New Domicile status For Biharis – आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शिक्षक भरती प्रक्रियेत अधिवास (Bihar ke pradhanmantri kaun hai – डोमिसाईल) धोरण लागू करण्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी केली. शिक्षक भरती प्रक्रियेत बिहारच्या स्थानिक रहिवाशांना प्राधान्य देण्यासाठी संबंधित नियमांमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.‘टीआरई-४’ (शिक्षक भरती परीक्षा) पासून हा नियम लागू करण्यात येईल, असे नितीशकुमार यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सांगितले आहे. यानुसार शिक्षक भरतीत आधी बिहारी नागरिकांना प्राधान्य मिळणार असून नंतर अन्य नागरिकांना संधी मिळणार आहे. नितीशकुमार म्हणाले, की नोव्हेंबर २००५ मध्ये सत्तेवर आल्यानंतर आम्ही शिक्षण क्षेत्रात सुधारणांसाठी सतत प्रयत्न करीत आहोत.
शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी मोठ्या संख्येने शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यंदा होणाऱ्या शिक्षक भरती परीक्षा-४ पासून हा आदेश अमलात येईल. त्यानंतरची भरती परीक्षा पुढील वर्षी म्हणजे २०२६ मध्ये होणार आहे. आगामी शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये बिहार सरकारने मोठा निर्णय घेतला असून, यामध्ये बिहारचे रहिवासी उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. या निर्णयामुळे बाहेरील राज्यांतील उमेदवारांसाठी स्पर्धा अधिक कठीण होणार असून स्थानिक बेरोजगार तरुणांना याचा मोठा फायदा होईल. राज्यातील स्थानिक भाषेचा आणि संस्कृतीचा विचार करता ही भूमिका योग्य असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.