beedpp.recruitonline.in Online Application: बीड पोलीस पाटील भरती ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत

beedpp.recruitonline.in Online Application 2026

beedpp.recruitonline.in Online Application: बीड जिल्हयातील बीड उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील (तालुका- बीड, गेवराई व शिरुरकासार) गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक अमेदवारांकडून विहीत नमुन्यात ऑनलाईन पध्दतीने https://beed.gov.in व https://beedpp.recruitonline.in या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर अर्ज प्रक्रिया खाली दिलेली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

Beed Police Patil Bharti Syllabus and Exam Pattern – बीड पोलीस पाटील भरती २०२६ : परीक्षा कशी असेल? जाणून घ्या अभ्यासक्रम व गुणवाटप

पोलीस पाटील भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर जाहिरात संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपुर्ण माहिती काळजीपुर्वक वाचुनच ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत, प्रस्तुत पदाकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून विहित ऑनलाईन पध्दतीनेच भरलेले अर्ज व विहित पध्दतीने भरलेल्या परीक्षा शुल्कासह ग्राहय धरण्यात येतील इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देवून भरती प्रक्रियेची माहिती बाबत अदयावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहिल. भरती प्रक्रिया / परिक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अंशता बदल करणे, पदाच्या एकुण गावनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट तसेच आरक्षणात बदल करण्याचे अधिकार तसेच प्रक्रिये संदर्भात प्राप्त तक्रारीबाबत निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार संबंधीत उपविभागीय दंडाधिकारी तथा अध्यक्ष, पोलीस पाटील निवड समिती यांना राहील.

अर्ज प्रक्रियेतील पायऱ्या  – beedpp.recruitonline.in Online Application
Beed Police Patil Bharti Onlien Application Process

ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत – Beed Police Patil Bharti Onlien Application Process

