Join Indian Army as a Officer

Join Indian Army as a Officer

सैन्यदलामध्ये अधिकारी व्हायचे, तर ‘हे’ घ्या…

Army Officer Recruitment 2020 : To prepare the candidates for the recruitment of officers in the Indian Army, Navy and Air Force, the Pre-Student Training Center, Nashik Road, Nashik will be prepared by the State Government for the preparation of the exams. SSB Course no. 52 are being organized. This course provides free accommodation for the trainees, food and training.

Interested candidates from Nanded district should attend the interview on Thursday (February 6th) at the District Soldier Welfare Office, Nanded, for pre-training in the Army Corps. When visiting the interview, search the Department of Sainik Welfare, Pune (DSW) on the Gogole page and print it along with the print admission and the accompanying attachment printed by the concerned District Sainik Welfare Office.

Indian_Army_logoArmy Officer Recruitment 2020

नांदेड : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी बुधवार (ता. १२) ते शुक्रवार (ता. २१) फेब्रुवारी या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. ५२ आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची पूर्व प्रशिक्षणासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे गुरुवार (ता. सहा) फेब्रुवारी रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येतांना फेसबुक पेज वर Department of Sainik Welfare, Pune (DSW) वर सर्च करून त्यामधील एसएसबी- ५२ कोर्ससाठी किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या  प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ती पुर्ण भरुन सोबत घेऊन यावी.

एसएसबीसाठी ‍शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे. त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेवून यावेत. कंम्बाईंड डिफेन्स सव्हींसेस एक्झामिनेशन ( CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) उत्तीर्ण झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ ‍ किंवा  ‘B’   ग्रेडमध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने  एसएसबीसाठी ‍ शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. University Entry‍ Scheme साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी ‍शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

या ठिकाणी संपर्क साधावा

अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व  प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्र. 0253-२४५१०३१ आणि ०२५३-२४५१०३२ असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

सौर्स : सकाळ

Leave a Comment