Beed Police Patil Bharti Syllabus and Exam Pattern 2026
Beed Police Patil Bharti Syllabus and Exam Pattern: उपविभागीय कार्यालय व उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, बीड अंतर्गत पोलीस पाटील पदांच्या भरतीसाठी एकूण ११७८ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी निवड प्रक्रिया एकूण १०० गुणांची असून त्यामध्ये ८० गुणांची लेखी परीक्षा व २० गुणांची तोंडी (मुलाखत) परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असून ती इयत्ता दहावी (एस.एस.सी.) स्तरावरील अभ्यासक्रमावर आधारित असेल. या परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, पोलीस पाटील यांचे अधिकार व कर्तव्ये, स्थानिक परिसराची माहिती तसेच चालू घडामोडी या विषयांचा समावेश असेल. लेखी परीक्षेत किमान ३६ गुण (४५ टक्के) प्राप्त करणाऱ्या गुणवत्ताधारक उमेदवारांना तोंडी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येईल. लेखी परीक्षेत पात्र ठरूनही तोंडी परीक्षेस अनुपस्थित राहणारा उमेदवार अंतिम निवडीस अपात्र ठरेल. लेखी परीक्षा देताना उत्तरपत्रिकेवर उत्तरे लिहिण्यासाठी अथवा चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळ्या शाईच्या बॉलपेनचा वापर करणे बंधनकारक आहे.
beedpp.recruitonline.in Online Application: बीड पोलीस पाटील भरती ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत
पोलीस पाटील भरती २०२६ (बीड) साठी परीक्षा पद्धती – Beed Police Patil Bharti Exam Pattern
Beed Police Patil Recruitment 2026 exam pattern and syllabus details. Check written test marks, interview process, subjects to study, and selection criteria.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..
पोलीस पाटील पदासाठी निवड प्रक्रिया एकूण १०० गुणांची असून ती दोन टप्प्यांत पार पडते.
लेखी परीक्षा
- एकूण गुण : ८०
- प्रश्नसंख्या : ८०
- प्रत्येक प्रश्नाचे गुण : १
- प्रश्नपत्रिकेचे स्वरूप : वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी (MCQ)
- अभ्यासक्रमाची पातळी : इयत्ता १० वी (SSC) पर्यंत
- किमान पात्रता गुण : ३६ गुण (४५%)
➡️ लेखी परीक्षेत किमान ४५% गुण मिळवलेल्या व गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच पुढील टप्प्यास बोलावले जाईल.
तोंडी परीक्षा (मुलाखत)
- एकूण गुण : २०
- लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना तोंडी परीक्षेस उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
- तोंडी परीक्षेस अनुपस्थित राहणारा उमेदवार अंतिम निवडीस अपात्र ठरेल.
- मुलाखतीत शून्य गुण मिळाले असले तरी लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीत स्थान मिळत असल्यास उमेदवार निवडीस पात्र राहील.
समान गुण मिळाल्यास शासन निर्णयानुसार प्राधान्यक्रम ठरवून अंतिम निवड केली जाईल.
Beed Police Patil Bharti Exam Pattern 2026
| परीक्षेचा टप्पा | प्रकार | गुण | तपशील |
|---|---|---|---|
| लेखी परीक्षा | वस्तुनिष्ठ (MCQ) | 80 | 80 प्रश्न, प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा इयत्ता 10 वी स्तरावर आधारित किमान पात्रता : 36 गुण (45%) |
| तोंडी परीक्षा (मुलाखत) | प्रत्यक्ष मुलाखत | 20 | लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांसाठी अनिवार्य अनुपस्थित राहिल्यास अपात्रता |
| एकूण | — | 100 | अंतिम निवड एकूण गुणांवर आधारित |
Beed Police Patil Bharti Syllabus 2026
| अ.क्र. | विषय | अभ्यासक्रमाचा तपशील |
|---|---|---|
| 1 | सामान्य ज्ञान | इतिहास, भूगोल, राज्य व देशाची मूलभूत माहिती |
| 2 | चालू घडामोडी | राज्य, राष्ट्रीय व स्थानिक चालू घडामोडी |
| 3 | गणित | मूलभूत अंकगणित, टक्केवारी, गुणोत्तर, सरासरी |
| 4 | बुद्धिमत्ता चाचणी | तार्किक व विश्लेषणात्मक प्रश्न |
| 5 | पोलीस पाटील यांचे अधिकार व कर्तव्ये | पोलीस पाटील पदाशी संबंधित कायदे व जबाबदाऱ्या |
| 6 | स्थानिक परिसराची माहिती | गाव, तालुका, जिल्ह्याची प्रशासकीय माहिती |
महत्त्वाची सूचना
लेखी परीक्षा देताना उत्तरपत्रिकेवर उत्तरे लिहिण्यासाठी किंवा चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळ्या शाईचा बॉलपेन वापरणे बंधनकारक आहे.