1) प्रस्तुत पदांकरीता फक्त https://beedpp.recruitonline.in या अधिकृत संकेतस्थळावरून विहित पध्दतीने भरलेले ऑनलाईन पध्दतीने केलेले अर्ज स्वीकारण्यात येतील.
2) इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नोंदविलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक चुकीचा / अपुर्ण तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर्ड (DND) असल्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिये दरम्यान त्याद्वारे पाठविल्या जाणा-या सूचना, संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची. संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. तसेच ई-मेल आयडी व मोबाईल संदेश वहनात येणा-या तांत्रिक अडचणींना उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, बीड हे जबाबदार असणार नाही. सदर संकेत स्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
3) पात्र उमेदवाराला वेब बेस्ड (Web-based) ऑनलाईन अर्ज https://beedpp.recruitonline.in या वेबसाईटद्वारे दि. 19.01.2026 ते दि. 30.01.2026 या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील. अंतीम दिनांकानंतर संकेतस्थळावरील अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल.
4) अर्जदार यांनी सदर संकेतस्थळावर प्रथम लॉगीन आयडी व पासवर्ड तयार करुन जतन करुन ठेवावा. अर्जदार यांनी अर्ज भरताना गावाचे नाव, आरक्षण व जाहीरातीमध्यील अटी व शर्ती याची खात्री करुन अर्ज भरावा. अर्ज नाकारल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत अर्जदार यांची राहील.
5) अर्जदार यांनी सदर संकेतस्थळावर विस्तृत माहितीसाठी “प्रथम अर्ज कसा भरावा” हा टॅब ओपन करुन पहावा.
6) https://beedpp.recruitonline.in या संकेतस्थळावर “अर्ज करा” या link वर clik करावे. यानंतर संबधीत पदासाठीचा अर्ज दिसुन येईल.
7) उमेदवाराने त्याचा मागील सहा महिन्याची कालावधीमधील Photo व सही संकेतस्थवर दिलेल्या माहितीनूसार upload करावा.
8) उमेदवाराने सर्व माहिती भरल्यानंतर continue वर click करावे यामुळे भरलेल्या अर्जाचे पुनर्वलोकन (Review) करता येईल. तसेच अर्जातील माहिती बदलायची असल्यास edit form वर click करुन करता येईल.
9) अर्जातील सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करुन save and continue करावे. त्यांनंतर अर्ज save होऊन Form Id तयार होईल. तयार झालेला Form Id संपूर्ण भरती प्रक्रीयेत उपयुक्त असल्याने सांभाळुन ठेवावा.
10) यानंतर उमेदवाराने परिक्षा शुल्क ऑनलाईन पध्दतीने UPI-Phonepay, GPay ईत्यादवारे QR Code स्कॅन करुन ऑनलाईन पद्धतीने भरणे अवश्यक राहील.
11) ऑनलाईल परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्जाची print काढता येईल.
12) उमेदवाराने संकेतस्थळावर नोंदणी करताना दिलेल्या मोबाईल नंबरवर भरती प्रक्रीया संदर्भात आवश्यक त्या सुचना एसएमएसव्दारे दिल्या जातील.
13) उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन (online) पध्दतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करतांना, अर्जदार यांचेकडे असलेली उच्च शैक्षणिक गुणवत्ता व ईतर शैक्षणीक अर्हता कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे. तथापि, ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहील्यास व भरतीच्या कोठल्याही टप्यावर अर्ज नाकारला गेल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील व याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी शैक्षणिक अर्हता व मागणीनुसार आरक्षण वगैरेची पात्रता तपासून ऑनलाईन अर्ज भरावा.
14) अर्जदारांनी प्रवेशपत्र दि. 02/02/2026 रोजीपासून Download करुन घ्यावेत. व परिक्षा दिवशी सदरील प्रवेशपत्राची कलर प्रत सादर करणे बंधनकारक’ सहील. प्रवेशपत्राशिवाय परिक्षेकरीता प्रवेश दिला जाणार नाही. तसेच सोबत आधारकार्डची प्रत आणने देखील बंधनकारक राहील. तसेच महिलांचे लग्नानंतर नावात बदल झाला असल्यास नमुना-फ मधील स्वयंघाषनापत्र सादर करणे आवश्यक राहील. (नमुना-फ नमुना जाहीरातीसोबत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे)
15) कोणत्याही उमेदवारास पोस्टादवारे प्रवेशपत्र पाठवले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
16) लेखी परिक्षा झाल्यावर त्याच दिवशी प्रथम उत्तरतालीका संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल व लेखी परिक्षेच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत लेखी पुराव्यानिशी आक्षेप समक्ष उपस्थीत राहुन उपविभागीय अधिकारी कार्यालय, बीड येथे दाखल करावा.
17) उमेदवाराची लेखी परीक्षा ही त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहित पात्रतेनुसार कोणतेही कागदपत्रे पूर्वतपासणी / छाननी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबत कोणताही हक्क राहणार नाही. कागदपत्राच्या पूर्ण छाननीनंतर उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यात येईल. लेखापरिक्षेच्या प्राथमिक चाळणी/तोंडीपरीक्षेनुसार गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहित पात्रतेनुसार अंतरीम यादी प्रसिध्द करून उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल छाननी केली जाईल. सदर प्रक्रियेत उमेदवार अपात्र आढळल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. पात्रता धारण न करणा-या उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्याचे संपूर्ण अधिकार उपविभागीय दंडाधिकारी बीड यांचे जवळ राखून ठेवण्यात आलेले आहेत व याबाबत उमेदवारास कोणतीही तक्रार करता येणार नाही.
18) ज्या उमेदवारांनी यापूर्वी जरी त्यांचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे सेवायोजन कार्यालय/समाजकल्याण विभाग, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात नोंदविलेली आहेत, अशा उमेदवारांना विहित मुदतीत स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज करणे व परीक्षाशुल्क भरणे आवश्यक राहीर राहील. अशा उमेदवारांनी अन्य कोणत्याही मार्गाने सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, अशा उमेदवाराना या कार्यालयामार्फत स्वतंत्रपणे कळविले जाणार नाही.
19) माजी सैनिक उमेदवारांनी जिल्हा सैनिक बोर्डात नावनोंदणी केलेली असणेआवश्यक आहे. सदरप्रमाणपत्र, कागदपत्रे पडताळणीच्यावेळी सादर करावें लागतील.

Leave a Comment

Table of Contents