Maharashtra Police Bharti 2025 Starting Date – Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis’ cabinet had decided to recruit 15631 police posts in its meeting on August 12 under Maharashtra Police Bharti 2025. As per that decision, the Home Department has decided to recruit police constables in 15631 posts. A government decision has been issued approving the recruitment process to fill the vacant posts in the Maharashtra Police Constable and Prison Constable cadre in the Maharashtra Police Force. The Starting Date of Maharashtra Police Bharti will be resed soon. As per the News Source its expected to begin soon in October 2025. The Government Decision (GR) approving the recruitment process in the Police Constable and Prison Constable cadre has been published today, dt. 20 August 2025. This has come as a big relief to lakhs of youth preparing for Maharashtra police recruitment, and this recruitment process will start soon.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळानं 12 ऑगस्टच्या बैठकीत 15631 पदांची पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार गृह विभागानं 15631 जागांवर पोलीस शिपाई भरती करण्याचा निर्णय घेतण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणा-या भरती प्रक्रियेस मान्यता देणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई संवर्गातील भरती प्रक्रियेला मान्यता देणारा शासन निर्णय (जीआर) आज, दि. 20 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो तरुण-तरुणींना मोठा दिलासा मिळाला असून, लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. प्राप्त माहिती नुसार सप्टेंबर शेवटचा आठवड्यात किंवा ऑक्टोबर मध्ये हि भरती सुरु होणे अपेक्षित आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने 12 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या बैठकीत 15,631 पदांसाठी भरतीला मंजुरी दिली होती. त्यानुसार, गृह विभागाने पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बॅण्डस्मन, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई या संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. हा शासन निर्णय क्रमांक: पोलीस-1125/प्र.क.173/पोल-5अ, दिनांक 20 ऑगस्ट 2025 अन्वये जारी करण्यात आला आहे.
- पोलीस शिपाई: 12,399 पदे
- पोलीस शिपाई चालक: 234 पदे
- बॅण्डस्मन: 25 पदे
- सशस्त्र पोलीस शिपाई: 2,393 पदे
- कारागृह शिपाई: 580 पदे
एकूण: 15,631 पदे
भरती प्रक्रियेची वैशिष्ट्ये – विशेष सवलत: सामान्य प्रशासन विभागाच्या 4 मे 2022 आणि 21 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयातील तरतुदींना शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे ही भरती प्रक्रिया घटकस्तरावर राबवली जाणार आहे.
लेखी परीक्षा: भरतीसाठी OMR आधारीत लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
वयोमर्यादेत सवलत: 2022 आणि 2023 मध्ये विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.
- परीक्षा शुल्क: खुला प्रवर्ग: ₹450/-
- मागास प्रवर्ग: ₹350/-
परीक्षा शुल्कातून जमा होणारी रक्कम भरती प्रक्रियेच्या खर्चासाठी वापरली जाईल.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी दिलासा –
महाराष्ट्रात लाखो तरुण-तरुणी पोलीस आणि कारागृह विभागात नोकरी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेत असतात. गेल्या काही वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया आता गती घेणार असल्याने उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शासन निर्णयामुळे भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या काही दिवसांत अर्ज प्रक्रिया, परीक्षा तारखा आणि इतर तपशील जाहीर होण्याची शक्यता आहे.
पुढील प्रक्रिया –
गृह विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात भरती प्रक्रियेच्या अंमलबजावणीसंदर्भात स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत पोलीस मुख्यालयाकडून भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू होईल. उमेदवारांना शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणीसह इतर टप्प्यांमधून जावे लागेल.
उमेदवारांना आवाहन –
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आता अधिक जोमाने अभ्यास आणि शारीरिक तयारीवर लक्ष केंद्रित करावे. अधिकृत जाहिरात आणि तपशीलांसाठी महाराष्ट्र पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि गृह विभागाच्या पोर्टलवर लक्ष ठेवावे. तसेच, परीक्षा शुल्क आणि अर्ज प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
bakru ram kashyap gram malevahi gram. pnchyt around jila bastard
tsil lohndiguda