Principal Vacancies

Principal Vacancies

मुख्याध्यापकांची पदे रिक्त

Head Teachers or Head Master Vacancies are vacant. As per news published in the Maharashtra Times there are various Post still not filled in Primary School. Due to the dilapidated stewardship of the education department officials, 17 out of the 15 posts of the headmaster approved for the secondary department are still vacant. On the other hand, there are nine assistant teachers who have been in charge of the headquarters at the municipal school. They have been waiting for the promotion of the post of principal for nine years. Read the complete details given below :

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे माध्यमिक विभागासाठी मंजूर असलेली मुख्याध्यापकांची १७ पैकी १५ पदे आजतागायत रिक्त आहेत. तर दुसरीकडे महापालिका शाळेत प्रभारी मुख्याध्यापकपद सांभाळणारे तब्बल १५ सहाय्यक शिक्षक नऊ वर्षांपासून मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. पदोन्नतीकरिता वारंवार मागणी करूनही विभागामार्फत कोणतीही कार्यवाही होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी आता आयुक्तांनीच लक्ष घालण्याची मागणी पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या शिक्षकांनी केली आहे.

विशेष म्हणजे प्रभारी मुख्याध्यापकपद सांभाळणाऱ्या सहाय्यक शिक्षकांना मुख्याध्यापकपदाचा कोणताही आर्थिक व अन्य सेवाविषयक लाभ मिळत नाही. त्यामुळे या शिक्षकांचे आतापर्यंत किमान १० ते १५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पदोन्नती समितीची बैठक लवकरात लवकर आयोजित करून माध्यमिक शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने मुख्याध्यापक संवर्गात पदोन्नती देण्याची मागणी प्रभारी मुख्याध्यापकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

दरम्यान, सहाय्यक शिक्षकांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची गेल्या चार वर्षांत एकही बैठक झाली नसल्याने महापालिकेच्या १५ माध्यमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या मुख्यध्यापकपदाची कामे सहाय्यक शिक्षक हे प्रभारी म्हणून सांभाळत आहेत. नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या १७ माध्यमिक शाळांपैकी १५ माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापकपद हे सन २०१०पासून रिक्त आहेत. सन २००६ ते २०१२ या दरम्यान पार पडलेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत माध्यमिक विभागाकरिता एकूण १७ मुख्याध्यापकपदांना मंजुरी देण्यात आली. त्यानंतर ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागानेदेखील नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाला शिक्षक-शिक्षकेतर संचमान्यतेमध्ये शाळानिहाय १७ मुख्याध्यापकांच्या पदांना मंजुरी दिली.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सन २०१६मध्ये पदोन्नती समिती स्थापन करण्यासाठी मान्यता दिली. त्यानुसार शिक्षण विभागाने सन २०१६मध्ये पूर्वलक्षी प्रभावाने सन २०११-१२ या सेवाभरती वर्षापासून पदोन्नती प्रस्ताव व निवड सूची तयार केली आहे, परंतु २०१६पासून आतापर्यंत विभागीय पदोन्नती समितीची एकही बैठक न झाल्यामुळे मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीची कार्यवाही करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे सहाय्यक शिक्षकांच्या पदोन्नतीवर गदा येत असल्याचा आरोप प्रभारी मुख्याध्यापकांनी केला आहे.

२०१०पासून प्राथमिक शिक्षकांना दोन वेळा पदोन्नती

सन २००४ व सन २०१६च्या सरकार निर्णयानुसार प्रत्येक सेवाभरती वर्षात रिक्त असलेली पदे भरती करण्यासाठी पदोन्नती देण्याची कार्यवाही करावी, असे बंधनकारक असतानाही पदोन्नती दिली गेली नाही, मात्र सन २०१०पासून प्राथमिक शिक्षकांना आजतागायत दोन वेळा पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे माध्यमिक विभागातील सहाय्यक शिक्षकांनी लवकरात लवकर पदोन्नती मिळावी, म्हणून महापालिका आयुक्तांना साकडे घातले आहे.

म. टा.

Leave a Comment