Teachers Recruitment 2022

Teachers Recruitment 2022

Teachers Recruitment 2022- Chief Minister Eknath Shinde has announced to recruit more than 75 thousand posts simultaneously. This is going to be the biggest recruitment in Maharashtra. Read More details are given below.

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिक्षक भरती करणार असल्याची घोषणा केली. लवकरच राज्यात ७५ हजारांहून अधिक शिक्षकांच्या पदांची भरती करू, अशी माहिती दीपक केसरकरांनी दिली. तसेच केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्षात बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचं काम करणार असल्याचं नमूद केलं. यावेळी दीपक केसरकर शनिवारी (२४ सप्टेंबर) सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

दीपक केसरकर म्हणाले, “शिक्षक भरती करताना राज्यात किती पदं रिक्त आहेत हेही बघावं लागतं. शिक्षक म्हणजे केवळ शिक्षक असत नाहीत, तर त्यांना गणित, विज्ञान असे विषय असतात. ही गुंतागुंतीची प्रक्रिया असते. आम्ही ज्या शाळांना अनुदान देतो तेथेही अनेक शिक्षक अतिरिक्त झालेले असतात. त्या सर्वांचं समायोजन करून लवकरच भरती केली जाणार आहे.”

ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती असणार”

“ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरती असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाचवेळी ७५ हजारांहून अधिक पदांची भरती करण्याची घोषणा केली आहे. केवळ घोषणा नाही, तर प्रत्यक्ष ही पदं भरायची आहे यावर कॅबिनेट बैठकीतही चर्चा झाली आहे,”अशी माहिती दीपक केसरकरांनी दिली.

“अतिरिक्त कर्मचाऱ्यांना सामावून घेणार”

“बेरोजगारांना संधी मिळाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि त्यांचे कॅबिनेटमधील सर्व मंत्री अत्यंत दक्ष आहेत. अतिरिक्त कर्मचाऱ्यांना सामावून घेतलं जाईल. खूप दिवसांनी ही भरती होत आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांसाठी हा आशेचा किरण आहे,” असंही केसरकरांनी नमूद केलं


Shikshak Bharti 2022: The recruitment of teachers in the state, which is currently done through the Pravitra Portal , will now be done through the Maharashtra Public Service Commission. It is likely that the next teacher recruitment will be done through MPSC after making some technical changes to implement the recruitment process of teachers through MPSC.

शिक्षकांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत

गेल्या काही महिन्यांपासून पवित्र पोर्टल व शासनाच्या अधिकृत संकेतस्थळामार्फत करण्यात येत असलेली राज्यातील शिक्षकांची भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेच्या धर्तीवर करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे.

 • मात्र शिक्षकांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत राबवण्यासाठी काही तांत्रिक बदल आवश्यक असून, या बदलांची पूर्तता करून पुढील शिक्षक भरती एमपीएससीमार्फत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे
 • राज्यात २०१२ मध्ये शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठया प्रमाणात रिक्त आहेत. शिक्षक भरतीची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून सातत्याने करण्यात येत असल्याने २०१९ मध्ये १२ हजार पदांची भरती पवित्र संकेत स्थळामार्फत सुरू करण्यात आली.
 • भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने होण्यासाठी पवित्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले. या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्याने ही प्रक्रिया लांबली आहे. सध्या खासगी अनुदानित संस्थांतील शिक्षकांची पदे मुलाखतीद्वारे भरण्याचा टप्पा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता एमपीएससीमार्फत शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे.
 • एमपीएससीमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याबाबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्यामार्फत शिक्षकांची भरती एमपीएससीमार्फत करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. या प्रस्तावाबाबत शिक्षण सचिव, एमपीएससीचे अध्यक्ष यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
 • मात्र एमपीएससीमार्फत शिक्षकांची भरती करण्यासाठी सध्याच्या नियमांमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे हे बदल करण्याची प्रक्रिया होईपर्यंत सध्या सुरू असलेली भरती प्रक्रियाही पूर्ण होईल. त्यामुळे पुढील शिक्षक भरती एमपीएससीमार्फत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

Maharashtra’s Minister of State for School Education, Bachchu Kadu, has promised to take up Teachers Recruitment 2022 Recruitment Process in the education department as soon as possible and also due to the corona crises schools were closed more than two year the subjects that were missed earlier will be teach in 30 days. Speaking on fees, Bachchu Kadu said, “There was a stay by the court on the issue of school fees. Due to the stay of the court, 80 per cent recovery has been delayed.” Read the more details given below and keep visit on www.govexam.in for further updates.

