Maharashtra Nagar Parishad Bharti 2026 – Nagar Parishad Bharti 2026 Online Application Forms forms for more than 3000 Vacancies will start soon. Large Number ofcandidates from all ove Maharashtra are waiting for this Nagar Parishad Bharti 2026. Despite instructions to complete the recruitment process for permanent vacant posts in Group C and Group D categories in the state’s municipal councils and nagar panchayats, the process has been stalled. Therefore, Deputy Commissioner Shantaram Gosavi of the Directorate of Municipal Administration has given clear instructions to the divisional joint commissioners of the state’s municipalities to immediately complete the recruitment process through TCS or IBPS. According to the instructions given by Gosavi, consolidated guidelines have been issued regarding the filling of posts in Group B (non-gazetted), Group C, and Group D categories under the nomination quota through direct recruitment, as per the government resolution of the General Administration Department. A district selection committee has also been constituted under the chairmanship of the District Collector for filling district-level posts under this Nagar Parishad Bharti 2026.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..
Maharashtra Nagar Parishad Recruitment 2026 Latest Update – मित्रांनो, आपल्यासाठी ऐक महत्वाची बातमी घेऊन आम्ही आलो आहे. काळ झालेल्या ब्यठकीमधील हा एक महत्वाचा अपडेट आहे. तर, राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील गट-क आणि गट-डच्या स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश असतानाही रखडली आहे. त्यामुळे टीसीएस किंवा आयबीपीएसमार्फत संबंधित भरतीप्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपायुक्त शांताराम गोसावी यांनी राज्यातील नगरपालिकांच्या विभागीय सहआयुक्तांना दिले आहेत. गोसावी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, सामान्य प्रशासनाच्या शासननिर्णयानुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील गट ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरणेबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून, जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आली आहे. या नुसार ३ हजार पेक्षा जास्त पदांसाठी हि भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील गट ब (अराजपत्रित), Maharashtra Nagara Parishad Bharti 2026 गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी शासनाने स्पर्धा परीक्षा प्रक्रिया TCS ION (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व IBPS ( इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपन्यांची निवड केली आहे. सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरांवर दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी, असे नमूद केले आहे. सरळ सेवेद्वारे गट-क व गट-डच्या विविध संवर्गातील स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यासाठी सूचना देण्यात आल्या असून, सरळसेवा पदभरतीबाबत रूपरेषा, वेळा-पत्रक ठरवून देण्यात आली आहे. याबाबत संचालनालय स्तरावरून दृकश्राव्य प्रणालीद्वारे वारंवार आढावा घेऊन भरतीप्रक्रिया राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. परंतु सरळसेवा पदभरती प्रक्रियेसाठी शासनाकडून निवडलेल्या कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आलेला नाही किंवा जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही, असे संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सोमवारी याबाबत सोमवारी ( दि.१२ जानेवारी २०२६ ) आढावा बैठक आयोजित करून त्यात भरतीप्रक्रियेची पुढील दिशा ठरविण्यात आली.