HDFC Bank Recruitment 2021

HDFC Bank Recruitment 2021

HDFC Bank Recruitment 2021: HDFC announced the important decision after Union Finance Minister Nirmala Sitharaman expressed displeasure over the bank’s expansion. Accordingly, HDFC will expand its network in rural areas, which will provide employment to more than 2,500 people.

HDFC Bank Bharti 2021- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बॅंकाच्या विस्ताराबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर एचडीएफसीने महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला. यानुसार एचडीएफसी आपले जाळे ग्रामीण भागात विस्तारणार असून यामुळे २५०० हून अधिक जणांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

HDFC Bank Recruitment 2021: खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कर्ज देणारी एचडीएफसी बँकेने राज्यातील बेरोजगरांसाठी आनंदाची बातमी जाहीर केली आहे. एचडीएफसी बॅंक शहरातून आता ग्रामीण भागात आपली पोहोच दुप्पट करत आहे. येत्या काही दिवसात एचडीएफसी दोन लाख गावांपर्यंत पोहोचणार आहे. यासाठी बँकेतर्फे पुढील सहा महिन्यांत २ हजार ५०० लोकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढील १८ ते २४ महिन्यांत शाखा नेटवर्क, व्यवसाय प्रतिनिधी, सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर), भागीदार, व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि डिजिटल आउटरीच प्लॅटफॉर्मद्वारे ग्रामीण भागात आपला सहभाग दुप्पट करण्याचे उद्दिष्ट असल्याचे बँकेने म्हटले आहे. तत्पूर्वी रविवारीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांच्या सुलभतेबद्दल नाराजी व्यक्त केली आणि त्यांना त्यांची उपस्थिती आणखी वाढवण्यास सांगितले. त्यानंतर एचडीएफसीने हे पाऊल उचलण्याचा निर्णय जाहीर केला.

एचडीएफसी बँकेचे ग्रुप हेड (कमर्शियल अँड रूरल बँकिंग) राहुल शुक्ला यांनी यासंदर्भात माहिती दिली. ‘भारतातील ग्रामीण आणि निमशहरी बाजारपेठांमध्ये बँकेटा विस्तार कमी आहे. भारतीय बँकिंग व्यवस्थेसाठी दीर्घकालीन वाढीच्या संधी याद्वारे निर्माण केल्या जातील’ असे ते म्हणाले. पुढे जाऊन देशातील प्रत्येक पिनकोडमध्ये सेवा उपलब्ध करणे हे बॅंकेचे उद्दीष्ट असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Comment