Age Limit for Police Bharti – पोलीस भरती वयोमर्यादा 2025; महिला उमेदवारास सवलत

Age Limit for Police Bharti: पोलीस भरती २०२५ साठी उमेदवारांची वयोमर्यादा ही भरती प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची अट आहे. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी उमेदवाराचे वय खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे. वयाची गणना ह्याच तारखेपर्यंत करण्यात येईल.

पोलीस भरती २०२५ — वयोमर्यादा (Age Limit For Police Bharti)

टीप: वयोमर्यादा म्हणजेच उमेदवाराच्या जन्मतारखेनुसार त्याचे वय मोजले जाते. जर उमेदवार आरक्षित प्रवर्गात किंवा विशिष्ट श्रेणीत मोडत असेल, तर त्याला शासनाने ठरविलेल्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
अ. क्र. प्रवर्ग किमान वयोमर्यादा कमाल वयोमर्यादा
1 खुला प्रवर्ग 18 वर्षे 28 वर्षे
2 मागास प्रवर्ग (अ.जाती, अ.जमाती, वि.जा.अ., भ.ज.ब., भ.ज.क., भ.ज.-ड., वि.मा.प्र., इ.मा.व., ई.डब्ल्यू.एस. इ.) 18 वर्षे 33 वर्षे
3 प्रकल्पग्रस्त उमेदवार 18 वर्षे 45 वर्षे
4 भूकंपग्रस्त उमेदवार 18 वर्षे 45 वर्षे
5 माजी सैनिक उमेदवार 18 वर्षे सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी + 3 वर्षे अतिरिक्त
6 पदवीधर / पदविकाधारक अंशकालीन उमेदवार 18 वर्षे 55 वर्षे

वरीलप्रमाणे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवाराने आपला जन्मतारीख प्रमाणपत्र किंवा १०वीच्या मार्कशीटवरील जन्मतारीख पाहून आपले पात्रता तपासावी. अर्ज करताना चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी यालिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..!
“वय हा फक्त आकडा आहे! खरी शक्ती तुमच्या जिद्दीमध्ये आहे.” म्हणून, ज्या वयोगटात तुम्ही पात्र आहात त्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. शिस्त, मेहनत आणि सातत्य — ह्याच तीन गोष्टी तुम्हाला पोलीस दलात स्थान मिळवून देतील.

वयोमर्यादा — पोलीस भरती २०२५ (Age Limit for Police Bharti 2025)

पोलीस भरती २०२५ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी आपली वयोमर्यादा खालीलप्रमाणे तपासावी. ही वयोमर्यादा शासनाच्या नियमांनुसार निश्चित करण्यात आली आहे.

i) सर्वसाधारण प्रवर्गानुसार वयोमर्यादा

अ. क्र. प्रवर्ग किमान वयोमर्यादा कमाल वयोमर्यादा
1 खुला 18 वर्षे 28 वर्षे
2 मागास प्रवर्ग (अ.जाती, अ.जमाती, वि.जा.अ., भ.ज.ब., भ.ज.क., भ.ज.-ड., वि.मा.प्र., इ.मा.व., ई.डब्ल्यू.एस. इ.) 18 वर्षे 33 वर्षे
3 प्रकल्पग्रस्त उमेदवार 18 वर्षे 45 वर्षे
4 भूकंपग्रस्त उमेदवार 18 वर्षे 45 वर्षे
5 माजी सैनिक उमेदवार 18 वर्षे सेवेचा कालावधी + 3 वर्षे
6 पदवीधर / पदविकाधारक अंशकालीन उमेदवार 18 वर्षे 55 वर्षे
7 अनाथ उमेदवार 18 वर्षे 33 वर्षे

ii) समांतर आरक्षणांतर्गत येणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा

खालील उमेदवारांना समांतर आरक्षणांनुसार स्वतंत्र वयोमर्यादेची सवलत देण्यात आलेली आहे.

अ. क्र. प्रवर्ग किमान वयोमर्यादा खुला वर्गासाठी कमाल वयोमर्यादा मागास प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा
1 महिला उमेदवार 18 वर्षे 28 वर्षे 33 वर्षे
2 खेळाडू उमेदवार 18 वर्षे 28 + 5 वर्षे (म्हणजे 33 वर्षे) 33 + 5 वर्षे (म्हणजे 38 वर्षे)
3 पोलीस पाल्य 18 वर्षे 28 वर्षे 33 वर्षे
4 गृहरक्षक उमेदवार 18 वर्षे 28 वर्षे 33 वर्षे
5 माजी सैनिकावर अवलंबून असलेले (मुलगा, मुलगी, पत्नी) उमेदवार 18 वर्षे 28 + 3 वर्षे (म्हणजे 31 वर्षे) 33 + 3 वर्षे (म्हणजे 36 वर्षे)
टीप: शासन आदेश क्र. पोलीस-११२५/प्र.क्र.१७३/पोल-५ अ, दिनांक १७/१०/२०२५ अन्वये — ०१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत ज्यांची कमाल वयोमर्यादा पूर्ण झाली आहे,
असे सर्व प्रवर्गातील उमेदवार २०२४ व २०२५ च्या भरती प्रक्रियेसाठी एक वेळची विशेष सवलत (One-time relaxation) म्हणून पात्र असतील.

ही सवलत केवळ या कालावधीपुरती लागू राहील आणि भविष्यातील भरतीसाठी वेगळ्या सूचना दिल्या जाऊ शकतात.
त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने अर्ज भरण्यापूर्वी वयाची खात्री जन्मतारीख प्रमाणपत्रावरून करावी.

Leave a Comment