Shivaji University Results -उन्हाळी सत्रात तेरा दिवसांत लागणार निकाल शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची तयारी; त्रुटी दूर करून नियोजन

Shivaji University Results – The model of evaluation developed by Shivaji University for timely declaration of results has been successful. Due to its implementation, the results of 60 per cent of the examinations in the winter session were declared in an average of 14 days. Now the examinations for the summer session are underway and the Board of Examinations is preparing to declare their results in 13 days.
There will be 700 exams this summer session. It began on March 22. Voc. It’s from the course exams. It was followed by B. A., B. Com., b. S.C., BCA, BBA exams started. M. with traditional curriculum. Ess., M . The A exams will be held in April-end, engineering, law (law) courses in May and LLM courses in July. The Board of Examinations and Evaluation has prepared to declare the results of all these examinations in an average of 13 days. The evaluation of the question papers of the exams conducted will begin from April 2. Workshops have been conducted at evaluation centres in Kolhapur, Sangli and Satara districts to guide faculty and staff.

Shivaji University Results 2024 updates

 • 49 % result declared within 16 to 30 days
 • Average days for declaration of results : 14.5
 • October 2023 (Winter Session)
 • Total Exams: 662 60% of results declared in 0 to 15 days and
 • 40% of results declared in 16 to 30 days.

उन्हाळी सत्रात तेरा दिवसांत लागणार निकाल शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची तयारी; त्रुटी दूर करून नियोजन

वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने विकसित केलेले मूल्यमापनाचे प्रारूप (मॉडेल) यशस्वी ठरले आहे. त्याच्या अंमलबजावणीमुळे हिवाळी सत्रातील ६० टक्के परीक्षांचे निकाल सरासरी चौदा दिवसांमध्ये जाहीर झाले. आता उन्हाळी सत्रातील परीक्षा सुरू असून त्यांचे निकाल तेरा दिवसांत लावण्याची तयारी परीक्षा वमूल्यमापन मंडळाने केली आहे.
या उन्हाळी सत्रात ७०० परीक्षा होणार आहेत. त्याची सुरुवात २२ मार्चपासून बी. व्होक. अभ्यासक्रमाच्या परीक्षांपासून झाली आहे. त्यापाठोपाठ बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., बीसीए, बीबीए परीक्षांचा प्रारंभ झाला. पारंपरिक अभ्यासक्रमासह एम. एस्सी., एम. ए. च्या परीक्षा एप्रिलअखेर, अभियांत्रिकी, विधी (लॉ) अभ्यासक्रमाच्या मे महिन्यामध्ये आणि एलएलएम अभ्यासक्रमाची परीक्षा जुलैमध्ये होतील. या सर्व परीक्षांचे निकाल सरासरी तेरा दिवसांमध्ये जाहीर करण्याची तयारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केली आहे. घेण्यात आलेल्या परीक्षांतील प्रश्नपत्रिकांचे मूल्यमापन दोन एप्रिलपासून सुरू होईल. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील मूल्यमापन केंद्रांमध्ये कार्यशाळा घेवून प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.

 • परीक्षेवर २३ पथकांची नजर – पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेत कॉपीचे प्रकार घडत असून त्याला आळा घालण्यासह त्यावर नजर ठेवण्यासाठी परीक्षा मंडळाने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हानिहाय दोन भरारी पथके आणि वीस महाविद्यालयांमध्ये १७ बैठी पथके तैनात केली आहेत.
 • ‘कमी दिवसांत मूल्यमापनाचे मॉडेल यशस्वी ठरले असून त्याची कुलपती कार्यालयाने प्रशंसा केली आहे. या मॉडेलच्या यशस्वीतेमध्ये कुलगुरुंसह, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. आता यापुढील सर्व परीक्षांचे निकाल सरासरी तेरा दिवसांत जाहीर करण्याची तयारी परीक्षा मंडळाने सुरु केली आहे. -डॉ. अजितसिंह जाधव, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

गेल्यावर्षीच्या दोन सत्रांतील निकालाचे चित्र

 • मार्च २०२३ ( उन्हाळी सत्र) एकूण परीक्षा: ६८०
 • ० ते १५ दिवसांत जाहीर झालेल्या निकालाचे प्रमाण ५१ टक्के

विद्याशाखानिहाय परीक्षांची संख्या

 • विद्याशाखा – उन्हाळी सत्र – हिवाळी सत्र
 • विज्ञान-तंत्रज्ञान – २९८ – ३४५
 • वाणिज्य-व्यवस्थापन – १८३ – १६९
 • मानव्यशास्त्र – ८४ – ७१
 • आंतरविद्याशाखीय अभ्यास – ११५ – ७७

Shivaji University Results 2024

 • १६ ते ३० दिवसांत जाहीर झालेल्या निकालाचे प्रमाण ४९ टक्के निकाल जाहीर झालेले सरासरी दिवस : १४.५
 • ऑक्टोबर २०२३ (हिवाळी सत्र)
 • एकूण परीक्षा: ६६२
 • ० ते १५ दिवसांत जाहीर झालेल्या निकालाचे प्रमाण ६० टक्के १६ ते ३० दिवसांत जाहीर झालेल्या निकालाचे प्रमाण ४० टक्के.

Leave a Comment