TET Exam Result Date & Maharashtra Shikshak Bharti 2026 – Latest News & Update about Maharashtra Shikshak Bharti 2026 is out Today! Nine thousand teachers will be recruited in Zilla Parishad, Municipal Corporation, and Municipal Council schools under this Shikshak Bharti Process 2026 After this TET Result. This will include vacancies arising from retirements until May 2026. The recruitment will be conducted through the Pavitra portal Online Application Forms & Process, and this process will begin from March 2026, according to senior officials in the School Education Department. Many Zilla Parishad schools in the state have a shortage of teachers compared to the student enrollment. It has often been observed that students have had to stage protests due to the lack of teachers. During the winter session, MLAs raised this issue and demanded teacher recruitment. Against this backdrop, for the first time, positions of teachers retiring until May 2026 will also be filled. Every year, 5,700 positions become vacant in schools under Zilla Parishads, Municipal Corporations, and Municipal Councils. The results of the Teacher Eligibility Test (TET), held on November 23, are in the final stages. The Maharashtra State Examination Council is currently verifying the answer sheets of the successful candidates. The TET results will be declared before January 31, senior officials said. Candidates who pass this exam will also be eligible to participate in the teacher recruitment process.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..
मित्रांनो, एक महत्वाचा अपडेट समोर आला आहे. आताच प्राप्त माहिती नुसार, जिल्हा परिषदा, महापालिका व नगरपालिका शाळांमध्ये नऊ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यात २०२४-२५ आणि मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या रिक्त जागांचा देखील समावेश असणार आहे. पवित्र पोर्टलद्वारेच ही भरती होणार असून मार्चपासून भरती प्रक्रिया सुरु होईल, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यातील अनेक जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक कमी आहेत. अनेकदा शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना आंदोलने करावी लागल्याचे अनेकदा पहायला मिळाले. यावर हिवाळी अधिवेशनात आमदारांनी प्रश्न उपस्थित करीत शिक्षक भरतीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आता पहिल्यांदाच मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे देखील भरली जाणार आहेत. दरवर्षी जिल्हा परिषदांसह महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमधील पाच हजार ७०० पदे रिक्त होतात. २३ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून उत्तीर्ण उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी सुरु आहे. ३१ जानेवारीपूर्वीच ‘टीईटी’चा निकाल जाहीर होईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवार देखील शिक्षक भरतीत सहभागी होऊ शकतील.

दरम्यान, १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शाळांची २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षातील संचमान्यता पूर्ण झाली आहे. संचमान्यतेच्या निकषांनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे पहिल्यांदा समायोजन होईल. त्यानंतर रिक्त राहिलेली पदे (एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के) भरली जाणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिकांना मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे समाविष्ठ करून पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड कराव्या लागणार आहेत. त्यानुसार पवित्र पोर्टलवरून शिक्षक भरती होणार आहे.
शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक भरती आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत होईल, असा शासन निर्णय झाला. मात्र, या विभागाकडील कर्मचाऱ्यांना ‘टीईटी’चाच अनुभव आहे. पहिल्यांदाच शिक्षक भरती या विभागाच्या वतीने होणार असल्याने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे मनुष्यबळ देखील कमी आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भातील पत्र शासनाला पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.