Police Patil Bharti 2026 Online Application Forms – Police Patil Bharti 2026 Application Form process is started for the 343 vacancies. its really great opportunity to get a Sarkari Naukari of police Patil in Maharashtra. A significant increase in the honorarium of Police Patils (village police officers) was decided in the state cabinet meeting held today. Chief Minister Eknath Shinde presided over the meeting. Police Patils will now receive Rs. 15,000 per month. In the district, there are a total of 647 sanctioned posts for Police Patils, of which 304 are currently filled. The recruitment process has begun for the remaining 343 vacant posts under Police Patil Bharti 2026. The administration has taken precautions to ensure that no irregularities occur during this recruitment process. Therefore, the recruitment process will be conducted transparently, District Collector Rahul Gupta informed.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..! म्हणजे सर्व महत्वाचे अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील..
पोलीस पाटील भरती हि नोकरीची एक मोठी संधीत आहे. त्यातच आता पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आता पोलीस पाटलांना महिन्याला १५ हजार रुपये मिळतील. जिल्ह्यात पोलिस पाटलांची एकूण मंजुर पदे ६४७ मंजुर पदे असून त्यातील कार्यरत पदे ३०४ आहेत. रिक्त असलेल्या ३४३ पंदाकरीता भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार घढणार नाही या दृष्टीने प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. त्यामुळे हि भरती प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पडली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहूल गुप्ता यांनी दिली आहे. ग्रामीण भागामध्ये पोलिस पाटील (Police Patil Recruitment) हा महत्वाचा कणा आहे. गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास पोलिस पाटलांचा मोठा हातभार लाभत असतो. हिंगोली जिल्ह्यात पोलिस पाटलांची ६४७ पदे मंजुर असून कार्यरत पदे ३०४ आहेत. रिक्त असलेल्या ३४३ पंदाकरीता भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहूल गुप्ता यांनी शुक्रवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. चला तर या भरती बद्दल पूर्ण माहिती अर्ज प्रक्रिया समजून घेऊया. तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक आम्ही खाली दिली आहे. अजून एक मित्रांनो, पोलीस भरतीची लेखी परीक्षा लवकरच फेब्रुवारी मध्ये होणार, त्या अनुषंगाने आम्ही या लिंक वर अपेक्षित प्रश्नसंच देत आहोत, या लिंकवर नवीन पेपर्स नियमित प्रकाशित होत असतात, तेव्हा लगेच सोडवून पहा.

- पदाचे नाव – पोलीस पाटील
- पद संख्या – ३४३ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 25 ते 45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा
यामध्ये जिल्ह्यात तालुकानिहाय हिंगोली ७६, सेनगाव ६५, कळमनुरी ८९, वसमत ५७ व औंढा नागनाथ तालुक्यात ५६ अशी एकूण ३४३ पदे रिक्त आहेत. १ ते ५ जानेवारी दरम्यान रिक्त पंदासाठी जाहिर नोटीस प्रसिध्द करून गावनिहाय आरक्षण निश्चित केले जाणार. ६ ते ७ जानेवारी दरम्यान आरक्षणावर आक्षेप मागविले जाणार. ८ ते १० जानेवारीला जाहिरात प्रसिध्द केली जाणार . १२ ते २६ जानेवारी दरम्यान इच्छुकांचे अर्ज मागविण्यात येणार. २७ ते ३० जानेवारी दरम्यान अर्जाची छाननी करून अर्जदारांना प्रवेश पत्र वाटप केले जाणार आहे.
Police Patil Bharti 2026 Exam Details
८ फेब्रुवारीला लेखी परीक्षा घेण्यात येणार. १० फेब्रुवारीला लेखी परीक्षेचा निकाल जाहिर केला. ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान पात्र उमेदवारांची तोंडी परीक्षा (मुलाखती घेणे व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे), १३ फेब्रुवारीला पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले जाणार. हि भरती प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पडली जाणार असून इच्छुकांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहन जिल्हाधिकरी राहूल गुप्ता यांनी केले आहे.