 • Teachers Recruitment 2022 आज एबीपी माझाच्या प्रश्न महाराष्ट्राचे कार्यक्रमात शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी खास बातचित करण्यात आली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं मनमोकळेपणानं मांडली. कोरोना संकटात शिक्षणात अधोगती आली. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ शाळा बंद होत्या. मात्र तरीदेखील केंद्रीय शिक्षण खात्यानं 2021 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्र शैक्षणिक गुणवत्तेत आजही अव्वल असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. तसेच, शिक्षण विभागातील रखडलेल्या भरत्या लवकरात लवकर घेऊ असं आश्वासनंही त्यांनी दिलं आहे. एवढंच नाहीतर, शैक्षणिक विषमतेबाबत बोलताना शैक्षणिक विषमता अत्यंत घातक असून ती देशाला पोकळ करु शकते, असं बच्चू कडू म्हणाले.
 • महाराष्ट्राचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, “कोविडमुळे शिक्षण क्षेत्रातील मंदावलेला वेग वाढवून गुणवत्ता आणखी वाढवणार आहे. तसेच, शाळा बंद असल्यामुळे आधी सुटलेले विषय 30 दिवसांत शिकवले जाणार आहेत. हा अनुशेष सेतू अभ्यासक्रमातून  भरुन काढणार आहोत.” पुढे शाळांच्या फीसंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “शालेय शुल्काच्या मुद्यावर कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली होती. कोर्टाच्या स्थगितीमुळे 80 टक्के वसुली रखडली आहे.”, तसेच पुढे बोलताना शिक्षण शुल्क अधिनियम शाळांनी मोडित काढल्याची माहितीही शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.

Teachers Recruitment 2022 Due to the low response to education, as well as meager remuneration and limited job opportunities, students are turning their backs on the DED course.  Thousands of teacher vacancies in the state are currently vacant due to poor response to DED courses, while the government has not recruited teachers for nearly ten years. As a result, the number of students seeking admission in D.Ed courses has decreased.

राज्यभरात शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त

Teachers Recruitment 2022– गेल्या काही वर्षांपासून भरती प्रक्रिया, शिक्षणसेवकांना मिळणारा अल्पसा प्रतिसाद या कारणांमुळे, तसेच मिळणारे तुटपुंजे मानधन आणि नोकरीच्या मर्यादित संधी यांमुळे विद्यार्थी डीएड अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.डीएड अभ्यासक्रमाला मिळणाऱ्या अल्पप्रतिसादामुळे राज्यातील शिक्षकांच्या हजारो जागा सध्या रिक्त आहेत, तर दुसरीकडे सुमारे दहा वर्षांपासून शासनाने शिक्षक भरती केली नाही. त्यामुळे डी.एड अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यानाच्या संख्येत घट झाली आहे.

शिक्षण सेवक म्हणून नोकरी स्वीकारल्यानंतर त्यांना कामगारांपेक्षाही कमी वेतनावर काम करावे लगत असल्याचे वास्तव अनेक शिक्षण सेवक मांडताना दिसत आहेत. शासनाने शिक्षण सेवक म्हणून तटपुंज्या मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे या क्षेत्राकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली.


Teachers Bharti 2022: Despite the absence of additional teachers in the higher secondary education department, recruitment for the last ten years has been consistently delayed. As a result, there are 5,000 vacancies for junior college teachers in the state. The Maharashtra State Junior College Teachers’ Federation has demanded that the state government should immediately fill the vacancies of teachers and complete the recruitment process during the summer vacation so that teachers can be made available in colleges in the coming academic year.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या ५ हजार रिक्त पदे लवकरच भरणार

उच्च माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षक अतिरिक्त नसतानाही गेली दहा वर्षे सातत्याने भरतीसाठी विलंब केला जात आहे. परिणामी राज्यात पाच हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. राज्य सरकारने शिक्षकांची ही रिक्त पदे त्वरित भरावीत, ही शिक्षक भरती प्रक्रिया उन्हाळ्याच्या सुटीत पूर्ण करावी, जेणेकरून येत्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयांमध्ये शिक्षक उपलब्ध होऊ शकतील, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली आहे.

