Pavitra Portal Change the process for ninth to twelve class

Pavitra Portal Change the process for ninth to twelve class

‘पवित्र’वर नववी ते बारावीसाठी दुरुस्ती प्रक्रिया

Teachers Recruitment Process : Recruitment process has been made available to the students who have been thrown out of the priority process on the Pavitra Portal, having received less than 50% marks in the postgraduate and postgraduate education programs. Candidates from Class IX to XII can be repaired for their postgraduate degree.

शिक्षक भरती प्रक्रियेत प्राधान्यक्रम भरताना पदवी, पदव्युत्तर शिक्षणात ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाल्याने पवित्र पोर्टलवरील प्राधान्यक्रमाच्या प्रक्रियेतून दूर फेकल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना दुरुस्तीची प्रक्रिया पुन्हा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नववी ते बारावी गटातील उमेदवारांना आपल्या पदव्युत्तर पदवी विषयाची दुरुस्ती करता येईल.

शिक्षक भरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे केली जात आहे. त्यात खासगी शाळातील इयत्ता नववी ते बारावी गटातील खुला प्रवर्ग उमेदवारांना ५० टक्के व मागासवर्गीय उमेदवारांना ४५ टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम देण्यात आलेले नाहीत. यापेक्षा अधिक गुण पदवी, पदव्युत्तरला असतील तर प्राधान्यक्रम भरता येणार अशी अट होती. त्यावरून ५०पेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर शिक्षण विभागाने दुरुस्ती प्रक्रिया सुरू केली आहे. शिक्षण विभागाने म्हटले आहे की, खासगी शाळातील नववी ते दहावी या गटातील खुला प्रवर्ग उमेदवारांना ५० टक्के व मागासवर्गीय उमेदवारांना ४५ टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम दिलेले नाहीत. त्यातील उत्तीर्ण श्रेणी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहेत. नववी ते दहावी या गटातील उमेदवारांकडून त्यांच्या पदवी स्तरावरील श्रेणीची माहिती घेण्यात येणार नाही. अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यात येतील. त्यांनी दिलेले प्राधान्यक्रम दिलेल्या मुदतीत पूर्ण करावे. खासगी शाळातील इयत्ता अकरावी ते बारावी या गटातील खुला प्रवर्ग उमेदवारांना ५० टक्के व मागासवर्गीय उमेदवारांना ४५ टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम दिलेले नाहीत. ते पदव्युत्तर पदवीच्या विषयातील किमान द्वितीय श्रेणी उत्तीर्ण असल्यास विचारलेल्या माहिती समोर ‘एस’ म्हणावे. योग्य माहिती नमूद करून सेव्ह करावी आणि सेव्ह केलेली माहिती आपल्या प्रोफाइलमध्ये योग्य आहे की नाही तपासून पहावी. यासह उमेदवारांच्या श्रेणीची माहिती केवळ पदव्युत्तर पदवीमध्ये पूर्वीच्या निकषांपेक्षा कमी गुण असणाऱ्या उमेद्वारांकडूनच मागविण्यात येत आहे.

सौर्स : मटा

Leave a Comment