु झाली आहे. त्यानुसार महामंडळाने सरळसेवा भरती सन २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक आणि अनुकंपा तत्वावरील प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणास देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आली असल्याचे परिपत्रक गुरुवारी ३ सप्टेंबर रोजी काढले आहे. यामुळे रोजंदारीवरील कर्मचार्‍यांच्या हाताला आता काम मिळणार आहे.

Leave a Comment