महापालिकेची २२२ पदांसाठी मेगा भरती; तयारी कशी कराल? जाणून घ्या संपूर्ण माहिती | Chh Sambhajinagar MC Group C Bharti Exam Syllabus

Chh Sambhajinagar MC Group C Bharti Exam Pattern and Syllabus 2026

chh Sambhajinagar MC Group C Bharti Exam Syllabus: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील विविध संवर्गातील सरळसेवेने खालील रिक्त पदे भरण्याबाबत प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून www.chhsambhajinagarmc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. एकूण २२२ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून रोखपाल, उद्यान सहायक, अनुरेखक, चालक यंत्रचालक, सहायक सुरक्षा अधिकारी, उपअग्निशमन केंद्र अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, स्वच्छता निरीक्षक, अग्निशामक व पशुधन पर्यवेक्षक या पदांचा समावेश आहे. जाहिरातीत नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक पदासाठी स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाची असून मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित/बुद्धिमत्ता चाचणी व संबंधित पदाचे विषयज्ञान या विषयांवर आधारित असेल. परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदासाठी निश्चित केलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार राहील तसेच प्रश्नपत्रिका पदाच्या कामाच्या स्वरूपाशी व तांत्रिक ज्ञानाशी संबंधित असेल. सर्वसाधारण पदांसाठी परीक्षा २०० गुणांची व दोन तासांची राहील. मात्र उपअग्निशमन केंद्र अधिकारी, चालक यंत्रचालक व अग्निशामक या पदांसाठी लेखी परीक्षा १०० गुणांची व एक तासाची असेल. याशिवाय अग्निशमन संवर्गासाठी १०० गुणांची शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. या भरती करिता आवश्यक्य परीक्षा स्वरूप, अभ्यासक्रम, निवड पद्धती या लेखात देण्यात येणार आहे. इच्छुक सर्व तपशील येथे बघू शकता आणि अश्याच विविध विषयांवर माहितीसाठी GovExam.in ला भेट देत राहा……

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..

Vacancy Details For Chh Sambhajinagar MC Group C Bharti Exam

अ.क्र.पदाचे नावजागा
1रोखपाल12
2उद्यान सहायक9
3अनुरेखक9
4चालक यंत्रचालक17
5सहायक सुरक्षा अधिकारी1
6उपअग्निशमन केंद्र अधिकारी4
7कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)32
8स्थापत्य अभियांत्रिकी सहायक24
9स्वच्छता निरीक्षक12
10अग्निशामक100
11पशुधन पर्यवेक्षक7
एकूण222

Chh Sambhajinagar MC Group C Bharti Exam Pattern and Syllabus 2026

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका गट-क भरती परीक्षा पद्धती (Exam Pattern)

जाहिरातीत नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक पदासाठी स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाची असेल.

परीक्षेतील विषय पुढीलप्रमाणे असतील:

  • मराठी
  • इंग्रजी
  • सामान्य ज्ञान
  • अंकगणित / बुद्धिमत्ता चाचणी
  • संबंधित पदाचे विषयज्ञान

परीक्षेचा दर्जा हा त्या पदासाठी निश्चित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार राहील. प्रश्नपत्रिका संबंधित पदाच्या कामाच्या स्वरूपाशी व आवश्यक तांत्रिक ज्ञानाशी निगडीत असेल.

अग्निशमन सेवेतील सर्व पदांकरीता ऑनलाईन परीक्षेकरीता १०० गुण व मैदानी क्षमता चाचणी परीक्षेकरीता १०० गुण अशी एकूण २०० गुणांची परीक्षा असेल. इतर सर्व पदांकरीता २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा असेल,

Groupwise Time Setter बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्रत्येक विषयामधील सोपे, मध्यम व कठीण प्रश्न, गटामध्ये अंतर्भूत करून त्यानुसार प्रत्येक गटासाठी वेळ निश्चित करून त्याप्रमाणे परीक्षेमध्ये “गुप लेवल टायमरची” अंमलबजावणी करण्यात येईल.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका गट-क भरती गुण व कालावधी

संवर्गलेखी परीक्षा गुणकालावधीशारीरिक/मैदानी चाचणी
सर्वसाधारण पदे200 गुण2 तासलागू नाही
उपअग्निशमन केंद्र अधिकारी100 गुण1 तास100 गुण
चालक यंत्रचालक100 गुण1 तास100 गुण
अग्निशामक100 गुण1 तास100 गुण

 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका गट-क भरती अभ्यासक्रम

विषयअभ्यासक्रमातील घटक
मराठीव्याकरण, शब्दसंग्रह, समानार्थी/विरुद्धार्थी शब्द, वाक्यरचना, उतारा वाचन
इंग्रजीGrammar, Vocabulary, Sentence Structure, Comprehension
सामान्य ज्ञानइतिहास, भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी, नागरी प्रशासन
अंकगणितटक्केवारी, प्रमाण, सरासरी, नफा-तोटा, वेळ व काम, साधे व चक्रवाढ व्याज
बुद्धिमत्ता चाचणीतर्कशक्ती, संख्या मालिका, कोडी, विश्लेषणात्मक प्रश्न
विषयज्ञान
  1. स्थापत्य पदांसाठी – बांधकाम तंत्रज्ञान, मोजमाप, आराखडे, साहित्य
  2. रोखपाल – लेखाशास्त्र, बुक-कीपिंग, आर्थिक व्यवहार
  3. उद्यान सहायक – बागकाम, रोप व्यवस्थापन, खत व्यवस्थापन
  4. स्वच्छता निरीक्षक – सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता नियम
  5. अग्निशमन पदे – अग्निसुरक्षा नियम, आपत्कालीन व्यवस्थापन, उपकरणे वापर

Important Notice:

✔ ऑनलाईन परीक्षा ही पदाच्या शैक्षणिक पात्रता, तांत्रिक ज्ञान व प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपाशी संबंधित असेल.
✔ अंतिम गुणवत्ता यादी लेखी परीक्षा व (लागू असल्यास) शारीरिक चाचणीच्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल.
✔ उमेदवारांनी संबंधित पदानुसार अभ्यासाची योग्य रणनीती आखणे आवश्यक आहे.

Chh Sambhajinagar Agnishamak Physical Criteria 

इ) शारीरिक पात्रता :
1) उंची 165 सें.मी. (महिला उमेदवारांची उंची 157 सें.मी.).
2) छाती साधारण 81 सें.मी. फुगवून 86 सें. मी. जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही.).
3) वजन 50 कि.ग्रॅ. (महिला उमेदवारांचे वजन किमान 46 कि.ग्रॅ.).
4) दृष्टी – चांगली. (विना चष्म्याने दृष्टी – 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली). फ) वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त असू नये. (शासन नियमानुसार जोखीमभत्ता व युनिफॉर्म अपकीप)

३० दिवसांचे अभ्यास नियोजन (Chh Sambhajinagar MC Group C Exam Study Plan)

🔹 पहिला टप्पा (दिवस १ ते १०) – मूलभूत तयारी

  • मराठी व इंग्रजी व्याकरणाची पुनरावृत्ती
  • अंकगणितातील मूलभूत घटक (टक्केवारी, प्रमाण, सरासरी)
  • दररोज १ तास सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  • संबंधित पदाच्या विषयज्ञानाचा बेसिक अभ्यास

🔹 दुसरा टप्पा (दिवस ११ ते २०) – सखोल अभ्यास

  • दररोज १ पूर्ण विषयाचा सखोल अभ्यास
  • बुद्धिमत्ता चाचणी प्रश्नांचा सराव (२५–३० प्रश्न रोज)
  • विषयज्ञानावर आधारित नोट्स तयार करणे
  • आठवड्यातून २ मिनी मॉक टेस्ट

🔹 तिसरा टप्पा (दिवस २१ ते ३०) – सराव व पुनरावृत्ती

  • दर २ दिवसांनी पूर्ण मॉक टेस्ट (200 गुण / लागू असल्यास 100 गुण)
  • चुकीच्या प्रश्नांचे विश्लेषण
  • शॉर्ट नोट्सची जलद पुनरावृत्ती
  • अग्निशमन संवर्गासाठी – दररोज शारीरिक सराव

📝 MCQ सराव प्रश्नसंच (chh Sambhajinagar MC Group C Sample Practice Questions)

🔹 मराठी

‘परिश्रम’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
A) आळस
B) कष्ट
C) विश्रांती
D) आराम
उत्तर: B) कष्ट

🔹 इंग्रजी

Choose the correct synonym of “Rapid”
A) Slow
B) Fast
C) Late
D) Calm
उत्तर: B) Fast

🔹 सामान्य ज्ञान

भारतीय राज्यघटनेचा अवलंब केव्हा करण्यात आला?
A) १५ ऑगस्ट १९४७
B) २६ जानेवारी १९५०
C) २६ नोव्हेंबर १९४९
D) १ मे १९६०
उत्तर: B) २६ जानेवारी १९५०

🔹 अंकगणित

५० चा २०% किती?
A) ५
B) १०
C) १५
D) २०
उत्तर: B) १०

🔹 बुद्धिमत्ता चाचणी

२, ६, १२, २०, ?
A) ३०
B) २५
C) २८
D) ३२
उत्तर: A) ३०

🔹 विषयज्ञान (उदा. स्थापत्य)

काँक्रीटमध्ये सिमेंट, वाळू व खडी यांचे प्रमाण १:२:४ असल्यास ते कोणत्या प्रकारचे मिश्रण आहे?
A) M10
B) M15
C) M20
D) Nominal Mix
उत्तर: D) Nominal Mix

Leave a Comment

Table of Contents