Beware of fraud by the recruitment in Mahadiscom

Beware of fraud by the recruitment in Mahadiscom

नोकर भरतीच्या आमिषाने फसवणुकीची शक्यता

Mahadiscom Recruitment 2020 : The Mahavitaran (Mahadiscom) has appealed to the candidates to be cautious as the type of financial demand has come up in some places by the temptation of hiring a corporation. It has also been stated that ‘Mahavitaran’ does not charge any fees for recruitment and verification and training during recruitment process. In MahaVitaran, the selection process for recruitment of employees is transparent. Information about each phase of recruitment is made available on the website of ‘Mahavitaran’ www.mahadiscom.in.

Mahadiscom Recruitment 2020

महावितरण कंपनीमध्ये नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवून आर्थिक मागणी करण्याचे प्रकार काही ठिकाणी घडले असल्याने उमेदवारांनी सावध राहण्याचे आवाहन ‘महावितरण’च्या वतीने करण्यात आले आहे. ‘महावितरण’कडून भरती प्रक्रियेदरम्यान तसेच निवडपत्र किंवा रुजू होण्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही, असेही स्पष्ट केले गेले आहे.

महावितरण किंवा एमएसईबीचा नामोल्लेख करून निवड पत्र पाठविण्याचे प्रलोभन दाखवत पैसे उकळणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन करताना महावितरणने यासंदर्भात राज्यभर जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. सोलापूर परिसरातील काही जणांशी मोबाइलद्वारे संपर्क साधून त्यांना असे प्रलोभन दिले जात असल्याचे आढळले आहे. ‘महावितरण’मध्ये अस्तित्वात नसलेल्या पदांसाठीही निवड करण्याचे प्रलोभन दाखवून फसवणुकीचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई येथून संपर्क करीत असल्याचे उमेदवारांना सांगितले जाते आणि निवड पत्र पाठविण्याचे प्रलोभन दाखवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रयत्न होत आहेत, असे महावितरणचे म्हणणे आहे. प्रलोभन दाखवल्या जाणाऱ्या पदांपैकी काही पदे महावितरणमध्ये अस्तित्वातच नाहीत; मात्र, अशाही पदांसाठी निवड पत्राचे प्रलोभन दाखविण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. पण, महावितरणकडून संपूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान तसेच निवड पत्र किंवा रुजू होण्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संकेतस्थळावर माहिती उपलब्ध

‘महावितरण’मध्ये नोकर भरतीची निवड प्रक्रिया पारदर्शीपणे होते. भरतीच्या प्रत्येक टप्प्याची माहिती ‘महावितरण’च्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येते. याशिवाय नोकर भरतीची जाहिरात, पदसंख्या, आरक्षित पदे, लेखी परीक्षेचा संभाव्य दिनांक, लेखी परीक्षेसाठी पात्र-अपात्र उमेदवारांची यादी, परीक्षेत उत्तीर्ण व मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी, मुलाखतीची तारीख तसेच निवड झालेल्या उमेदवारांची यादी आदींची सर्व माहिती संकेतस्थळावर टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जाते. संबंधित उमेदवारांनी नोंदणी केलेल्या त्यांच्या ई-मेलवर व मोबाइलवरही भरती प्रक्रियेबाबतची माहिती दिली जाते. निवड झालेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येते व संबंधित उमेदवारांना ई-मेलद्वारे व लेखी पत्राद्वारेही कळविले जाते, असेही स्पष्ट केले गेले आहे. महावितरण किंवा एमएसईबीचा नामोल्लेख करून भरती प्रक्रियेबाबत प्रलोभन दाखवून आर्थिक मागणी करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सौर्स : म. टा.

Leave a Comment