१०वी, १२वी पास तरुणांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीची संधी, अर्ज सुरु, भरपूर जागा! Thane DCC Bank Bharti

Thane DCC Bank Bharti – मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती बँकेत पर्मनंट नोकरीची मस्त संधी अमोर आली आहे. तुम्ही जर १० वी, १२ वी पास असाल आणि एखादी चांगली नोकरी शोधत असाल तर हि एक जबरदस्त संधी आहे. चला तर या बदल पूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया बघूया. ता हि भरती जाहिरात, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सध्या भरती विभाग द्वारे जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ज्युनिअर बँकिंग असिस्टंट, शिपाई, सुरक्षारक्षक, वाहन चालक इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत. ज्युनिअर बँकिंग श्रेणी अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. एकूण विविध १६५ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ही नोकरी तुमच्या करिअरच्या उद्देशाने खूप चांगली संधी आहे. ज्युनिअर बँकिंग असिस्टंट या श्रेणीतील १२३ पदे रिक्त आहेत. शिपाई पदांसाठी ३६, सुरक्षारक्षक पदांसाठी ५ जागा, वाहनचालक पदासाठी १ जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांची भरती सरळसेवा पद्धतीने होणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. 

Thane DCC Bank Bharti 2025

  • पदाचे नाव –  ज्युनिअर बँकिंग असिस्टंट, शिपाई, सुरक्षारक्षक, वाहन चालक
  • पद संख्या – 165 जागा
Name of Posts Number of vacancies 
ज्युनिअर बँकिंग असिस्टंट123 पदे
शिपाई36 पदे
सुरक्षारक्षक05 पदे
वाहन चालक01 पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – ठाणे 
  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • ज्युनिअर बँकिंग असिस्टंट – रु.944/-
    • इतर पदांसाठी – रु. 590/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ ऑगस्ट २०२५
  • हेल्पलाईन फोन – 9156032598 (कार्यालयीन वेळेत)
  • अधिकृत वेबसाईट – thanedistrictbank.com 

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत ८वी, १०वी, १२वी आणि पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला १५००० ते २०,००० रुपये वेतन मिळणार आहे.या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करताना ५९० ते ९४४ रुपये शुल्क भरावा लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी निवड ऑनलाइन परीक्षा, कागदपत्रे पडताळणी, मुलाखतीद्वारे होणार आहे. ऑनलाइन परीक्षेत निवड झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर प्रोबेशन कालावधी १ वर्षांचा असणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२५ असणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड झाल्यावर तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे.

Educational Qualification Thane DCC Bank Bharti  2025

या भरतीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता आम्ही खाली दिलेली आहे. विविध पदांच्या नुसार आपण अर्ज करण्याआधी पात्रता काळजीपूर्वक बघायन घ्यावी. तसेच आम्ही अधिकृत PDF लिंक सुद्धा खाली दिलेली आहे, ती सुद्धा पडताळून घेणे आवश्यक आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ज्युनिअर बँकिंग असिस्टंटउमेदवार शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण असावा. अथवा समकक्ष श्रेणी (equivalent) धारण करून उत्तीर्ण असावा. उमेदवारास संगणकीय ज्ञान असणे आवश्यक राहील. यासाठी उमेदवाराने शासन मान्य संस्थेतुन MSCIT हा संगणक कोर्स उत्तीर्ण केला असला पाहीजे.
शिपाई८वी ते १२वी उत्तीर्ण
सुरक्षारक्षक८वी ते १२वी उत्तीर्ण
वाहन चालक८वी ते १२वी उत्तीर्ण

 

-: महत्वाच्या सूचना :- 

१) उमेदवाराने आपल्या अर्ज भरल्याची प्रत व परीक्षा शुल्क भरल्याची पावती स्वतः जवळ सांभाळून ठेवावी

२) संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरते वेळी, अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण आल्यास +९१-९१५६०३२५९८ हा हेल्पलाईन क्रमांक आहे, अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाल्यास [email protected]  या मेल-आयडीवर ई-मेलव्दारे संपर्क साधावा. वरील हेल्पलाईन क्रमांक व मेल-आयडी फक्त काही तांत्रिक अडचणी (अर्ज भरते वेळी, मुलाखतपत्र डाउनलोड करते वेळी इत्यादी) निर्माण झाल्यास संपर्काकरिता आहे .

३) ऑनलाईन परिक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्यावत केल्याशिवाय व पूर्ण फॉर्म भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

४) उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना त्यांनी शैक्षणिक पात्रता स्वतःच्या ईमेल आयडी मोबाईल क्रमांक व आधारकार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे. 

५) उमेदवारांनी पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.

६) प्रस्तुत पदांकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून विहित परिक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत

७) सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील 

८) उमेदवाराने नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर परीक्षेची पावती/प्रवेशपत्राची पावती किंवा झेरॉक्स प्रत पाठवू नये.

९) उमेदवाराने भरलेले परिक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. 

Important Links For Thane District Bank Recruitment 2025

📑PDF जाहिरात
PDF जाहिरात लिंक
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://thanedccbank.com/
✅ अधिकृत वेबसाईट
thanedistrictbank.com

Leave a Comment