UPSC Pre-Exam: Do ‘such’ Smart Preparation!

UPSC Pre-Exam: Do ‘such’ Smart Preparation!

UPSC पूर्व परीक्षा: ‘अशी’ करा स्मार्ट तयारी!

UPSC Pre-Exam 2020 : The Civil Service Exam (Civil Service Exam) conducted by the Central Public Service Commission will be held on May 31. If the conditions related to the Corona virus are resolved, the test will be done on time. Let’s see how many marks are required to pass this exam. A total of 100 questions are asked in the UPSC Pre-Examination. Each question has 2 points. That means the exam will only be of 200 marks. Negative evaluation is also negative marking. If one correct answer gets you 2 points, then one wrong answer will have a score of .66.

UPSC Pre-Exam 2020

केंद्रीय लोकसेवा आयोगद्वारे घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा अर्थात सिव्हिल सर्व्हिस एक्झाम ३१ मे २०२० रोजी होणार आहे. जर करोना विषाणूसंदर्भातली परिस्थिती आटोक्यात आली तर ही परीक्षा नियोजित वेळेनुसार होईल. या परीक्षेच्या अनुषंगाने उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण आवश्यक ते पाहू.

या परीक्षेसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पण तुम्हाला ठाऊक आहे का की या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला किती प्रश्नांची योग्य उत्तरे द्यायची आवश्यकता आहे? किती गुण मिळाल्यावर तुम्ही सहजासहजी कटऑफ यादीत येऊ शकता? आम्ही तुम्हाला सांगतो की यूपीएससी प्रिलीम्स किंवा पूर्व परीक्षेत तुम्हाला किती प्रश्नांची योग्य उत्तरे द्यायची आहेत…

आधी पॅटर्न समजून घ्या…

यूपीएससी पूर्व परीक्षेत एकूण १०० प्रश्न विचारले जातात. या प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण असतात. म्हणजे परीक्षा केवळ २०० गुणांची असेल. नकारात्मक मूल्यांकन अर्थात निगेटिव्ह मार्किंगही आहे. जर एक योग्य उत्तराला तुम्हाला २ गुण मिळत असतील तर एका चुकीच्या उत्तराला ०.६६ गुण कापलेही जातात.

उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण आवश्यक?

परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची यादी कटऑफनुसार असते. दरवर्षी हे कट ऑफ गुणही वेगवेगळे असतात. पण जर आपण १२० गुणांचं लक्ष्य ठेवून तयारी केली तर या कटऑफची चिंता करण्याची गरज नाही. म्हणजेच १२० गुण मिळवून तुम्ही पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता.

पण नकारात्मक मूल्यांकनही आहे. मग अशा वेळी केवळ ६० प्रश्न सोडवण्याचं लक्ष्य ठेवलं तर अडचण होईल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर योग्यच असेल असंही आपण छातीठोकपणे सांग शकणार नाही.. मग काय करायचं?

किती उत्तरं बरोबर हवीत आणि का?

उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की किमान ७० प्रश्नांची उत्तरं तरी योग्य हवीत. यानंतर जर तुम्ही १०० प्रश्न सोडवले आणि अन्य ३० चुकलवे तरी तुम्ही उत्तीर्ण होणार आहात.

कसं ते जाणून घ्या…

जर तुम्ही ७० प्रश्नांची बरोबर उत्तरं दिलीत तर तुम्हाला १४० गुण मिळतात. यानंतर उरलेले ३० जरी चुकले तरी ०.६६ प्रति प्रश्न प्रमाणे तुमचे २० गुण कापले जातील. हे २० गुण १४० पैकी कापले जाणार आहेत. म्हणजेच १४० – २० = १२० आणि तुमचं लक्ष्य १२० गुणांचेच आहे.

गेली दोन वर्षे यूपीएससी पूर्व परीक्षेची कट-ऑफ १०० गुणांच्या आसपासच असते. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने तयारी करू शकता. पूर्व परीक्षेत नक्की उत्तीर्ण व्हाल.

सौर्स : मटा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *