List Of Documents Required For WRD Bharti 2026
List Of Documents Required For WRD Bharti : Water Resources Department Maharashtra (WRD) भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे योग्य स्वरूपात अपलोड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्रे अपलोड केल्यास अर्ज बाद होण्याची शक्यता असते. त्यामुळे खाली दिलेली कागदपत्रांची यादी काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवा. चार खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाच्या दाव्यांच्या अनुषंगाने मध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे. प्रमाणपत्रे / कागदपत्रे संलग्न (Upload) केल्याशिवाय अर्ज स्विकृत केला जाणार नाही. WRD भरतीसाठी अर्ज करताना योग्य कागदपत्रांची तयारी करणे हे यशस्वी अर्जासाठी पहिले पाऊल आहे. वर दिलेली यादी लक्षात घेऊन सर्व कागदपत्रे वेळेत तयार ठेवा आणि अर्ज प्रक्रिया काळजीपूर्वक पूर्ण करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..
WRD भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
WRD अर्ज प्रक्रियेदरम्यान खालील प्रमाणपत्रे/कागदपत्रे आवश्यक असतात:
ओळख पुरावा (Identity Proof)
– आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र
वयाचा पुरावा (Age Proof)
– जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला
शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
– मार्कशीट व प्रमाणपत्रे (10वी, 12वी, पदवी इ.)
राहिवासी दाखला (Domicile Certificate)
जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
– मागासवर्गीय उमेदवारांसाठी आवश्यक
नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
– OBC / VJNT / SBC प्रवर्गासाठी लागू
EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
दिव्यांग प्रमाणपत्र (PwD Certificate)
– अपंग उमेदवारांसाठी
माजी सैनिक प्रमाणपत्र (Ex-Serviceman Certificate)
अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
– लागू असल्यास
खेळाडू प्रमाणपत्र (Sports Certificate)
– क्रीडा आरक्षणासाठी
- मराठी भाषा ज्ञान प्रमाणपत्र
- लहान कुटुंबाचा दाखला (Small Family Declaration)
- स्वाक्षरी व पासपोर्ट साइज फोटो
List Of Documents Required For WRD Bharti
Check the complete list of documents required for WRD Bharti 2026 in Maharashtra. जानून घ्या आवश्यक कागदपत्रे, eligibility proof, certificates, and document upload guidelines for Water Resources Department recruitment.
WRD Bharti documents list, WRD recruitment documents 2026, Maharashtra WRD Bharti required documents, Water Resources Department Bharti documents, WRD eligibility documents, government job documents list Maharashtra

कागदपत्र अपलोड करताना लक्षात ठेवण्याच्या सूचना
- सर्व कागदपत्रे PDF format मध्ये अपलोड करावीत
- कागदपत्रे स्पष्ट व वाचनीय असावीत
- दिलेल्या size limit मध्येच फाइल अपलोड करावी
- चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो
- अंतिम तारखेपूर्वी सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
Importanat Documents List For Jalsampada Vibhag Bharti 2026
उमेदवाराने स्वहस्ताक्षरात सदर प्रमाणपत्रांबाबतची तपसाणी सूची भरावयाची आहे. प्रत्येक बाबीची माहिती अचूकपणे नमूद करावी, लागू असलेल्या रकान्यात (होय / नाही / लागु नाही) असे स्पष्टपणे शब्दात लिहावे. तपासणीसाठी उमेदवाराने लागु कागदपत्रांची मूळ प्रत व २ साक्षांकित सत्य प्रती सोबत आणणे अनिवार्य आहे.
१ ओळखपत्र (कोणतेही एक)
१. मूळ पॅन कार्ड २. मूळ पासपोर्ट ३. मूळ वाहन अनुज्ञप्ती / परवाना ४. मूळ फोटोसह राष्ट्रीयीकृत बँक अद्ययावत पासबुक ५. मूळ आधार कार्ड
२. जाहिरातीच्या दिनांकास वय (वर्ष-महिने-दिवस) नमूद करावे जन्मतारखेचा पुरावा (कोणतेही एक)
१. शालांत परीक्षेचे (१० वी) प्रमाणपत्र २. अधिवास प्रमाणपत्र ३. शाळा सोडल्याचा दाखला ४. जन्मनोंद दाखला
३ जात प्रमाणपत्र व अन्य तपशील
१. वर्गवारीच्या दाव्यानुसार जातीचे प्रमाणपत्र २. वर्गवारीनुसार उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे सक्षम प्राधिका-यांनी दिलेले प्रमाणपत्र (NCL प्रमाणपत्र) NCL वैधता कालावधी नमुद करावा. ३. जात पडताळणी प्रमाणपत्र (असल्यास) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांनी शासन निर्णय दिनांक ३१ मे २०२१ नुसारचे प्रमाणपत्र महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल प्रमाणपत्र)
४ आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील उमेदवारांनी शासन निर्णय दिनांक ३१ मे २०२१ नुसारचे प्रमाणपत्र
५ महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल प्रमाणपत्र)
६ खेळाडू आरक्षण
१. खेळाडूबाबतची प्रमाणपत्रे संबंधित उप संचालक, क्रीडा व युवक सेवा यांनी प्रमाणित केलेला क्रीडा प्रमाणपत्र पात्रतेबाबतचा पडताळणी अहवाल. (पडताळणी अहवालाचा दिनांक नमूद असणे अनिवार्य आहे.) अथवा २. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास म्हणजेच दिनांक २४/११/२०२३ रोजीची किवा तत्पूर्वीची विभागीय क्रिडा उप संचालकाकडे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केलेल्या अर्जाची पोच पावती (पोच पावतीचा दिनांक नमूद असणे अनिवार्य आहे.)
७ दिव्यांग आरक्षण-अपंग (विकलांग) आरक्षण
२०१९ शासन निर्णयामधील आदेशानुसार १. दिव्यांगत्व प्रमाणपत्र (शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र. अप्रकि २०१८/प्र.क्र ४६/ आरोग्य-६ दि.१४.०९.२०१८ नुसार संगणकिय प्रणालीव्दारे वितरीत प्रमाणपत्र) २. दिनांक १८/०२/२०२१ चे शासन निर्णयानुसार उमेदवाराचा दिव्यांग प्रवर्ग नमूद करावा. a) D. HH b) OA, BA, OL, LC, DW, AAV c) ASD(M), SLD, MI d) MD Involving (a) to (c) above
८ अनाथ आरक्षण :-
महिला व बालविकास विभाग यांचे शासन निर्णय दिनांक ०६.०४.२०२३ नुसार महिला व बालविकास विभागाकडून देण्यात येणारे अनाथ प्रमाणपत्र १. संस्थात्मक प्रमाणपत्र २. संस्थाबाहय प्रमाणपत्र
९ माजी सैनिक आरक्षणः-
१. सैनिकी सेवेतुन मुक्त केल्याबाबतचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र २. सैन्य सेवेत असताना अपंगत्व आले असल्यास तसे विहित प्रमाणपत्र ३. माजी सैनिक पाल्य असल्यास अ. युध्द काळात किंवा युध्द नसताना सैनिक सेवेत असताना मृत्यु झालेबाबत प्रमाणपत्र ब. युध्द काळात किंवा युध्दजन्य परीस्थितीतील अंपगत्व आलेल्या माजी सैनिकांनी नियुक्तीसाठी दिलेल्या लेखी संमतीपत्राची प्रत.
१० प्रकल्पग्रस्त आरक्षण
प्रकल्पग्रस्त असलेबाबतचे विहीत प्रमाणपत्र
११ भुकंपग्रस्त आरक्षण-
भुकंपग्रस्त असलेबाबतचे विहीत प्रमाणपत्र
१२ अंशकालीन उमेदवार आरक्षण-
अंशकालीन उमेदवार असलेबाबतचे विहित प्रमाणपत्र
१३ मराठी भाषेचे ज्ञानाबाबत प्रमाणपत्र (कोणतेही एक)
१. माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र २. उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र ३. संबंधीत महाविद्यालयाच्या किंवा पदव्युत्तर (संस्थेतील प्राध्यापकाने दिलेले भाषेचे प्रमाणपत्र किंवा प्राचार्यानी दिलेले प्रमाणपत्र.
१४ शासकीय/निमशासकीय कर्मचारी असल्यास कार्यालय प्रमुखाच्या परवानगीची प्रत
१५ शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे
१. माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र (S.S.C.) २. उच्च माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र (H.S.C.) ३. पदवी प्रमाणपत्र (Degree) ४. भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र/ भुगर्भ शास्त्र पदव्युत्तर पदवी किंवा कृषी (मृद शास्त्र / कृषी रसायन शास्त्र) पदव्युत्तर पदवी (किमान ६०% गुणांसह) प्रमाणपत्र ५. अन्य शैक्षणिक तपशील असल्यास त्याबाबतची प्रमाणपत्रके
१६ इतर कागदपत्रे (उमेदवाराने सादर केल्यास त्याचा तपशील)
१७ आत्महत्याग्रस्त शेतक-याचा पाल्य असल्यास संबंधित जिल्हास्तरीय समितीने त्यास “कुटुंबातील मृत शेतक- याचा पाल्य” म्हणून पात्र ठरविल्याचे प्रमाणपत्र
१८ विवाहीत उमेदवाराने लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम २००५ अन्वये सादर करणे अनिवार्य आहे