Dhule Nandurbar District Bank syllabus Exam Pattern – Dear Canidates, there is good news for those looking for jobs in cooperative banks. Dhule and Nandurbar District Central Cooperative Bank Ltd., Dhule is inviting online applications in the prescribed format from eligible candidates to fill up the vacant posts of 50 Clerk posts through direct service recruitment on the establishment. The date of accepting online applications for this recruitment will be from 13-02-2026 to 14-03-2026 till 05.00 PM. Applications received directly by the bank, through post or courier, or by hand will not be accepted under any circumstances. Let us see here the information regarding the examination method and selection process for this recruitment. So first of all, let us see the educational qualification & DNDCC Bank Syllabus & Exam Pattern Details. Graduate in any branch with at least 50% marks (recognized university) and MS-CIT or similar computerized examination passed candidates can apply for this recruitment. Also, preference will be given to candidates who have a Bachelor’s / Master’s degree in Commerce and have practical experience in the field of banking in the clerical / senior category. And yes, along with that, preference will also be given to candidates who have passed the English / Marathi typing test. Detail Dhule Nandurbar District Bank syllabus Exam Pattern is given below also updates will be live on dndccbank.com. So if you are looking for Dhule Nandurbar District Bank syllabus in Marathi or Detail Syllabus PDF to download you are at right place. Just go through given Links & Download the PDF in Marathi from given Link. Also Important topics & Sample Question Papers, Practice papers & Mock tests will be live soon.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..
DNDCC Bank Syllabus & Exam Pattern Details – सहकारी बँकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., धुळे यांचे आस्थापनेवरील सरळ सेवा भरतीने 50 लिपिक (Clerk) पदांची रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून विहीत नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची तारीख 13-02-2026 ते 14-03-2026 अखेर सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत राहिल. बँकेकडे थेट तथा पोस्टामार्फत किंवा कुरिअरव्दारे तथा हस्ते-पर-हस्ते आलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्विकारले जाणार नाहीत. या भरतीसाठी परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया कशी राहणार या संदर्भातील माहिती आपण येथे बघूया. तर सर्वप्रथम शैक्षणिक पात्रता बघूया. कोणत्याही शाखेचा पदवीधर किमान 50% गुणांकनासह (मान्यताप्राप्त विद्यापीठ) आणि MS-CIT किंवा तत्सम संगणकीय परिक्षा उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच यात वाणिज्य शाखेचा पदवीधर / पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपीक / वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. आणि हो सोबतच इंग्रजी / मराठी टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण असल्यास त्या उमेदवारांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल.

सदर भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाच्या (MCQ) असतील. ऑनलाईन परिक्षेसाठी खालील विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. गणित, इंग्रजी व इंग्रजी व्याकरणे, बँकींग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुध्दीमापन चाचणी ऑनलाईन परिक्षेचे गणित, इंग्रजी, इंग्रजी व्याकरण, संगणक व माहिती तंत्रज्ञान याविषयाचे भाषेचे माध्यम इंग्रजी भाषा असेल व उर्वरीत सर्व विषयाचे भाषेचे माध्यम मराठी भाषा असेल.
कागदपत्रे पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँकेने गठीत केलेल्या समितीकडून बँकेचे मुख्यालय, गरुड बाग, धुळे येथे मुलाखत घेण्यात येईल. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. सदर मुलाखत 10 गुणांची असून सदर गुणांचे भारांकन खाली नमुद केलेप्रमाणे असेल त्यामध्ये 10 पैकी 05 गुण संबधित उमेदवारांच्या खालील शैक्षणिक व इतर पात्रतेनुसार देण्यात येतील व उर्वरीत 05 गुण मौखीक मुलाखतीसाठी देण्यांत येतील.

उमेदवारांची निवड अंतिम सुचीः-
आता माहिती बघूया निवड सूची बद्दल. उमेदवारांचे ऑनलाईन लेखी परिक्षेतील गुण (एकूण गुण -90) व मुलाखतीचे गुण -10 (शैक्षणिक व इतर अर्हता गुण भारांकन 05 गुण व मौखीक मुलाखत 05 गुण) यांची बेरीज करुन एकूण 100 गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणानुक्रमे पात्र उमेदवारांची अंतिम निवड सुची व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येईल. अंतीम निवड सुची व प्रतिक्षा यादीमध्ये समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांमध्ये धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व अधिवास प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्यक्रम देण्यात येईल. मात्र एकापेक्षा जास्त उमेदवार धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी असल्यास त्यातील उच्च शैक्षणिक अर्हता व मिळालेली गुणांची श्रेणी, अनुभव, वयाची सेवाजेष्ठता यांना प्राधान्यक्रम देण्यात येईल.
त्यानुसार अंतिम निवड यादीप्रमाणे / गुणवत्ता यादीप्रमाणे पात्र उमेदवारांना बँकेच्या लिपीक (Clerk) पदी परिविक्षाधीन कालावधीकरीता (Probation Period) नियुक्ती देण्यात येईल.