List Of Documents Required For Bhukarmapak Bharti-भूमी अभिलेख भूकरमापक च्या ९०३ पदांसाठी आवश्यक्य कागतपत्र यादी

Imp Document List Required For Bhukarmapak Bharti 2025

List Of Documents Required For Bhukarmapak Bharti: मित्रांनो, महाराष्ट्र भूमी अभिलेख भरतीची ऑनलाइन परीक्षा सुखकररीत्या पूर्ण झाली आहे. मोठ्या संख्येने उमेदवारांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवला. IBPS मार्फत 13 ते 14 नोव्हेंबर दरम्यान राज्यभरातील केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. उपलब्ध माहितीनुसार महाभूमी परीक्षेचा निकाल लवकरच घोषित होईल. विभागात अनेक पदे रिक्त असल्याने पुढील टप्पेही जलद गतीने पार पडण्याची शक्यता आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया देखील तत्काळ सुरू होईल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी यालिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..!

निकाल जाहीर झाल्यानंतर दस्तऐवज पडताळणीचा टप्पा लगेच सुरू होणार असल्यामुळे भूमी अभिलेख परीक्षा 2025 साठी लागणारी सर्व कागदपत्रे तयार ठेवणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. खालील लिंकवर भूमी अभिलेख परीक्षा 2025 साठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादी उपलब्ध करून दिली आहे.

  • शासन निर्णय सा.प्र.वि. क्रमांक प्रशासन २०००/प्र.क्र.५/२००१/३२, दि. २०/०७/२००२ व दि. १९/०३/२००३ शासन निर्णयानुसार उपरोक्त पदांकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र. मातंसं २०१५/प्र.क्र.२७७/३९ दिनांक ०४/०२/२०१३, सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान) शासन पुरकपत्र दिनांक ०८/०१/२०१८ व दिनांक १६/०७/२०१८ मध्ये नमुद केल्याप्रमाणे अथवा महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी विहीत केलेले संगणक हाताळणे/वापराबाबतचे प्रमाणपत्र त्यांच्या नियुक्तीच्या दिनाकांपासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. अन्यथा त्यांची सेवा समाप्त होईल.
  • उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. (वैध डोमिसाईल प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक) अर्जदाराने महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे शासनाने प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • निवड झालेल्या उमेदवाराने जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून शासकीय सेवा करण्याकरीता शारीरीक क्षमतेचे वैद्यकिय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र शासनाने माध्यमिक शालांत परीक्षेशी समकक्ष ठरवलेली परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांस महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून/शासनाकडून अशा परीक्षेची समकक्षता पडताळणी करुन घेतल्यानंतरच नियुक्ती दिली जाईल.
  • निवड यादीतील उमेदवाराने नियुक्तीपूर्वी मूळ शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभवाचा दाखला, जात प्रमाणपत्र, सन २०२५-२६ (चालू वित्तीय वर्षाचे) साठी वैध असलेला नॉन क्रिमीलेअर दाखला (आवश्यक त्या प्रवर्गासाठी). तसेच समांतर आरक्षणांतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र त्याचप्रमाणे इतर आवश्यक ती प्रमाणपत्रे कागदपत्रांच्या मूळ प्रती तसेच त्यांच्या छायांकित प्रती छाननीसाठी तपासणीसाठी नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्रे कागदपत्रे यांची छाननी नियुक्ती प्राधिकारी यांचे स्तरावर केली जाईल. व तद्नंतरच नियुक्तीस पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येतील. उमेदवाराने प्रमाणपत्र मिळणेकरीता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या ग्राहय धरल्या जाणार नाहीत. छाननी अंती वरील प्रमाणपत्रे (कागदपत्रामध्ये त्रुटी आढळल्यास / माहिती खोटी आढळल्यास नियुक्ती दिली जाणार नाही/ नियुक्ती रद्द होईल.
  • सदर पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीस १ वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी लागू राहील. (परिविक्षा कालावधी जास्तीत जास्त १ वर्षापर्यंत वाढविता येईल). या पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीस परिविक्षाधीन कालावधीत, विहीत केलेले भूमि अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी, छ. संभाजीनगर येथील प्रशिक्षण पूर्ण करणे, या पदासाठी विहीत सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण करणे आणि परिविक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील. जर त्याने/तिने विहीत प्रशिक्षण पूर्ण केले नाही अथवा सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण केली नाही अथवा परिविक्षाधीन कालावधी समाधानकाररित्या पूर्ण केला नाही अथवा त्या पदावर काम करण्यास योग्य नसल्याचे आढळून आल्यास तो/ती सेवा समाप्तीस पात्र राहील.
  • खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ई.डब्ल्यू.एस.) वर्गातील उमेदवारांकरीता सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्र. राआधी-४०१९/प्र.क्र.३१/१६-अ, दि.१२/०२/२०१९ अन्वये विहित करण्यात आलेले कागदपत्रे/पुरावा (परिशिष्ट-क) आणि स्वयंघोषणापत्र (परिशिष्ट-ड) पडताळणीच्या वेळी आवश्यक राहील. तसेच आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या / उमेदवाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.८ लाखाच्या आत असले पाहिजे व ती व्यक्ती किंवा तिचे कुटुंबीय महाराष्ट्र राज्यात दि. १३/१०/१९६७ रोजी किंवा त्यापूर्वीचे रहिवासी असणे आवश्यक राहील.
    सदर प्रवर्गातील उमेदवारांकरीता वय, परीक्षा फी व इतर अनुज्ञेय सवलती ह्या इतर मागास प्रवर्गास राज्य शासनाने वेळोवेळी लागू केलेल्या नियमानुसार राहतील.

Leave a Comment