MSRTC Bharti 2025 – There’s an opportunity to work at the State Transport Corporation (MSRTC). MSRTC Bharti 2025 Process has announced a recruitment drive for various positions, including electricians and carpenters For ITI, 10th Pass, 8th Pass Candidates. This is a golden chance to secure a job at the Maharashtra State Road Transport Corporation. Applications are currently being accepted for a total of 367 vacancies. The official advertisement for this recruitment was published by the Divisional Controller of the State Transport Corporation thorugh apprenticeshipindia.gov.in. More detials are given below.
एसटी महामंडळात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. एसटी महामंडळात सध्या इलेक्ट्रिशियन, कारपेंटर अशा विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एसटी महामंडळात सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण ३६७ पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठीची जाहिरात विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. (MSRTC Bharti 2025)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातील या नोकरीसाठी ITI/ अभियांत्रिकी पदवीधर/ पदविकाधारक उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. प्रशिक्षणार्थी पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. प्रशिक्षणाचे ठिकाण नाशिक येथे असार आहे. अभियांत्रिकी पदवीधर, मॅकेनिकस मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, मॅकेनिक अॅटो इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक्स,वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रीक), पेन्टर, मॅकेनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मॅकेनिक (रेफिजरेशन अँड एअर कंडिशनिंग),इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, कारपेंटर या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १४ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे.
या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२५ आहे. इच्छुकांनी सर्वात आधी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे.यानंतर तुम्हाला वेबसाइटवर अर्ज करायचा आहे. शिकाऊ उमेदवारांच्या निवडीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय, एन.डी.पटेल रोड,शिंगाडा तलाव नाशिक येथे तुम्हाला अर्ज नमुना मिळणार आहे. त्यानंतर तो भरुन सबमिट करायचा आहे.
टिटवाळा