Maharashtra Mega Bharti 2025 – “आज राज्यामध्ये गुंतवणूकी संदर्भात 17 करार आपण केले. या 17 कराराच्या माध्यमातून जवळपास 34 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. जवळपास 33 हजार नवीन रोजगारांची महाराष्ट्रात निर्मिती होईल” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “हे जे करार झाले आहेत, त्यातले पाच करार हे उत्तर महाराष्ट्रातील आहेत, 9866 कोटी रुपयांचे हे करार आहेत, यात नाशिकमध्ये, अहिल्यानगर, नंदुरबार येथे गुंतवणूक होणार आहे” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “पाच करार पुणे विभागाचे आहेत, यात 11,966 कोटींची गुंतवणूक आहे. 6 करार विदर्भाबाबत आहेत. यात 11642 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूरमध्ये ही गुंतवणूक होणार आहे. 3000 कोटीची गुंतवणूक रायगडमध्ये आहे, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
तसेच सध्या पूर्ण भारतात, गुंतवणुकीसाठी उद्योजकांची पहिली पसंती महाराष्ट्र असून सुमारे ३४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या १७ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या गुंतवणुकीमुळे राज्यात तब्बल ३३ हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सौरऊर्जा, वीजेवर चालणाऱ्या बसेस आणि ट्रक्सची निर्मिती व संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योजका राज्यात प्रकल्प उभारणार आहेत. विदर्भ, पुणे, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात प्रकल्पांची उभारणी होणार आहे. सुमारे ३३ हजार ७६८ कोटी रूपयांचे करार उद्योगमंत्री उदय सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ३३ हजार ४८३ नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच उद्योजकांना दिलासा मिळणार असून टप्प्याटप्प्याने वीजशुल्कात कपात होणार आहे. उद्योग स्थापन करताना कोणतेही अडथळे येऊ नयेत, म्हणून राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. पुणे विभागात ११ हजार ९६६ कोटी रुपयांचे पाच प्रकल्प तर विदर्भात ११ हजार ६४२ कोटींचे सहा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. याशिवाय उत्तर महाराष्ट्रात ९ हजार कोटींचे ५ प्रकल्पांची निर्मिती होणार आहे. कोकणात ३००० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
सोबतच महाराष्ट्रातील सरकारी कोणत्या विभागात किती पदांची भरती होणार ?
- गृह (पोलिस) – १५०००
- शिक्षण (शिक्षक) – १०,०००
- स्थानिक स्वराज्य संस्था १०,०००
- एमपीएससी ‘तर्फे भरती – १०,०००
- पशुसंवर्धन व अन्य विभाग – १३,०००
“वेगवेळया सेक्टरमध्ये ही गुंतवणूक येत आहे. इलेक्ट्रीक बस, ट्रक आहे इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, सोलर मॉड्यूल आहे. इतरही काही वेगवेगळ्या पद्धतीची गुंतवणूक येत आहे. महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही विकसिनशील योजना आहेत, टॅरिफ वॉर सुरु असताना महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणं, हा महाराष्ट्रावरचा विश्वास आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “उद्योग विभागाच्या माध्यमातून मैत्री पोर्टल तयार करुन उद्योजकांना डिजिटल अनुभव दिला. पुढे देखील अशीच गुंतवणूक पहायला मिळेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.