राज्यात गेली १० वर्षे शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शासन स्तरावर वेगवेगळे आदेश देऊन शिक्षकांची भरती प्रलंबित राहत आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात काही शिक्षक अतिरिक्त असले तरी उच्च माध्यमिक शिक्षण विभागात मात्र पाच हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शासनाने या जागांवर शिक्षक भरण्यासाठी परवानगी नाकारल्यामुळे शिक्षकांच्या अनुपस्थितीत विद्यार्थी अभ्यास करून परीक्षा देत आहेत. त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होत आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे ऑनलाइन अध्यापन करावे लागल्यामुळे शिक्षकांची कमतरता प्रकर्षाने जाणवली नाही, परंतु गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षक नसल्यामुळे वर्ग रिकामे असल्याचे महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले.

प्रा. आंधळकर म्हणाले,‘‘बोर्डाचे पेपर तपासणीसाठी शिक्षक पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्याने शिक्षकांना जास्त उत्तरपत्रिका तपासाव्या लागल्या आहेत. दरम्यान, शासनाने ‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षकांची भरती करण्याचे कार्य सुरू केले होते, परंतु ही प्रक्रिया देखील थांबली. त्यामुळे आता राज्य सरकारने शिक्षकांच्या किती जागा रिक्त आहेत, याची त्वरित माहिती घ्यावी आणि उन्हाळ्याच्या सुटीत शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी.’’ कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक भरती प्रक्रिया त्वरित राबविण्याच्या मागणीचे निवेदन महासंघातर्फे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना देण्यात आले आहे.


Higher Education Minister Uday Samant informed about the recruitment of professors in the college through Twitter. This has paved the way for stagnant professor recruitment. However, at present there are about 1,298 vacancies for Assistant Professors in Shivaji University.

महाविद्यालयातील प्राध्यापक भरती बाबतची माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे दिली. यामुळे रखडलेल्या प्राध्यापक भरती चा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, सध्या शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात सुमारे 1,298 सहायक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहे. रिक्त जागा व शासन निर्णयात मोठी तफावत असल्याने पात्रताधारकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यातील विद्यापीठे व अनेक महाविद्यालयांमध्ये मोठ्या संख्येने विविध विषयांची सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी याबाबत सूचना केल्या आहेत. मात्र, कोरोना व त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पदभरतीची प्रक्रिया लांबणीवर पडली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांच्या पहिल्या टप्प्यातील 2,088 प्राध्यापक भरती व सर्व प्राचार्य पदे भरण्याला मान्यता देण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी दिली आहे.

2013 पासून राज्यात प्राध्यापक भरती झालेली नाही

राज्यात 2013 पासून प्राध्यापक भरती नियमितपणे झालेली नाही. महाविद्यालयातील 40 ते 50 टक्के प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अनुदानित महाविद्यालयात सहायक प्राध्यापकांची सुमारे 1298 पदे रिक्त आहेत. प्राध्यापक भरती व्हावी म्हणून नेट-सेटधारक व पीएच. डी. पदवी मिळविलेल्यांनी पाठपुरावा केला होता. युती सरकारने 40 टक्के भरतीनुसार 3580 पदे भरण्याचा निर्णय झाला. त्यातील सुमारे प्राध्यापकांची 1100 पदे भरण्यात आली. अद्याप 2400 पदे भरणे अपेक्षित आहेत. परंतु, महाविकास आघाडी सरकारने 2088 पदे भरतीचा निर्णय घेतला आहे. आणखी 312 पदे रिक्त ठेवल्याने पात्रताधारकांमध्ये नाराजीची भावना आहे.


The process of recruitment of teachers in government primary and secondary schools in the state will begin soon. The education department has started taking steps in that direction. Along with this, teachers will also be recruited to fill the vacancies in private aided schools

राज्यातील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक भरती लवकरच सुरू होणार

खाजगी अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर शिक्षकांची भरती करताना शिक्षण खात्याकडून परवानगी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच शिक्षक भरती करतेवेळी स्थानिक वृत्तपत्रामध्ये माहिती देणे बंधनकारक असणार आहे.

