Latur DCC Bank Exam Pattern and Syllabus: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ऑनलाईन परीक्षा अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप

Latur DCC Bank Exam Pattern and Syllabus 2025

Latur DCC Bank Exam Pattern and Syllabus: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., लातूर अंतर्गत लिपीक (लेखनिक), शिपाई (Sub Grade – Multipurpose Support Staff) व वाहन चालक पदांसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या निवड प्रक्रियेमध्ये १०० गुणांपैकी ९० गुणांची संगणक आधारित ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असून एकूण ९० प्रश्न आणि ९० मिनिटांचा कालावधी असेल. ऑनलाईन परीक्षेनंतर लिपीक (लेखनिक) पदासाठी कागदपत्र पडताळणी व १० गुणांची मुलाखत घेण्यात येईल. शिपाई व वाहन चालक पदांसाठी शैक्षणिक गुणभार लागू नसून १० गुणांची मौखिक परीक्षा घेण्यात येईल. परीक्षा मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांत होणार असून प्रश्नपत्रिका कालबद्ध विभागांमध्ये (Time Bound Groups) विभागलेली असेल.

लिपीक / लेखनिक पद – परीक्षा पद्धत व अभ्यासक्रम

घटकतपशील
एकूण गुण90 गुण
प्रश्नांची संख्या90 प्रश्न
प्रत्येक प्रश्नाचे गुण1 गुण
परीक्षेचा कालावधी90 मिनिटे
प्रश्नप्रकारवस्तुनिष्ठ (MCQ)
परीक्षेचे माध्यममराठी व इंग्रजी

लिपीक / लेखनिक अभ्यासक्रम

अ.क्र.विषय
1कृषी वित्त व शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचना
2बँकिंग व सहकार
3सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
4इंग्रजी भाषा ज्ञान
5कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था
6संगणक ज्ञान व माहिती तंत्रज्ञान
7बुद्धीमापन चाचणी (Reasoning)

मुलाखत (लिपीक / लेखनिक)

घटकगुण
शैक्षणिक पात्रता व अनुभव5 गुण
मौखिक मुलाखत5 गुण
एकूण10 गुण

शिपाई / Sub Grade व वाहन चालक – परीक्षा पद्धत व अभ्यासक्रम

घटकतपशील
एकूण गुण90 गुण
प्रश्नांची संख्या90 प्रश्न
कालावधी90 मिनिटे
प्रश्नप्रकारवस्तुनिष्ठ (MCQ)
परीक्षेचे माध्यममराठी व इंग्रजी

शिपाई / वाहन चालक अभ्यासक्रम

अ.क्र.विषय
1मराठी भाषा
2इंग्रजी भाषा
3लातूर जिल्ह्याचा भूगोल व इतिहास
4गणित (Numerical Ability)
5बँकिंग व सहकार
6बुद्धीमापन चाचणी

ऑनलाईन परीक्षेचे कालबद्ध विभाग (Time Bound Groups)

विभागप्रश्नांची संख्यावेळ
Group A22 / 23 प्रश्न22 / 23 मिनिटे
Group B22 / 23 प्रश्न22 / 23 मिनिटे
Group C22 / 23 प्रश्न22 / 23 मिनिटे
Group D22 / 23 प्रश्न22 / 23 मिनिटे
Download Latur DCC Bank Exam Pattern and Syllabus