Adivasi Vikas Vibhag Chowkidar Bharti 2026 PDF
Adivasi Vikas Vibhag Chowkidar Bharti 2026 : Another Mega Bharti is announced under One of the department of Maharashtra Govt. The Tribal Development Department of Maharashtra has announced a major recruitment drive for 2026, offering 416 Watchman (Group-D) vacancies in government ashram schools and hostels across the state. This Direct Service Recruitment provides a stable career opportunity with a competitive salary scale of ₹15,000 to ₹47,600 (S-1 Pay Matrix) plus government allowances. Eligible candidates who have passed their SSC (10th Standard) can apply online through the official Tribal Development portal before the deadline of May 18, 2026. With significant vacancies in districts like Nashik, Dhule, and Thane, this is a prime opportunity for job seekers in Adivasi Vikas Vibhag Chowkidar Bharti 2026 to secure a permanent government position through a transparent, merit-based selection process.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..
नोकरीच्या शोधात असलेल्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग, नाशिक अंतर्गत विविध प्रकल्प कार्यालयांच्या अखत्यारीत असलेल्या आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये ‘चौकीदार’ (गट-ड) पदांच्या तब्बल ४१६ रिक्त जागांसाठी अधिकृत भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच २७ एप्रिल २०२६ पासून सुरू झाली आहे.
✅कशी असेल चौकीदार पदाची परीक्षा? पाहा सविस्तर परीक्षा पद्धती आणि गुण विभागणी । Adivasi Vikas Vibhag Chowkidar Bharti Syllabus 2026
भरतीचा थोडक्यात तपशील – Adivasi Vikas Vibhag Chowkidar Recruitment 2026
| प्रकल्प कार्यालय (जिल्हा) | एकूण रिक्त पदे | विशेष आरक्षण |
|---|---|---|
| राजूर (अहिल्यानगर) | १५ | ५ महिला, १ माजी सैनिक |
| धुळे | २९ | १३ अराखीव (खुला गट) |
| तळोदा (नंदुरबार) | ३० | १३ महिला आरक्षित |
| नाशिक | ३४ | २ दिव्यांग पदे समाविष्ट |
| कळवण (नाशिक) | ४२ | सर्वात जास्त रिक्त पदे |
| शहापूर (ठाणे) | १९ | ६ महिला पदे |
| धारणी (अमरावती) | १९ | सर्व पदे आरक्षित |
महत्वाच्या तारखा (Adivasi Vikas Vibhag Chowkidar Bharti 2026 Important Dates)
- अर्ज सुरू होण्याची तारीख: २७ एप्रिल २०२६ (दुपारी ३:०० वाजल्यापासून)
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: १८ मे २०२६ (रात्री ११:५५ पर्यंत)
- परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख: १८ मे २०२६
- अधिकृत संकेतस्थळ: tribal.maharashtra.gov.in
वेतनश्रेणी (Adivasi Vikas Vibhag Chowkidar Salary Structure)
निवड झालेल्या उमेदवारांना S-1 वेतनश्रेणीनुसार ₹१५,००० ते ₹४७,६०० आणि नियमानुसार मिळणारे इतर सर्व भत्ते प्रदान केले जातील.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा आणि आरक्षणाबाबतचा सविस्तर तपशील विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज कसा करावा? How To Apply For Maha Tribal Chowkidar Bharti 2026
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपला अर्ज विहित वेळेत सादर करावा:
👉 https://tribal.maharashtra.gov.in
भरतीची मुख्य वैशिष्ट्ये
१. ही भरती सरळसेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.
२. महाराष्ट्रातील विविध जिल्हा केंद्रांवर Computer Based Test (CBT) पद्धतीने परीक्षा घेतली जाईल.
३. परीक्षेचा दिनांक आणि प्रवेशपत्र (Hall Ticket) यथावकाश अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल.
टीप: समांतर आरक्षण आणि पदांच्या संख्येमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक यांच्याकडे राखीव आहेत.
आरक्षण आणि पात्रता निकष
१. महिला आरक्षण: शासन निर्णयानुसार ३०% जागा महिलांसाठी आरक्षित असतील. खुल्या गटातील महिलांसाठी नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली आहे.
२. खेळाडू आरक्षण: ५% आरक्षण केवळ खेळाडू प्रवर्गासाठी असेल, ज्यांचे प्रमाणपत्र विभागीय उपसंचालकांकडून प्रमाणित असणे आवश्यक आहे.
३. माजी सैनिक: १५% आरक्षण माजी सैनिकांसाठी राखीव आहे.
४. दिव्यांग आरक्षण: ४% आरक्षण दिव्यांग व्यक्तींसाठी आहे. (टीप: पूर्णतः अंध व्यक्ती या पदासाठी अपात्र ठरवण्यात आल्या आहेत).
५. अनाथ: १% समांतर आरक्षण अनाथ मुलांसाठी राखीव असेल.
अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी https://tdewatchman2026.cbtexam.in या लिंकवर जाऊन आपले नोंदणी व अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्जासाठी महाराष्ट्र राज्याचा अधिवास (Domicile) असणे अनिवार्य आहे.
निवड प्रक्रिया
ही भरती ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षेवर आधारित असेल. परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम आणि वेळापत्रक लवकरच पोर्टलवर प्रसिद्ध केले जाईल. उमेदवारांना कोणत्याही वैयक्तिक पत्राद्वारे कळवले जाणार नाही, त्यामुळे त्यांनी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्यावी. संपर्क हेल्पलाईन: तांत्रिक अडचणींसाठी १८०० २६७ ०००७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने राज्यातील शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहांच्या सुरक्षेसाठी चौकीदार (गट-ड) संवर्गातील रिक्त पदे भरण्याची घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ३०० जागा भरल्या जाणार असून, यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या नियंत्रणाखालील २९ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत ही पदे भरली जातील.
1 thought on “आदिवासी विकास विभाग : 400+ चौकीदार पदांसाठी मेगा भरती जाहीर | Adivasi Vikas Vibhag Chowkidar Bharti 2026”