महत्वाचा अपडेट, २.९७ लाख सरकारी पदे रिक्त! – 2 Lac vacancies in government offices

2 Lac vacancies in government offices – As per the latest Update, a total of 2 lakh 97 thousand 859 posts are vacant in various departments of the state government. The state government has given information about this. During a half-hour discussion in the Legislative Council on Thursday, Vikram Kale had raised suggestions regarding the vacant posts in various cadres in the departments of the state government. Minister Ashish Shelar, while replying to him, gave information about the vacant posts. He also highlighted that recruitment is a continuous process and the Chief Minister has given priority to it in the 150-day program.

 

राज्य सरकारच्या विविध विभागांत मिळून एकूण दोन लाख ९७ हजार ८५९ अशी एकूण ३६ टक्के पदे रिक्त आहेत. याविषयीची माहिती राज्य सरकारने दिली आहे. गुरुवारी विधान परिषदेत अर्धा तास चर्चेदरम्यान विक्रम काळे यांनी राज्य सरकारच्या विभागांतील विविध संवर्गातील रिक्त पदांबाबत सूचना उपस्थित केली होती. त्याला मंत्री आशीष शेलार यांनी उत्तर देताना रिक्त पदांची माहिती दिली. तसेच, पदभरती ही निरंतर प्रक्रिया असून दीडशे दिवसांच्या कार्यक्रमात त्याला मुख्यमंत्र्यांनी अग्रक्रम दिल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

 

या चर्चेदरम्यान शेलार यांनी, राज्य सरकारच्या प्रत्येक विभागाकडून त्यांच्या कार्यालयातील रिक्त पदांचा आढावा घेण्यात येत असतो. या सगळ्यात आकृतीबंधाचा विषय कळीचा असल्याचे त्यांनी सांगितले. यात रिक्त पदे आणि सेवानिवृत्त पदांचाही समावेश होतो. सध्या सुरू असलेल्या दीडशे दिवसांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला प्राधान्यक्रम दिला आहे, असेही ते म्हणाले. सेवार्थ प्रणालीच्या आकडेवारीनुसार, अवलोकन केले असता १५ जून २०२५ पर्यंत दोन लाख ९२ हजार ५७० पदे रिक्त आहेत. त्यात ५,२८९ इतकी पदे अधिकची जोडल्यास एकूण दोन लाख ९७ हजार ८५९ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची टक्केवारी ही एकूण पदांच्या ३५.८३ टक्के असल्याचे शेलार म्हणाले. पदे रिक्त होणे, ती भरली जाणे ही निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया असल्याचेही ते म्हणाले.

… त्यानंतरच महाभरती
रिक्त पदांचा आढावा घेऊन सविस्तर सादरीकरण मंत्रिमंडळासमोर झाले असून काही नवीन कायदे अद्ययावत करणे, विभागातील रिक्त पदांची स्पष्टता आल्यानंतर कार्यालयांना डिजिटाइज करणे या सगळ्याचा दीडशे दिवसांचा कार्यक्रम आम्ही आखला आहे. रिक्त पदांची अचूक माहिती हाती आल्यानंतर राज्यात महाभरती करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असून दीडशे दिवसांच्या कार्यक्रमानंतर ती सुरू होईल, असेही शेलार म्हणाले.

Leave a Comment