राज्यातील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरती करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्या दृष्टीने शिक्षण खात्याने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच बरोबर आता खाजगी अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर देखील शिक्षकांची भरती केली जाणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र शिक्षक भरती करण्यापूर्वी सर्व अनुदानित शाळांनी शिक्षण खात्याकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी. यासाठी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन शिक्षक भरतीची माहिती देणे गरजेचे असल्याचे सर्व शाळांना कळविण्यात आले आहे.

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासह राज्यातील अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या जगा लवकर भरती कराव्यात अशी मागणी सातत्याने खाजगी शिक्षण संस्थांकडून होत आहेत. मात्र शिक्षक भरतीला सातत्याने विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भाषिक अल्पसंख्यांकांच्या शाळांना रोस्टर लागू करण्यात आल्याने अनेक वर्षे शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे भाषिक अल्पसंख्यांक शाळांना देखील शिक्षकांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे शिक्षक भरती करण्यास लवकर हिरवा कंदील दाखवा असे मत व्यक्त होऊ लागले आहे.

शिक्षक भरती करण्यापूर्वी संबंधित खाजगी अनुदानित शाळांनी शिक्षण खात्याकडून परवानगी घेणे गरजेचे आहे. असे कळविण्यात आले आहे. शिक्षक भरतीचा निर्णय झाल्यानंतर सर्व शाळांना ही माहिती द्यावी लागणार आहे.


About 6,100 education workers in the state have been given the green light to fill their posts. School Education Minister Pvt. Varsha Gaikwad’s initiative has given impetus to the recruitment process. The process will be implemented transparently through the PAVITRA system for quality candidates.

शिक्षण सेवक पद भरती; सहा हजार पदे भरणार

शिक्षण सेवक पदांसाठीच्या भरती प्रक्रियेची कार्यवाही शालेय शिक्षण विभागामार्फत लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. कोविड काळात ही भरती बंद होती. परंतु आता विद्यार्थी हिताच्या दृष्टीने ही सहा हजार १०० पदे भरली जाणार आहेत.

राज्यातील सुमारे सहा हजार १०० शिक्षण सेवकांची पदे भरण्यास हिरवा कंदिल मिळाला आहे. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारामुळे भरती प्रक्रियेला गती मिळाली आहे. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र (PAVITRA) प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी. एल. एड. कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ (TAIT) परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये “अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत उच्चतम गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे.

डिसेंबर, २०१७ मध्ये आयोजित केलेल्या ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ (TAIT) परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे १२ हजार ७० शिक्षक सेवक पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ५ हजार ९७० शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच फेब्रुवारी, २०२० मध्ये पूर्ण झाली आहे.


Uday Samant, Minister of State for Higher and Technical Education, has assured that the recruitment process for 3,074 vacant posts of professors in government and aided colleges will begin next week. He gave this information on Sunday against the backdrop of the ongoing agitation of set-net and PhD candidates in Pune.

खुशखबर! प्राध्यापकांच्या तीन हजारांहून अधिक पदांची भरती

शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या प्राध्यापकांच्या ३ हजार ७४ जागांची भरती प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. पुण्यात सुरू असलेल्या सेट-नेट आणि पीएचडीधारक उमेदवारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रविवारी ही माहिती दिली. आंदोलकांची भेट घेत सामंत यांनी भरती प्रक्रिया आठवड्याभरात सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले.
या निर्णयाचे स्वागत करत नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीतर्फे करण्यात येत असलेले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्राध्यापक भरती संदर्भातील फाइल वित्त विभागाकडे पाठवण्यात आली आहे. पुढील आठवड्यात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांची स्वाक्षरी झाल्यानंतर भरतीबाबत सविस्तर शासन आदेश काढण्यात येईल.
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ
तासिका तत्त्वावर (सीएचबी) काम करणाऱ्या सर्व प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सामंत यांनी रविवारी जाहीर केला. सध्याच्या तुलनेत प्राध्यापकांना त्यांच्या मानधनात २५ टक्क्यांनी वाढ दिली जाईल, असे ते म्हणाले. याबाबत लवकरच शासन आदेश प्रसिद्ध होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. तासिका ही ४८ मिनिटांची असली तरी यापूर्वी ती ६० मिनिटांप्रमाणे गृहीत धरली जात होती. आता त्यातही बदल करण्यात येणार असून एका तासिकेसाठी ४८ मिनिटेच गृहीत धरली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

Teacher recruitment in the state has been postponed due to the cancellation of Maratha reservation given by the state government to the Maratha community in education and recruitment. It is learned that the teacher recruitment process will not take place unless a new order is issued by the state government.

