Govt Recruitment Exam pattern will be change

Govt Recruitment Exam pattern will be change

राज्यातील पदभरतीच्या परीक्षा पद्धतीत बदल होतील

There will be no injustice to the students in the state. We all have feelings for student well-being. Taking into account the feelings of the candidates regarding the Mahapariksha portal, necessary changes will be made in this examination system. Read the all important details regarding this news are given below. Candidates keep visit us for further updates.

‘राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, असा एकही निर्णय महापरीक्षा पोर्टलसारखी परीक्षा पद्धत किंवा आमचे सरकार घेणार नाही. विद्यार्थीहितासाठी आपल्या सर्वांच्या भावना एक आहेत. पोर्टलच्यासंदर्भात परीक्षार्थीच्या भावना लक्षात घेऊन, या परीक्षा पद्धतीत आवश्यक बदल करण्यात येतील’, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विधान परिषदेत जाहीर केले.

राज्यातील पदभरतीच्या परीक्षा घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या महापरीक्षा पोर्टलमधील गैरप्रकारांबाबत आमदार सतेज पाटील, सतीश चव्हाण, किरण पावसकर, हेमंत टकले यांनी लक्षवेधी विचारली होती. यावर ठाकरे यांनी माहिती दिली. राज्यात महापरीक्षा पोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षांमधील विविध गैरप्रकारांवर ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वृत्तांद्वारे प्रकाश टाकत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे म्हणणे मांडले. ठाकरे म्हणाले की, महापरीक्षा पोर्टलबाबत विद्यार्थ्यांच्या संतप्त भावनांची मला जाण आहे. त्यामुळे पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांना स्थगिती दिली आहे. या पोर्टलबाबत लोकप्रतिनिधींना माहिती द्यायची असल्यास, त्यांनी माझ्या दालनात येऊन माहिती द्यावी. राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, असा एकही निर्णय महापरीक्षा पोर्टल; तसेच सरकार घेणार नाही, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.

ठाकरे म्हणाले की, ‘महाआयटी’च्या माध्यमातून महापरीक्षा पोर्टलद्वारे राज्य सरकारच्या विविध विभागातील वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया घेतली जाते. यासाठी विषयतज्ज्ञ प्रश्नपत्रिका तयार करत असतात. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने राज्यातील वेगवेगळ्या ६७ परीक्षा केंद्रावर घेतली जाते. या प्रक्रियेसंदर्भात आलेल्या तक्रारींवरून यापूर्वी दोन वेळा चौकशी करण्यात आली असून, आणखी एकदा चौकशी सुरू आहे. महापरीक्षा पोर्टलचे त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक परीक्षण करण्यात येत आहे. या परीक्षणाच्या अहवालाच्या आधारे महापरीक्षा पोर्टलच्या परीक्षा पद्धतीत आवश्यक बदल करण्यात येतील. परीक्षार्थींवर कोणताही अन्याय होऊ नये, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

आम्हालाही म्हणणे मांडू द्या

महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले आहेत. या गैरप्रकारांची माहिती परीक्षार्थ्यांकडे पुराव्यानिशी आहेत. त्याची एक कॉपी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाला दिली आहे. महापरीक्षा पोर्टलद्वारे झालेली भरती प्रक्रिया सदोष झाली असून, मोठा भ्रष्टाचार झाला आहे. याची माहिती स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांकडे आहे. त्यामुळे राज्य सरकारची लोकप्रतिनिधींसोबत होणाऱ्या बैठकीमध्ये आम्हाला आमचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर, पद्माकर होळंबे, जीतू तोरडमल, शरद गरकल यांनी केली आहे. पदभरतीच्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यासाठी उमेदवारांनी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन एमपीएससी स्टुडन्ट राइट्सच्या महेश बडे, किरण निंभोरे यांनी केले आहे.

म टा…

Leave a Comment