When is the decision on Police Bharti 2020?

When is the decision on Police Bharti 2020?

पोलिस भरतीबाबतचा निर्णय कधी?

Police Recruitment 2020 : The government was issued to reduce the quality of physical examination in police recruitment and give additional marks to the written test. The government reducing the quality of physical examination in police recruitment and giving extra marks to the written test. Millions of candidates in the state have registered their protest. Now the candidates hope that the new government will change these rules by the new government. However, the new government has come and changed the month, yet no decision has been made on this.

Police Recruitment 2020

पुणे – तत्कालीन युती सरकारने पोलिस भरतीमध्ये शारीरिक चाचणीचे गुण कमी करून लेखी परीक्षेला जादा गुण देण्याबाबतचा अध्यादेश काढला. त्याचा राज्यातील लाखो उमेदवारांनी निषेध नोंदविला. आता नव्याने अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारकडून या नियमांत बदल केला जाईल, अशी आशा उमेदवारांना आहे. मात्र, नवीन सरकार येऊन महिना उलटला, तरीही याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत.
कोरडवाहू शेतीत राबणारा विश्‍वास जाधव, खासगी कंपनीत काम करणारा अजय कांबळे, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील नागेश वानखेडे अशा शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांच्या मुलांसाठी पोलिस भरती आजही आशेचा किरण ठरते. मात्र, ही भरती प्रक्रिया नियमितपणे होत नसल्यामुळे हा किरण आता मंदावत चालला आहे.

शिवसेनेच्या विधानपरिषद सदस्यांना मंत्रिमंडळात ‘नो एन्ट्री’

पोटाला चिमटा घेऊन तरुण मुले-मुली भरतीची तयारी करतात. शारीरिक चाचणीत जास्त गुण मिळवून स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते; परंतु तत्कालीन युती सरकारने पोलिस भरतीच्या प्रक्रियेत काही बदल केले. त्यानुसार पूर्वीच्या १०० गुणांच्या शारीरिक चाचणीसाठी ५० गुण ठेवले, तर लेखी परीक्षा १०० गुणांची केली. तसेच लेखी परीक्षेसाठी पूर्वी उमेदवारांचे प्रमाण एकास १५ असे होते; मात्र, ते एकास १० करण्यात आले. याबाबत उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली होती.

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारकडून मागील सरकारने केलेल्या बदलांची दुरुस्ती केली जाईल, अशी अपेक्षा भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आहे; परंतु हे सरकार अस्तित्वात येऊन महिना उलटला, तरीही याबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने उमेदवारांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

पोलिस भरतीची तयारी करण्यासाठी एका उमेदवाराला दरमहा दहा हजार रुपये खर्च येतो. बहुतांश मुले शेतकरी व गोरगरीब कुटुंबातील असतात. त्यांना काम करून हा खर्च भागवावा लागतो.

शारीरिक चाचणीचे गुण कमी करून लेखी परीक्षेला जादा गुण देत तत्कालीन युती सरकारने हजारो उमेदवारांचे खच्चीकरण केले. त्यामुळे लाखो उमेदवारांवर अन्याय होत आहे. नवीन सरकारने याबाबत निर्णय घेऊन उमेदवारांना दिलासा द्यावा.

उत्तम संरक्षण व्यवस्थेतून शांतता मिळते. त्यामुळे पोलिस भरतीच्या नियमातील बदल हे भविष्यात राज्याच्या सामाजिक, आर्थिक व शांततेच्या मार्गातील अडथळा ठरतील.

एका उमेदवाराचा दरमहा होणारा खर्च 
निवास ३००० 
जेवण, प्रवास  ४५००
खासगी क्‍लास १०००
पुस्तके, इतर  २०००
एकूण खर्च  १०,५००

सौर्स: सकाळ

Leave a Comment