लाडकी बहीण, लाभ बंद झाल्यास काय कराल? नवीन माहिती जाहीर! – Ladki bahin yojana Payment KYC Beneficiary Activation

Ladki bahin yojana Payment KYC Beneficiary Activation – A list of women whose benefits under the Chief Minister’s ‘Ladki Bahin Yojana‘ scheme have been stopped due to incorrect options selected during the e-KYC process has been provided to the Anganwadi workers in their respective villages. So here we will see the options to resolve this issue in few simple steps. The women whose benefits have been stopped and whose names are on the list are urged to contact their Anganwadi worker and submit the necessary documents and self-declaration form. The ambitious Chief Minister’s ‘My Beloved Sister’ scheme is being effectively implemented in the state. Eligibility and ineligibility criteria have been established for providing financial benefits to eligible women under the scheme. Accordingly, the eligible beneficiary women receive the monthly financial benefit amount directly into their Aadhaar-linked bank accounts through direct benefit transfer. By the end of December, the e-KYC process was completed by the beneficiaries of the scheme. It has come to light that some beneficiary women’s benefits have been stopped due to incorrect options selected during this process and other reasons.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडल्याने लाभ बंद झालेल्या महिलांची यादी त्या-त्या गावातील अंगणवाडी सेविकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.चला तर आता बघूया समजा तुमचे पेमेंट थमबळे असेल किंवा लाभ रद्द झाला असल्यास आपण काय करू शकता. तर, लाभ बंद झालेल्या, यादीतील महिलांनी आपल्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्र व स्वयंघोषणापत्र सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांशी योजनेची प्रभावी अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला आर्थिक लाभ देण्यासाठी पात्रता, अपात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार योजनेतील पात्र लाभार्थी महिलेला आधार संलग्न बैंक खात्यात थेट लाभ हस्तांतरद्वारे दरमहा आर्थिक लाभाची रक्कम अदा करण्यात येते. डिसेंबर महिन्याअखेर योजनेच्या लाभार्थ्यांकडून ई-केवायसी प्रक्रिया करण्यात आली आहे. सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडताना व इतर कारणांमुळे चुकीचा पर्याय निवडल्या गेल्याने त्यांचा लाभ बंद झाल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहे. 

Ladki bahin yojana Payment KYC Beneficiary Activation

अंगणवाडी सेविकांमार्फत राबविणार कार्यक्रम
योजनेच्या निकषानुसार सदर लाभार्थी पात्र, अपात्र आहे याची पडताळणी होणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिनांक २२ जानेवारी रोजी बैठक घेऊन गावपातळीवर ई-केवायसी प्रक्रियेमध्ये लाभ बंद झालेल्या महिला लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे, तपासणी करण्याकरिता ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका तसेच शहरी भागामध्ये वॉर्ड ऑफिसर व अंगणवाडी सेविकांमार्फत योजनेतील निकषाच्या अनुषंगाने कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहे.

पोलीस भरती महत्वाचे प्रश्नसंच सोडवा! – Police Bharti Practice Papers

अंगणवाडी सेविकांशी संपर्क करा
ई-केवायसी प्रक्रियेत लाभ बंद झालेल्या महिलांची यादी त्यांच्या क्षेत्रातील, गावातील, शहरी भागातील अंगणवाडी सेविकांना प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाभार्थी महिलांनी अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्र, स्वयंघोषणापत्र सादर करावे. महिलांनी तातडीने माहिती सादर केल्यास माहिती सादर करता येणार आहे.

Leave a Comment

Table of Contents