Postponed MPSC Exam 2020

MPSC Exam Postponed Again

MPSC ची परीक्षा अखेर पुढे ढकलली, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मराठा आंदोलकांच्या तीव्र विरोधानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. २ लाख ६० हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर या प्रकरणी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. यासंबंधी राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा निर्णय झाला. “११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात MPSC ची परीक्षा होती. मात्र करोना आणि लॉकडाउनचं संकट होतं. काही प्रमाणात अजूनही आहे. त्यामुळे आम्ही एक सारासार विचार केला. विद्यार्थ्यांना अभ्यासाला मिळाला पाहिजे हा विचार आम्ही केला त्यामुळे आम्ही ही परीक्षा पुढे ढकलत आहोत. परीक्षा कधी होणार याचा निर्णयही लवकरच घेतला जाईल” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.

आजच खासदार उदयनराजे भोसले यांनीही एक फेसबुक पोस्ट लिहून MPSC ची परीक्षा पुढे ढकलावी असं म्हटलं होतं. मराठा समाज संयमी आणि शांत आहे पण प्रसंगी आक्रमकही होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं होतं. तर मराठा आरक्षण प्रकरणी वेळ पडल्यास आपण तलवारही उपसू शकतो असं वक्तव्य संभाजीराजेंनी केलं होतं. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी संभाजीाजेंनीही केली होती. ज्यानंतर अखेर राज्य सरकारने ११ ऑक्टोबरला होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्यातील २ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

एकही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही

MPSC च्या परीक्षेची तारीख सध्या आम्ही पुढे ढकलली आहे. मात्र यापुढे जी तारीख ठरेल त्या तारखेत बदल केला जाणार नाही. मराठा समाजाकडूनही आम्हाला परीक्षा पुढे ढकला अशी विनंती केली होती. आता जे विद्यार्थी  परीक्षेला पात्र आहेत तेच विद्यार्थी जेव्हा परीक्षा जाहीर होईल तेव्हा त्या परीक्षेसाठी एकही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. काही विद्यार्थी करोनाग्रस्त आहेत. काही विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळालेला नव्हता. त्यामुळे ११ ऑक्टोबरची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मात्र आता जी काही तारीख जाहीर होईल त्यामध्ये बदल होणार नाही. असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.


MPSC परीक्षेच्या तारखेत बदल ; MPSC’चा मोठा निर्णय!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तीन परीक्षेच्या च्‍या तारखेत पुन्‍हा एकदा बदल करण्यात आला आहे.   महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सोमवारी  (ता.०७) परीपत्रक जारी करत वेळापत्रकात बदल केल्‍याचे कळविले आहे. कोविड परिस्थिमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार

NEW UPDATE: MPSC Exam 2020: The Maharashtra State Public Service Commission’s recruitment examination for various posts to be held on September 20 will now be conducted not only in Mumbai and Pune but at all the divisional centers in the state. The decision is made against the backdrop of the corona

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबर रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर होणार आहे.

मुंबई  : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबर रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेतली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्यावतीने चर्चा केली आणि कोरोना परिस्थितीमुळे फक्त मुंबई आणि पुणे येथे परीक्षा ठेवल्यास राज्याच्या अन्य भागातील स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांना रेल्वे सेवा बंद असल्याने परीक्षास्थळी पोहोचणे शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती निदर्शनास आणत ही परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्यात यावी अशी सूचना केली.

अखेर २० सप्टेंबर २०२० रोजी होणारी ही परीक्षा मुंबई, पुणे यांसह राज्यातील सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जावी ही सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली आहे.  यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची अडचण दूर केल्याने राज्याच्या सर्व विभागातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.  अनेक उमेदवारांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष यांचे आभार मानले आहेत.

परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे वेळापत्रक अंदाजित असून त्यामध्ये बदल होऊ शकतो असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


Postponed MPSC Exam 2020

MPSC has decided to postpone the state service examination to be held on September 13. The MPSC has decided to postpone the state service examination as it will be held on September 13 across the country and now it will be held on September 20. This has been officially announced by the MPAC through a letter.

एमपीएससीकडून १३ सप्टेंबरला होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला असून आता २० सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे. एमपीएसीकडून पत्रकाद्वारे अधिकृतरित्या हे जाहीर करण्यात आले आहे.

करोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तिसऱ्यांदा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक १७ जून रोजी जाहीर करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार होत्या. मात्र, १३ सप्टेंबर रोजी देशभरात नीट परीक्षा होणार असून त्याच दिवशी राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार होती. त्यामुळे एमपीएससीने पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

 

एमपीएससीने २३ डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीनुसार, राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० रविवार, ५ एप्रिल २०२० रोजी घेण्याचे निश्चित केले होते. मात्र, करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे १७ जून २०२० रोजी एमपीएससीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही परीक्षा १३ सप्टेंबर रोजी घेण्याचे घोषीत केले. आयोगाकडून परीक्षेचा दिनांक निश्चित करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून ३ जुलै २०२० रोजीच्या सूचनेद्वारे राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) १३ सप्टेंबर २०२० रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले.

आयोगामार्फत आयोजित परीक्षेकरीता उमेदवारांची संख्या तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षात घेता दोन्ही परीक्षांचे एकाच दिवशी आयोजन करण्यास परीक्षा उपकेंद्राच्या उपलब्धतेसह अन्य प्रशासकीय अडचणी निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात येणारी परीक्षा ही देश पातळीवर घेण्यात येणार आहे, ही बाब लक्षात घेऊन प्रशासकीय कारणामुळे एमपीएससीने आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २० सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आल्याचे एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Notification

Leave a Comment