पवित्र पोर्टलद्वारेची शिक्षक भरती आणखी लांबणीवर

सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारनं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरभरतीमध्ये दिलेलं मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे राज्यातील शिक्षक भरती लांबणीवर पडली आहे. राज्य सरकाचे नवे आदेश आल्याशिवाय शिक्षक भरतीची प्रक्रिया केली जाणार नाही अशी माहिती आहे. दुसरीकडे राज्य सरकारच्या लेखा व कोषागार विभागातील लिपीक आणि लेखापाल भरतीवर देखील परिणाम होणार आहे. ( Supreme Court cancelled Maratha reservation impact on Teacher Recruitment)

3 हजार शिक्षकांची भरती प्रस्तावित

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर शिक्षक भरतीला ब्रेक लागलेला आहे. राज्य शासनाचे आदेश आल्याशिवाय शिक्षक भरती होणार नाही. मे आणि एप्रिल महिन्यात राज्यातील 3 हजार शिक्षकांची भरती प्रस्तावित होती. मात्र, मराठा आरक्षण रद झाल्याने भरती प्रक्रीया कधी होणार यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

पवित्र पोर्टलमध्येही तांत्रिक अडचणी

शिक्षक भरती होणाऱ्या पवित्र पोर्टलमध्येच तांत्रिक अडथळे मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत. शिक्षण संचालनालयाने तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे. भाजप आणि शिवसेनेचं सरकार असताना शिक्षक भरती प्रक्रियेसाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आलं होतं.


 सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! राज्यात शिक्षण विभागातील भरतीला शासनाची मान्यता

तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, टाळेबंदी हळूहळू शिथिल होत असताना राज्य सरकारने भरती प्रकियेला गती दिल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभाग, पोलीस दलात मोठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. त्यातच आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन शिक्षण विभागातील भरतीबाबत माहिती दिली आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठ लिपिक संवर्गातील एकूण २६६ पदांपैकी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (SEBC) उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील ५०% पदांसाठी नियुक्ती देण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ट्विट त्यांनी केले. त्याचसोबत, राज्य सरकारचे पत्रही जोडण्यात आले आहे. त्याअनुषंगाने लिपिक पदासाठी लवकरच जाहिरात निघणार असून, उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस खात्यात १२,५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. पहिल्या टप्प्यात ५३०० पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली असून, उर्वरित जागांची भरती दुसऱ्या टप्प्यात केली जाणार आहे. तसेच, गरज पडल्यास २५३८ कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याचेही गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले .

5 thoughts on “Teachers Recruitment 2022”

 1. Sir, tumhi fakt tatmadhe merit asleyana pavitra portalvar shikshak manhunt geta. Ani majya misteranamah tat pariskset 79 gun ahet ani ata te agebar hot ale tari khajgi sansthevar gelya 20 varshyapun 5000 hajar rupayavar kam kartat. Tynche education ma marathi 2nd class marathi net ani marathi bed 2nd ani varun 20 vardhacha anunbhav asun sudha sc catagarimadhun tyncha number ka lagla nahi. Tynche nav vishwanath tulshiram godbole latur.ahe ani majhepan education marathi ma 1sr class ani bped 1st class asun maha tat madhe 39 gun ahet. Sc cast.plz sir arthik paristhithine khup major ahot .ya ekach ashevar baslo hoto. Doghapaiki konalatri shishak mahnun lagel .pan nahi agle.doghanipan pradhanykram delele ahe . Mag amche nav list madhe ka nahi.46 markvalyache nav ahet mag tynche ka nahi. Sir plz sanga
  Latur

  Reply

Leave a Comment