Important Documents For NHM CHO Maharashtra Exam – कागदपत्र पडताळणीसाठी लागणारी महत्वाची यादी डाउनलोड करा

List Of Documents For NHM CHO Bharti

Important Documents For NHM CHO Maharashtra Exam: ऑनलाईन परिक्षा व कागदपत्र पडताळणीस उमेदवारास स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल. प्रस्तुत जाहिरातीमध्ये उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार असल्याने स्पर्धा परीक्षेअंती गुणवत्तेनुसार प्रथम अंतरीम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल. तद्नंतर अर्ज सादर करताना उमेदवारांनी अर्जात नमूद केलेले व सदर पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक असणारी सर्व विहित मूळ कागदपत्रे यांची छाननी करून अंतिम निवड यादी व प्रतिक्षायादी प्रसिद्ध करण्यात येईल. जे उमेदवार कागद पत्र छाननीच्या वेळी मूळ कागदपत्र दर्शविण्यास असमर्थ ठरतील, असे उमेदवार अंतिम निवडीस पात्र राहणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी यालिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..!
  • माजी सैनिकासाठी असलेल्या पदांवर शिफारशीसाठी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्यांच्यासाठी आरक्षित असलेली पदे भरती संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, परिपत्रक, शासन निर्णययानुसार कार्यवाही करण्यात येईल.
  • खेळाडू/महिला/प्रकल्पग्रस्त / भुकंपग्रस्त / पदवीधर पदविकाधारक अंशकालीन उमेदवार या समांतर आरक्षणाचे प्रवर्गातुन पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदांसाठी त्या त्या सामाजिक प्रवर्गातुन सर्वसाधारण (समांतर आरक्षण विरहीत) पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार विचार करणेत येईल.
  • वि.जा.(अ)/ भ.ज.(ब)/ भ.ज.(क) / भ.ज.(ड)/ वि.मा.प्र., इमाव, ईडब्ल्युएस या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी उन्नत आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेयर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले अलिकडील / नविनतम मूळ नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्र अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत प्राप्त करणे आवश्यक राहील. सदर प्रमाणपत्राची पडताळणी कागदपत्र तपासणीच्या वेळी करण्यात येईल.
  • शासन परिपत्रक, सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सीबीसी-२०१२/प्र.क्र.१८२/विजाभज १, दि.२५ मार्च २०१३ अन्वये विहित कार्यपद्धती नुसार तसेच शासनशुद्धीपत्रक संबंधित जाहिरातीमध्ये नमूद अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांक संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती / गटामध्ये मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी गृहित धरण्यात येईल.
  • शासन परिपत्रक, सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सीबीसी-२०१३/प्र.क्र.१८२/विजाभज १, दि. १७ ऑगस्ट २०१३ अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार उन्नत आणि प्रगत व्यक्ती / गटयामध्ये मोडत नसल्याचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राच्या वैधतेचा कालावधी विचारात घेण्यात येईल
  • जातीच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, पृष्ठ १७/ भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणी चे वि नियम) अधिनियम २००० मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकारी यांचेकडून प्रदान करण्यात आलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याबाबत चे सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोक प्रतिनिधित्व कायदा १९५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तसाच अर्थ असेल.
  • – लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र –
    a. शासनाच्या धोरणानुसार उमेदवारास लहान कुटुंब धोरणाचे पालन करणे आवश्यक राहील.
    b. तसेच अर्जासोबत सदर लहान कुटुंब छायांकित प्रमाणपत्र सादर करावे व उमेदवाराने आपण निवडीस पात्र झाल्यास छाननी दरम्यान लहान कुटुंब असल्याबाबतचे मूळ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
    c. सदर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्राचा नमुना अर्जा सोबत जोडला आहे.
  • महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास (लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतर चे नाव) त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे, विवाह नोंदणी दाखला असणे आवश्यक आहे.
  • एस.एस.सी. अथवा तत्सम प्रमाणपत्रांवरील नावाप्रमाणे अर्ज भरावेत. त्यानंतर नाव बदलले असल्यास अथवा प्रमाणपत्रातील नावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास, त्यासंबंधीच्या बदला संदर्भातील राजपत्राची प्रत कागदपत्र पडताळणीच्यावेळी सादर करावी.
  • पत्र व्यवहारासाठी स्वतःचा पत्ता इंग्रजीमध्ये लिहावा. व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र, स्वयंअध्ययन मार्गदर्शन केंद्र / वर्ग अथवा तत्सम स्वरुपाच्या कोणत्याही मार्गदर्शक केंद्राचा /संस्थेचा पत्ता पत्रव्यवहारासाठी देवू नये.
  • अर्जामध्ये केलेला दावा व कागद पत्रे तपासणी चे वेळी सादर केलेल्या सारांश पत्रातील अथवा सादर केलेल्या कागदपत्रांतील दावायामध्ये फरक आढळून आल्यास अर्जामधील माहिती अनधिकृत समजण्यात येईल.
  • अर्जामधील माहिती संदर्भातील कागदोपत्री पुरावे सादर करून शकल्यास / न मिळाल्यास उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. संबंधित पदाच्या / परीक्षेच्या जाहिरातीत दिलेल्या सर्व सूचनांचे काळजी पूर्वक अवलोकन करुनच अर्ज सादर करावा.
  • अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता आजमावली जाईल व त्याच्या आधारे निवड प्रक्रिया पूर्ण होईल.

Leave a Comment