सध्या पोलीस पाटलांना ६५०० रुपये मिळतात. पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदा-यांमध्ये वाढ झाली असून त्यांना सध्या देण्यात येणारे मानधन कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला. सध्या पोलीस पाटलांची ३८ हजार ७२५ पदे असून मानधनात वाढ केल्यास ३९४ कोटी ९९ लाख रुपये वार्षिक खर्च वाढेल. या खर्चासही मान्यता देण्यात आली.
वसमत उपविभागात वसमत व औंढा तालुक्यातील पोलिस पाटलांची एकूण २४५ मंजुर पदे आहेत. त्यापैकी ११३ रिक्त पदे आहेत. या रिक्त पदांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या उपस्थितीत सुरमणी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृहात गावनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी विविध गावांमधील पोलिस पाटील पदासाठी इच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनुसूचित जातींसाठी कौडगाव, किनोळा, लांडाळा, अंजनवाडी, खांबाळा, जवळा खुर्द, हिवराजाटू, कोणाथा, लोहरा बुद्रुक, सुकळी, उंडेगाव, करंजी, कंजारा लिंगी ही गावे राखीव आहेत. अनुसूचित जाती महिलांसाठी हयातनगर, गणेशपुर शिंगी, रेऊलगाव, बळेगाव, गोजेगाव ही गावे राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी गवळेवाडी, सारंगवाडी, रामेश्वर, नंदगाव, मुर्तीजापुर सावंगी ही गावे राखीव आहेत.
अनुसूचित जमाती महिला यांच्यासाठी भोसी पिंपरी, वि मा प्रवर्गासाठी आंबा शेंदूरसना, चिंचोली ही गावे, विमा महिला प्रवर्गासाठी भोरीपगाव, भटक्या जमाती ब प्रवर्गासाठी सुकापुर गांगलवाडी अंजनवाडातांडा, भटक्या जमाती ब महिला प्रवर्गासाठी वगरवाडी, भटक्या जमाती क प्रवर्गासाठी औंढा, मोहगाव तुर्क पिंपरी कानोसा, भटक्या जमाती क महिला प्रवर्गासाठी लाख, सावरखेडा, ड प्रवर्गासाठी कामठा, भटक्या जमाती ड महिला प्रवर्गासाठी भगवा ही गावे राखीव आहेत. शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी (शै मा व प्रवर्ग) सातेगाव, परजना, ब्राह्मणगाव खुर्द, औंढा फाटा, धामणगाव, बगडद, पुयनी बुद्रुक, याच प्रवर्गातील महिलांसाठी शहापूर परळी ही गावे राखीव आहेत.
वगरवाडीतांडा, वर्ताळा, धार, पळसगाव तर्फे धामणगाव जलालपूर, सुरवाडी, जलालधाबा, वसई, पिंपरी,कुंडकर,कवठा, जांबराजा, रांजोणा, धानोरा काठोडा, खुला प्रवर्ग महिलांसाठी टेंभुरदरा, हिवराखुर्द, मालेगाव, सिद्धेश्वर, दूरचुना, सावळीतांडा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रवर्गासाठी तामठी तांडा, मेथा, अजरसोंडा, मुडी, ढेगज, पुर, महाळसगाव रोडगा, याच प्रवर्गातील महिलांसाठी बाभुळगाव पारडीखुर्द अकोली, असे गावांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
पोलिस पाटील पदासाठी इतर मागास प्रवर्गासाठी खाजमापूर, भेंडेगाव, डोनवाडा, आसेगाव, दिग्रस खुर्द, कागबन, वापटी, धामणगाव, आरळ, पोटा खुर्द, शिरळी, महागाव, माटेगाव, आरळ, तपोवन, बोरीसावंत, पळशी, इतर मागास प्रवर्ग महिलांसाठी बोरगाव खुर्द, महमदपुरवाडी, हयातनगर, खांडेगाव वाई, आडगाव, पिंपळा, कोंडशी बुद्रुक ही गावे राखीव आहेत.
How To Apply For Ratnagiri Police Patil Jobs 2026
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
