Mumbai Mahanagarpalika School Girls Term Deposits Now in Post Office

Mumbai Mahanagarpalika School Girls Term Deposits Now in Post Office

पालिका शाळेतील मुलींच्या मुदत ठेवी आता पोस्टात

Mumbai Mahanagarpalika School : The municipality has decided to keep the postal deposits in the eighth standard for students studying in municipal schools no longer. Earlier, these deposits were kept in the Punjab National Bank. Due to the change in this decision, a sum of Rs 7 crore 66 lakhs.

Students getting education from 1st to 7th were given Rs. 2500/-. Now the amount has been increased from one thousand to five thousand rupees. In the past, this amount was invested in a nationalized bank. The Corporation had selected Punjab National Bank in 2018-2019. But the city and the suburbs did not find the same plan implemented at the same time. If a student does not have Aadhaar card for proof, then there are many difficulties in opening the student’s account at the bank. For KYC, parents and students have to submit evidence at all times. The principal and teachers also have to get involved while coordinating with the bank.

MCGM bharti 2019

महापालिका शाळांमधील आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या रकमेच्या ठेवी यापुढे पोस्ट खात्यात ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतल आहे. आधी पंजाब नॅशनल बँकेत या ठेवी ठेवल्या जात होत्या. या निर्णयात बदल केल्यामुळे तब्बल ७ कोटी ६६ लाखांची रक्कम थेट टपाल खात्यात गुंतवण्यात येत आहे.

पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिंनींची पटसंख्या वाढवणे, विद्यार्थिंनींची संख्या कायम राखणे आणि त्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढवणे या उद्देशाने पालिकेने प्रत्येक विद्यार्थिनींसाठी २००७-०८ मध्ये प्रोत्साहन भत्ता म्हणून प्रतिदिन १ रुपया देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २००९-१० पर्यंत ५०० ते २५०० रुपयांची रक्कम विद्यार्थिनींच्या बँक खात्यात जमा करण्यात आली.

पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना २५०० रुपये दिले जात असत. आता ही रक्कम एक हजार ते पाच हजार रुपये करण्यात आली आहे. पूर्वी ही रक्कम राष्ट्रीयकृत बँकेमध्ये गुंतवली जायची. २०१८-१९मध्ये पालिकेने पंजाब नॅशनल बँकेची निवड केली होती. परंतु शहर आणि उपनगरात एकाच वेळी सारख्या पध्दतीने योजनेची अंमबजावणी होत नसल्याचे आढळून आले. एखाद्या विद्यार्थीनीकडे पुराव्यासाठी आधार कार्ड नसेल, तर बँकेत त्या विद्यार्थिनीचे खाते उघडण्यास खूप अडचणी येतात. ‘केवायसी’साठी पालकांना व विद्यार्थिंनींना प्रत्येक वेळी पुरावे सादर करावे लागतात. या कामात बँकेशी समन्वय साधताना मुख्याध्यापक व शिक्षकांनाही अडकून पडावे लागते.

टपाल खाते हा भारत सरकारचा उपक्रम असून या खात्याची विश्वासार्हता अधिक आहे. संपूर्ण देशभर शाखा असल्याने विद्यार्थी कुठूनही पैसे काढू शकतात. विद्यार्थिनीचे आधार कार्ड कोणत्याही शुल्काशिवाय पोस्ट खाते काढत असल्याने महापालिकेने पंजाब नॅशनल बँकेऐवजी पोस्टात मुदतठेवी रक्कम भरण्याची तयारी दर्शवली आहे.

एकूण १६ हजार ४८१ एवढ्या मुली असून त्यांच्यासाठी एकूण ७ कोटी ६६ लाख ५० हजार रुपये एवढी रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देय आहे. त्यामुळे ही सर्व रक्कम बँकेऐवजी पोस्टात भरती जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *