Jobs Career Opportunity in Digital Edge

Jobs Career Opportunity in Digital Edge

‘हे’ डिजीटल एज जॉब्स देतील भरघोस पगार

Jobs Opportunity : India currently has a wealth of jobs because of the transnational job sector down. In this case, if you do not do any extra vocational course, then your problem is even more aggravating. But the big question is whether to do the course. All the Institutions in the market are making big claims stating how good our course is. Of course, many of them are deceitful. There is a lot of competition in the transitional job sector. So you can try out some handy jobs too. These jobs can be called digital edge jobs. You have to do some short term courses for this. If you take these courses for a few months, you can get a salary of Rs. 25000 to 40000/- per month.

Jobs Opportunity in Digital Edge

भारतात सध्या ट्रॅडिशनल जॉब सेक्टर डाऊन असल्याने नोकऱ्यांची वानवा आहे. अशात जर तुम्ही कुठला एक्स्ट्रा व्होकेशनल कोर्स केला नसेल तर तुमच्या समस्यांमध्ये आणखी भर पडते. पण कोर्स तरी कुठला करायचा हा मोठा प्रश्न असतो. मार्केटमध्ये सगळ्याच इन्स्टिट्यूशन आमचाच कोर्स कसा चांगला हे सांगत मोठे दावे करत असतात. अर्थात त्यापैकी बरेचसे फसवे असतात. ट्रॅडिशनल जॉब सेक्टरमध्ये खूप स्पर्धा आहे. म्हणून तुम्ही काही हटके जॉबदेखील ट्राय करू शकता. या जॉब्सना डिजीटल एज जॉब म्हटलं जाऊ शकतं. यासाठी तुम्हाला काही शॉर्ट टर्म कोर्सेस करावे लागतात. काही महिन्यांचे हे कोर्सेस केले तर तुम्हाला २५ हजार ते ४० हजार रुपये पगाराची नोकरी नक्की मिळू शकते…

​डिजीटल एज जॉब, भरपूर पगार!

डिजीटल एज जॉब म्हणजे काळानुसार अद्ययावत तंत्रज्ञानामुळे कामाच्या क्षेत्रांमध्ये जे बदल झाले आहेत, त्यातील जॉब. हे जॉब म्हणजे डिजीटल मार्केटिंगपासून डिजीटल इकॉनॉमीच्या क्षेत्रातले वेगवेगळ्या प्रकारचे जॉब. हे असे जॉब आहेत ज्यांच्यासाठी पदवीनंतर एखादा विशिष्ट कोर्स केला की तुम्ही अशा नोकऱ्यांसाठी पात्र ठरू शकता. इंटरनेट वरील सर्फिंग काळानुसार वाढलं आहे. टेलिकॉम कंपन्यांच्या स्पर्धांमुळे सामान्य माणसाच्या हातातही नेट पोहोचलं आहे आणि त्याला त्याची सवय लागली आहे. याअनुषंगाने इंटरनेटवरील गरजा ओळखून या जॉबसाठी मनुष्यबळाला मागणी आहे. पाहूयात कोणते आहेत हे जॉब…

पीपीसी
पीपीसी म्हणजे ‘पे पर क्लिक’. डिजीटल मार्केटिंगमध्ये एसईओप्रमाणे पे पर क्लिकला देखील खूप मागणी आहे. पीपीसीचं काम करणाऱ्याचं मुख्य कौशल्य सर्च इंजिनकडून सेल्स आणि ट्रॅफिक आणणं हे असतं. म्हणजेच इंटरनेटवरील पेड अॅडव्हर्टायझिंग. डिजीटल एजन्सी क्लायन्टच्या अशा जाहिरातींचं काम करते. जाहिरात देणाऱ्या कंपनीची जाहिरात जेव्हा जेव्हा क्लिक होते तेव्हा प्रति क्लिकसाठी ठराविक पैसे मिळतात. अशा एजन्सींमध्ये किंवा मार्केटिंग कंपन्यांमध्ये पीपीसी एक्झिक्युटिव्ह किंवा तत्सम जॉबला मागणी असते. पीपीसीचा शॉर्ट टर्म कोर्स केलात तर तु्म्ही पीपीसीचं काम करून चांगली कमाई करू शकता.

​वेब डिझाइनिंग
आजकाल कोणापर्यंतही पोहोचण्याचा सर्वात जलद आणि स्वस्त मार्ग म्हणजे इंटरनेट. परिणामी इंटरनेटवर स्वत:चं चांगलं पेज, संकेतस्थळ बनवण्याचं कंपनीचं धोरण असतं, लघु उद्योजकांपासून फ्रीलान्सर्सपर्यंत कोणीही स्वत:चं संकेतस्थळ बनवू शकत असल्याने हे पेज बनवणाऱ्यांना खूप मागणी आहे. तुम्ही वेब डिझाइनिंगचा कोर्स करून चांगली कमाई करू शकता. तुम्ही पदवीधर झाल्यानंतर वेब डिझायनिंग करू शकता. फ्रिलान्सिंग काम करू शकता किंवा स्वत:ची कंपनीही सुरू करू शकता.

एसईओ कोर्स
डिजीटल इकॉनॉमीसाठी एसईओचा रोल खूप महत्त्वाचा असतो. SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. तुम्ही जेव्हा गुगलवर काहीही सर्च करता तेव्हा काही साइट्सच्या बातम्या वर दिसतात. हे योगायोगाने होत नाही. यामागे एसईओ टीमचा हात असतो. एसईओचं काम पाहणाऱ्या लोकांची ही जबाबदारी असते की गुगल सर्चमध्ये त्यांच्या कंपनीचं नाव टॉपवर असेल. एसईओचा कोर्स केल्यानंतर तुम्ही फ्रीलान्सर म्हणूनही काम करू शकता किंवा कंपनीत जॉबही करू शकता.

अॅनिमेशन
अॅनिमेशन तंत्रज्ञान नवं नाही. पण या कोर्सची गरज सध्या वाढली आहे. तुम्हाला कलेची आवड असेल, क्रिएटिव्हीटी असणं मात्र मस्ट आहे. अॅनिमेशन प्रोफेशनलची मागणी जाहिरात, सिनेमा, कार्टून इंडस्ट्री अशी अनेक ठिकाणी असते. तुम्ही २डी आणि ३ डी अॅनिमेशन कोर्स शिकू शकता.

ग्राफिक डिझाइनिंग
मीडिया कंपन्यांपासून अॅडव्हरटायझिगं कंपन्यापर्यंत ग्राफिक डिझायनर्सला खूप डिमांड आहे. ग्राफिक डिझायनर व्हिज्युअल कन्सेप्ट्स तयार करण्याचं काम करतात. लोगो डिझाइनर, व्हिज्युअल इमेज डेव्हलपर, आर्ट प्रोडक्शन मॅनेजर यासारख्या पदांवर तुम्हाला काम मिळू शकतं. ग्राफिक डिझाइनरचे विविध कोर्सेस असतात. फाउंडेशन डिग्री कोर्स असतो. विविध स्पेशलाइज्ड विषयांचे कोर्सेसही करता येतात. इलस्ट्रेटर, इन डिझाइन किंवा क्वार्क एक्सप्रेस, फोटोशॉपचं नॉलेज तुम्हाला हवं. कलेचं अंग हवं, तर तुम्ही अधिक चांगलं काम कराल.

सौर्स : मटा

Leave a Comment