Nashik Mahangarpalika Bharti 2022

Nashik Mahanagarpalika Bharti 2022

Nashik Mahanagarpalika Bharti 2022: Nashik Municipal Corporation, under National Health Mission, Nashik invite Application form  or the posts of Medical Officer, Staff Nurse, MPW.  Applications are invited 318 vacancies available to be get filled with the posts under Nashik Mahanagarpalika Recruitment 2022. Interested and eligible candidates submit their application form before 6th September 2022. 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत, नाशिक महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एमपीडब्ल्यू पदाच्या 318 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 06 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावे.. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Nashik Mahanagarpalika Bharti 2022 Details

Department Name
Nashik Municipal Corporation
Recruitment Name
Nashik Mahanagar Palika Recruitment 2022
 Name of Posts (पदाचे नाव)  Medical Officer, Staff Nurse, MPW
Total Vacancies (पदसंख्या)  318 Post
Application Mode  Offline Application Form
 Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://arogya.maharashtra.gov.in/

Vacancy Details of Nashik Municipal Corporation Recruitment

1 Medical Officer  106  पद
2 Staff Nurse  106  पद
3  MPW  106  पद

 Educational Qualification Eligibility For NMC Recruitment

शैक्षणिक पात्रता 

  • For Medical Officer 
MBBS
  • For  Staff Nurse 
B.SC/ GNM Nursing
  • For MPW 
 12+ Science

⏰ All Important Dates

Last Date    6th Sept 2022

How to Apply For Nashik Corporation Bharti 2022 :

  • Eligible and interested applicants need to submit their applications to given format attached with advertisement PDF
  • Applications to the posts should be as per the prescribe application format.
  • Get attach with all necessary documents & certificates as necessary to the posts.
  • Application send their given address: राष्ट्रीय आरोग्य अभियान , जिल्हा रुग्णालय आवर, त्र्यंबकरोड , नाशिक 

Important Link of Nashik Corporation Bharti 2022

📡 वेबसाईट लिंक
जाहिरात

 

There are a large number of vacancies in various categories in Nashik Municipal Corporation for many years. 7090 posts were sanctioned as per the old ‘C’ class format. Of these, 2,800 posts are currently vacant, while the remaining 4,800 posts have created a lot of work stress for the employees. The process of filling up various 600 posts including doctors and nurses in the medical department will start from June

जून महिन्यात वैद्यकीय विभागात भरती!

नाशिक महापालिकेत अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात विविध संवर्गातील पदे रिक्त आहेत. जुन्या ‘क’ वर्ग आकृतिबंधानुसार ७०९० पदे मंजूर करण्यात आली होती. त्यातील दोन हजार आठशे पदे सध्या रिक्त असून, उर्वरित ४८०० पदांवर काम करताना कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कामाचा ताण निर्माण झाला आहे. जूनपासून वैद्यकीय विभागातील डॉक्टर्स, नर्सेससह विविध सहाशे पदे भरण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या गृहीत धरून महापालिकेच्या प्रशासन विभागाने नवीन आकृतिबंध राज्य शासनाकडे सादर केला आहे. त्यामध्ये एकूण चौदा हजार पदे आहेत. परंतु, अद्यापही शासनाने या आकृतिबंधाला मंजुरी दिली नाही.

एकूण ६०० रिक्त जागा भरल्या जाणार

कोरोना पहिला लाटेचा सामना करताना आरोग्य व वैद्यकीय सेवेवर मोठा ताण निर्माण झाला. त्यामुळे महापालिकेने अत्यावश्यक सेवेतील पदे भरण्याची मागणी केली होती. शासनाने त्यावेळीदेखील कायमस्वरूपी पदे भरण्याऐवजी मानधनावर पदे भरण्यास मान्यता दिली. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी, स्टाफ, नर्सेस, वॉर्डबॉय, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रेडिओलॉजिस्ट, अशा विविध पदांसाठी मानधनावर उमेदवारांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या. मात्र, वैद्यकीय विभागाची ही तात्पुरती गरज भागली. दीड महिन्यापूर्वी राज्य शासनाने वैद्यकीय व अग्निशमन विभागातील पदे भरण्यास मंजुरी दिली. त्यानुसार तिसऱ्या लाटेचा विचार करताना महापालिकेने मानधनावर पदे भरण्याऐवजी आता शासनाने दिलेल्या मंजुरीनुसार थेट नियुक्ती करण्यासाठी पावले उचलली आहेत. नव्या आकृतिबंधातील वैद्यकीय विभागाच्या एकूण ६०० रिक्त जागा भरल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली

Leave a Comment