Van Vibhag Bharti 2022

Van Vibhag Bharti 2022

Maha Forest Bharti 2022

Van Vibhag Bharti 2022: Mega recruitment in Maharashtra Forest Department will be done soon for 2762 posts. According to sources, 2762 posts are likely to be filled in Maharashtra Forest Department soon. This is because recruitment in the forest department is likely to accelerate various activities and create an environment conducive to the environment. Read  more details regarding Maha Forest Bharti 2022 are given below.

वनविभाग भरती परीक्षेला अनुसरून मागील वर्षीचे पेपर्स देत आहोत… हे सर्व पेपर्स ऑनलाईन सोडवा आणि परीक्षेचा सराव करा…वनविभाग भरती परीक्षा पेपर्स येथे पहा

महाराष्ट्र वनविभागात 2762 पदांची मेगा भरती लवकरच

Van Vibhag Bharti 2022: भारतीय वन सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर झाला. त्यामध्ये महाराष्ट्राचे वनाच्छादन क्षेत्र वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही उल्लेखनीय बाब असली, तरी वन विभागातील रिक्त पदांमुळे वनसंपदेचे संरक्षण करण्यात अडचणी येत असतात. या पार्श्वभूमीवर वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वनविभागाच्या राज्यभरातील विविध पदांच्या रिक्त २ हजार ७६२ जागांची भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे लवकरच वनपरिक्षेत्रांना हक्कांच्या वनरक्षकांसह अधिकारी मिळणार आहेत.

Mahaforest Bharti 2022

नाशिक वनवृत्तातील हरसूल, उंबरठाण, सुरगाणा आदी अतिसंवेदनशील कामस्वरूपी वनपरिक्षेत्र अधिकारी नसल्याने तस्करांना मोकळे रान मिळत आहे. ६३२ वनरक्षकांची पदे वनवृत्तात मंजूर असून ६२ पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. गस्त घालताना वनरक्षकांअभावी मर्यादा पडतात. नवीन भरती प्रक्रियेसाठी ६२ वनरक्षकांसह इतर २३२ रिक्त जागांचा अहवाल मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. भरती प्रक्रियेनंतर नाशिकच्या वनसंपदेला नवीन रखवालदार मिळणार आहेत.

दुसरीकडे सन २०१९ मध्ये सर्वेक्षक भरतीमध्ये एकही उमेदवार आला नसल्याने नाशिकला वगळण्यात आले होते, तर वनरक्षकांच्या ४४ जागांच्या भरतीतही ११ जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे वन खात्याच्या भरतीला उमेदवारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

नुकत्याच काही वनपालांना वनपरिक्षेत्र अधिकारी तर वनरक्षकांना वनपाल म्हणून पदोन्नती मिळाली. त्या जागाही रिक्त झाल्या आहेत. नव्याने होणाऱ्या भरतीमध्ये उमेदवारांची संख्या वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, वन विभागातील रिक्त पदांअभावी कार्यपद्धतीवर ताण वाढल्याचा अहवाल शासनाला मिळाला आहे. वन राज्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार राज्यातील विविध वनवृत्तांतील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्याबाबतच्या कार्यवाहीला वन मंत्रालयाने सुरुवात केली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अभ्यास आणि सरावाला सुरुवात करा.

Other important link regarding the VanVibhag Bharti 2022

Vanrakshak Bharti Exam Old Papers


अमरावती वनविभागात वनाधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा बोजवारा- प्रभारीवर कामकाज

अमरावतीच्या वनविभागात विभागीय वनाधिकाऱ्यांची ५५ च्या जवळपास पदे रिक्त असल्याने कामकाजावर याचा परिणाम झालेला आहे. सहायक वनसंरक्षकांना अद्याप पदोन्नती न मिळाल्यामुळे पदोन्नतीतून भरणारे हे पद गेल्या वर्षभरापासून रिकामे राहिले आहे.

वनविभागात उपवनसंरक्षक ते प्रधान मुख्य वनसंरक्षक या पदावरील आयएफएस अधिकारी पदोन्नतीचे धोरण काटेकोरपणे पार पाडतात. मात्र, राज्यसेवेतील वनपाल ते सहायक वनसंरक्षक यांच्या बाबतीत तसे घडत नाही, वनविभागात या पदांच्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीकरिता वर्षानुवर्षे वाट बघावी लागते. सहायक वनसंरक्षक या पदावरून विभागीय वन अधिकारी या पदावर बढती देण्याकरिता मागील वर्षी पदोन्नती समितीची बैठक पार पडली. या पदांवर पदोन्नती देण्याकरिता अंतिम यादी तयार झाल्यानंतर सुद्धा पदोन्नतीचा लाभ सहायक वनसंरक्षकांना मिळाला नाही, परिणामी मागील वर्षभरापासून राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकारी यांची ५५ पदे रिक्त आहेत. प्रभारी पदावर कामकाज हाकले जात आहे.

  • विदर्भात अधिक संख्या – राज्याच्या तुलनेत विदर्भात वनविभागाचा व्याप मोठा असल्याने या प्रदेशात वनाधिकाऱ्यांच्या पदांची संख्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देशाच्या तुलनेत दुप्पट आहेत. सध्या विदर्भात विभागीय वनाधिकाऱ्यांची ३०च्या आसपास पदे रिक्त आहेत. यवतमाळ ५ व वाशिम २, अमरावती ३ अकोला १ वर्धा १ नागपूर ७ भंडारा ३ गोंदिया १ चंद्रपूर ५ गडचिरोली ३ अशी रिक्त पदांची अवस्था आहे, यामध्ये सामाजिक वनीकरण, दक्षता पथक, नियोजन विभाग, मूल्यांकन व कार्य आयोजन या साईट पोस्टचा समावेश आहे.
  • सहायक वनसंरक्षक प्रतीक्षेत – राज्यात सध्या सहायक वनसंरक्षकांची ४८ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर टक्क्याप्रमाणे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना बढती देणे अपेक्षित आहेत, तर सहायक वनसंरक्षकांची राज्याचे वनविभागात ४८ पदे रिक्त आहेत, याशिवाय विभागीय वनाधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने बोजवारा उडाला आहे. काही पदे ही दोन-दोन वर्षांपासून रिक्त ठेवण्याचा हेतू लक्षात येत नाही.

Leave a Comment